एक्स्प्लोर

Aadhaar Card : पासपोर्टसारखं होणार आधारसाठीचे व्हेरिफिकेशन, सरकार नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर

Aadhaar Card : आधार कार्ड बनवणाऱ्यांना पासपोर्टप्रमाणेच पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहेत. सरकार नियमात बदल करणार आहे.

Aadhaar Card : जर तुम्ही 18 वर्षांचे आहात आणि पहिल्यांदा आधार कार्ड (Aadhaar Card) बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता दीर्घ आणि कठीण प्रक्रियेतून जावे लागेल. आधार कार्ड बनवणाऱ्यांना पासपोर्टप्रमाणेच पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार आधार कार्डच्या नियमात बदल करणार आहे. यानुसार, अशा लोकांची पडताळणी UIDAI कडून नाही तर राज्य सरकार करणार आहे.

आधारबाबतच्या नियमात होणार बदल 

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. नोडल अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांची राज्य सरकारकडून जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर नियुक्ती केली जाईल. ज्यांना 18 वर्षे वयानंतर प्रथमच त्यांचे आधार कार्ड बनवायचे आहे, त्यांना आता नामनिर्देशित केंद्रांवर जावे लागेल. अशी केंद्रे जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिस आणि UIDAI ने ठरवलेली आधार केंद्रे असतील. अशा लोकांच्या सर्व आधार अर्जांना सर्व्हिस पोर्टलद्वारे व्हेरिफिकेशन करण्याआधी डेटा क्वालिटी प्रोसेसने जावे लागेल. 

आधार कार्ड कधी मिळेल?

उपविभागीय दंडाधिकारी सेवा पोर्टलद्वारे प्राप्त झालेली पडताळणी तपासतील. सर्व मंजुऱ्या मिळाल्यापासून 180 दिवसांच्या आत दिल्या जातील. अलीकडे जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी लागू करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एकदा आधार कार्ड मिळाल्यानंतर अपडेट करण्यासाठी नेहमीची प्रक्रिया करावी लागणार आहे.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली

आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र असून ते अपडेट असणं आवश्यक आहे. आधार कार्ड (ADHAR Card) मोफत अपडेट करण्यासाठी सरकारने 14 डिसेंबर ही मुदत दिली होती. मात्र आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सरकारने तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे.  

आधार केंद्रावरील लांब रांगेपासून वाचण्यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता, ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुम्हाला आधार अपडेट करता येणार आहे शिवाय आधार केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊनही तुम्ही माहिती अपडेट करु शकता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget