पुण्यात ओला आणि उबरचा प्रवास महागणार, नव्या दरवाढीला परिवहन प्राधिकरणाची मंजुरी
Pune Ola Uber News Today : पुण्यात ओला आणि उबर कॅबचा प्रवास महागणार आहे. कारण एसी कारच्या प्रवासी भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
Pune Ola Uber News Today : पुण्यात ओला आणि उबर कॅबचा प्रवास (Ola Uber News) महागणार आहे. कारण एसी कारच्या प्रवासी भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. इथून पुढे पुण्यात एसी कारमधून प्रवास करण्यासाठी पहिल्या दीड किलोमीटर साठी 37 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटर साठी 25 रूपये मोजावे लागणार आहेत. दिलासादायक म्हणजे, काळी पिवळी टॅक्सीच्या दरांमधे कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हे दर पूर्वीप्रमाणेच पहिल्या दीड किलोमीटर साठी 31 रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटर साठी 21 रुपये याप्रमाणे असणार आहेत.
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रात काळी पिवळी टॅक्सी व वातानूकुलीत टॅक्सीच्या (कुलकॅब) भाडे दरात एक जानेवारीपासून सुधारणा करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील कार्यक्षेत्रात भाडे सुधारण्याच्या अनुषंगाने खटुआ समितीच्या शिफारशीनुसार तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 22 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत भाडे दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारी याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे.
वातानूकुलीत टॅक्सीचे नवे दर कसे असतील ?
काळी पिवळी टॅक्सीला पहिल्या 1.5 कि.मी. करिता 31 रूपये, त्यापुढील प्रत्येक 1 कि.मी. करिता 21 रूपये इतका दर असेल. काळी पिवळी टॅक्सीच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर वातानूकुलीत टॅक्सीला (कुलकॅब) पहिल्या 1.5 कि.मी. करिता 37 रूपये व त्यापुढील प्रत्येक 1 कि.मी. करिता 25 रूपये असा भाडेदर निश्चित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.
लंडनहून विमानात येणाऱ्या प्रवाशाचं 7.60 लाखांचं सोनं गायब, पुण्यात गुन्हा दाखल
Pune News : जन्मदात्या बापाने मुलीला संपवलं, पुण्यातील घटनेनं हळहळ!
पुणं हादरलं! 2 अल्पवयीन मुलांनी सर्वांसमोर तरुणाला संपवलं, बोपोडीत भरदिवसा थरार