एक्स्प्लोर

लहू का लगान?

जिथे कंडोमही करमुक्त आहे, तिथे सॅनिटरी पॅडवर कर का? हा प्रश्न पडला तर काही वावगं नाही. मात्र कुठल्याही बाबीविरुद्ध आंदोलन करताना त्याची पूर्ण माहिती घेणंही तितकच गरजेचं आहे.

मुलगी वयात येण्याचा संदर्भ आपल्या संस्कृतीत तिच्या मासिक पाळीशी जोडला जातो. मुलीची मासिक पाळी सुरु झाली की ती “मोठी” होते असंही म्हणतात. अत्यंत नैसर्गिक असणाऱ्या या प्रक्रियेला आपल्याकडे फार सोहळा वगैरे करुन साजरं केलं जातं. या प्रक्रियेत महत्त्वाची आणि गरजेची वस्तू म्हणजे सॅनिटरी पॅड. एक देश, एक कर म्हणत सरकारने सॅनिटरी पॅडवर कर लावला. हा कर आधी नव्हता असं नाही. या आधीही हा कर होता. मात्र आता या कराविरुद्ध वेगवेगळी आंदोलनं होताना दिसतात. सध्या सरकारनं यावर 12% कर लावला आहे. सोशल मीडियावरही याविरुद्ध मोहीम सुरु आहे. #LAHUKALAGAN असं या मोहिमेचं नाव आहे. पण याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? देशात GST लागू करताना सरकारनं सॅनिटरी पॅड्सवर 14% कर लावला. त्याविरुद्ध आंदोलनं झाल्यावर हा कर 12% वर आला. या करामध्ये सगळे सॅनिटरी पॅड निर्माते सहभागी नाहीत. MNC म्हणजे मल्टी नॅशनल कंपन्यांच्या सॅनिटरी पॅड्सवरच हा कर लावण्यात आलाय. आज जे सॅनिटरी पॅड आपण वापरतो, ते सगळे याच कंपन्यांचे प्रॉडक्ट आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आणखी कोण हे पॅड्स बनवतात? ऐकून आनंद होईल आणि अभिमानही वाटेल अशी बाब आहे. आपल्या देशात कित्येक गावात महिला बचत गटांद्वारे सहज नष्ट करता येणारे सॅनिटरी पॅड्स बनवले जातात. हो...हे बचत गट फक्त लोणचे-पापड पुरते मर्यादित नाहीत. देशात वेगवेगळ्या राज्यात सॅनिटरी पॅड्स बनवणारे मशीन आहेत. आणि त्याद्वारे स्वस्त, टिकाऊ आणि नष्ट करता येणारे सॅनिटरी पॅड्स बनवले जातात. असे सॅनिटरी पॅड्स बनवण्याचं काम प्रथम अरुणाचलम मुरुगनाथन या अवलियाने सुरु केलं. हा एकमेव माणूस आहे ज्यानं स्वतः सॅनिटरी पॅड घालून त्यावर प्रयोग केले. त्यांना पद्म पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. यांच्याप्रमाणेच इतर अनेक NGO’S आहेत, ज्या याविषयी कार्य करतायत. पण याची माहिती कोणालाच नाही. आता आपण जे पॅड्स वापरतो, त्या विषयी जाणून घेऊया. जे पॅड्स आपण वापरतो, त्यामध्ये कमी दर्जाच्या कापसाचा वापर करतात. त्याची शोषूण घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यात वेगवेगळे हानीकारक रसायनं वापरतात. अल्ट्रा सॅनिटरी पॅड्समध्ये प्लास्टिकचाही वापर केला जातो. या सगळ्या कच्च्या मालावर याआधीही कर होता आणि आजही आहे. हे सगळे पदार्थ नष्ट देखील करता येत नाही. वापरुन फेकून दिलेल्या सॅनिटरी पॅड्सवर प्रक्रियाही करता येत नाही. त्यात वापरण्यात आलेले द्रव्य निसर्गासाठी मोठ्या प्रमाणात हानीकारक आहे. यामुळे होणारं प्रदूषण दिसत नाही पण त्याची तीव्रता तेवढीच आहे. एक स्त्री तिच्या मासिक पाळीच्या कालावधीत, म्हणजे वयाच्या 12 ते 50 या कालावधीत, 9 लाखांहून अधिक पॅड्स वापरते. यावरुन या विषयाची तीव्रता समजते. स्वदेशी सॅनिटरी पॅडमध्ये उत्तम दर्जाचा कापूस आणि त्वरीत नष्ट होणारे द्रव्य वापरले जातात. या पॅड्सना जाळता येतं आणि त्याची राख खत म्हणूनही वापरता येते. मल्टी नॅशनल कंपनीच्या उत्पादकांवर लावण्यात आलेला हा कर ते सहजतेने भरु शकतात. स्वदेशी पॅड्स संपूर्णपणे करमुक्त आहेत. सॅनिटरी पॅडवर लावण्यात आलेल्या करामागे स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश सांगण्यात येतोय. पण इथे फार कमी जणांना याबाबत माहिती आहे. आणखी एक विचार करायचा झाल्यास, फक्त शहरी भागातच सॅनिटरी पॅड्स वापरले जातात. देशात आजही 88% महिला कापड वापरतात. त्यांच्यामध्ये याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी सरकारद्वारे आणि बऱ्याच NGO द्वारे गावात काम चालू आहे. इतक्या जमेच्या बाजू असताना त्याला विरोध का व्हावा? सॅनिटरी पॅड ही आवड नसून गरज आहे. ज्या उद्देशासाठी हा निर्णय घेण्यात आलाय, त्याबाबत जनतेमध्ये जागृती असणं गरजेचं आहे, जी शून्य टक्के आहे. आपल्या देशात, गावात सहज नष्ट करता येणारे स्वस्त सॅनिटरी पॅड्स बनतात, याची काहीच माहिती देशातील महिलांना नाही. एक पर्याय काढून घेताना, दुसरा पर्याय तयार ठेवणं, ही एक महत्त्वाची बाब सरकार विसरलं. त्यामुळे जिथे कंडोमही करमुक्त आहे, तिथे सॅनिटरी पॅडवर कर का? हा प्रश्न पडला तर काही वावगं नाही. मात्र कुठल्याही बाबीविरुद्ध आंदोलन करताना त्याची पूर्ण माहिती घेणंही तितकच गरजेचं आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं?  24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं?  24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Embed widget