700 रुपयांत बुकिंग, मात्र भाडे घेतले 5000 रुपये, खासगी कॅबचालकाकडून विद्यार्थ्याची लूट
Scammed after ola app : एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भाड्याच्या नावाखाली मोठी लूट करण्यात आली आहे. बंगळुरुमध्ये ही घटना घडली.
Scammed ola app : खासगी वाहनाने किंवा खासगी कॅबमधून (private cab) प्रवास करताना अनेकवेळा प्रवाशांची मोठी लूट होते. भाड्याच्या नावाखाली प्रवाशांकडून डबल टीबल पैसे घेतले जातात. अशीच एक घटना बंगळुरुमध्ये (Bangalore) घडली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भाड्याच्या नावाखाली मोठी लूट करण्यात आली आहे. बंगळुरु विमानतळावरून शहरातील एका ठिकाणी जाण्यासाठी ओला कॅबचे भाडे सुरुवातीला 730 रुपये दाखवण्यात आले होते, परंतु नंतर ते 5,194 रुपये इतके वाढले. अनुराग कुमार सिंह असं विद्यार्थ्याचं नाव आहे.
एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बंगळुरु विमानतळावरून शहरातील एका ठिकाणी जाण्यासाठी ओला कॅबचे भाडे सुरुवातीला 730 रुपये दाखवण्यात आले होते. मात्र, नंतर त्या विद्यार्थ्याकडून 5,194 रुपये इतके भाडे घेतलेल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
अनुराग कुमार सिंह हा कोलकाताहून बंगळुरू विमानतळावर पोहोचला होता. त्याला शहरातील मठीकेरे भागात जायचे होते. यासाठी त्याने ओला 'मिनी टॅक्सी' बुक केली होती. अनुराग सिंगने त्या ठिकाणी पोहोचल्यावर 730 रुपये देण्याची ठेरवून कॅब घेतली होती. पण जेव्हा तो त्याच्या ठिकाणावर पोहोचला तेव्हा त्याला जास्त भाडे सांगण्यात आले. लोकेशनवर पोहोचल्यावर कॅबचालकाने त्याच्या फोनवर भाडे 5194 रुपये दाखवले. मी संपूर्ण बंगळुरुमध्ये फिरलो असतो तरी इतके भाडे झाले नसते अशी प्रतिक्रिया अनुराग कुमार सिंहने दिली.
दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्याने हे प्रकरण पोलिस ठाण्यात नेणार असल्याचे सांगितले. यानंतर मात्र, कॅबचालकाने मिटवून घेण्याचे मान्य केले. अनुराग सिंगकडून ड्रायव्हरने शेवटी 1,600 रुपये घेतले. ही रक्कम मूळ भाड्याच्या जवळपास दुप्पट होती.
महत्त्वाच्या बातम्या: