एक्स्प्लोर

एक जानेवारीपासून होणार 'हे' बदल, ATM मधून पैसे काढण्यापासून ते कपडे खरेदी करणे महागणार!

changes From 1 January Know About : एक जानेवारीपासून काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.

Changes From 1 January :  सध्या सुरू असलेल्या 2021 या वर्षाचा उद्या शेवटचा दिवस आहे. या वर्षाला निरोप देण्याची तयारी तुम्ही केली असेल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियोजनही केले असेल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अर्थात एक जानेवारीपासून आर्थिक बाबतीत काही नियम बदलणा आहेत. या नव्या बदलामुळे काही प्रमाणात खिशाला झळ बसणार आहे. जाणून घ्या काय होणार आहेत बदल...

ATM मधून पैसे काढणे महागणार

ग्राहकांनी जर आता  ATM व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना 1 जानेवारी 2022 पासून अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने प्रत्येक सार्वजनिक आणि खासगी बँकेसाठी पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2021 च्या आदेशाप्रमाणे, 1 जानेवारी 2022 पासून लोकांनी विनामूल्य व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर बँकांना एटीएम व्यवहारांवर प्रति व्यवहार 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे. त्याशिवाय जीएसटी वेगळा असणार आहे. सध्या 20 रुपये आकारण्यात येतात.

10 हजारांहून अधिक रक्कम जमा केल्यास शुल्क 

India Post Payment Bank मध्ये 10 हजारांहून अधिक रक्कम जमा केल्यास तुम्हाला शुल्क द्यावे लागणार आहे. सेव्हिंग आणि करंट अकाउंटवर ही शुल्क आकारणी होणार आहे. इंडिया पोस्ट बँकेत तीन प्रकारचे बचत खाती उघडले जातात. यामध्ये बेसिक सेव्हिंग अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटसाठी वेगवेगळे नियम आहेत.  इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन शुल्क नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील आणि बँकिंगच्या इतर नियमांनुसार त्यावर GST/सेस आकारण्यात येणार आहे. 

KYC नसलेले डीमॅट अकाउंट निष्क्रिय होणार

31 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचे डिमॅट खात्याचे KYC केले नसल्यास तुमचे खाते एक जानेवारीपासून निष्क्रिय (Deactivate) होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे या कामासाठी काही तासच आहेत. 

आरक्षणाशिवाय रेल्वे प्रवास

भारतीय रेल्वे एक जानेवारीपासून मोठा बदल करणार आहे. काही रेल्वे मार्गांवर एक जानेवारीपासून अनारक्षित तिकिटावर रेल्वे प्रवास करता येणार आहे. 

कपडे आणि शूज खरेदीवर जीएसटी 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, शूजसाठी असलेल्या जीएसटी दरात वाढ केली आहे. याआधी हा दर पाच टक्के होता. आता हा जीएसटी 12 टक्के होणार आहे. नवीन जीएसटी दर एक जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. काही सिंथेटिक फायबर आणि धाग्यांसाठी असलेला जीएसटी कर हा 18 टक्क्यांहून 12 टक्के करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Bhuvneshwar Kumar Team India : 4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
Maharashtra Epstein Files Trailer: 'दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए'; 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज, कोण आहे कॅप्टन? सिनेमा कधी रिलीज होणार?
'दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए'; 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज, कोण आहे कॅप्टन? सिनेमा कधी रिलीज होणार?
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis Raj Thackeray And Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Embed widget