एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | प्रादुर्भाव रोखणार कसा?
आजाराचा संसर्ग वाढत जाणे आणि रुग्णबाधित रुग्ण बरे होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. बाधित रुग्ण बरे होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, त्याचवेळी संसर्गाचा फैलाव होऊन नवीन रुग्णाचे निदान, तेही बरे होणाऱ्या रुग्णापेक्षा जास्त होणे ही चिंताजनक बाब आहे हे आपण येथे ध्यानात घेतले पाहिजे.
राज्याची आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत कोरोना बाधित रुग्णांना उपचार देत असून रोज हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे. मात्र त्याचवेळी रोज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक प्रमाणात लक्षणीय स्वरूपात नवीन रुग्णांचे निदान होत आहे. हा प्रकार असाच चालू राहिला तर या आजारावर पायबंद घालण्याकरता अजून किती काळ लागणार आहे हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. जोपर्यंत नवीन रुग्णाच्या संख्येवर आळा घालण्यात यश मिळत नाही तोपर्यंत ही लढाई निरंतर चालूच राहील सध्या अशी परिस्थिती आहे. घनदाट लोकवस्ती असलेल्या मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात दिवसागणिक नवीन रुग्णाचं आगमन होतंच आहे. ग्रामीण भागातही चांगलाच कोरोनाचा फैलाव झाला असून तेथे रुग्णांची आकडेवारी जास्त नसली तरी काही प्रमाणात रुग्णसंख्या दिसतच आहे. वाढती रुग्णसंख्या थांबविण्यासाठी या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाला रोखणं गरजेचं आहे? तो थांबवायचा कसा? या प्रश्नाचं उत्तर अजून जरी मिळालं नसलं तरी त्यावर मात कशी करायची यावर प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते स्वयंशिस्त आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे, यामुळे प्रादुर्भाव कमी होणार आहे.
आजाराचा संसर्ग वाढत जाणे आणि रुग्णबाधित रुग्ण बरे होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. रबाधित रुग्ण बरे होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचवेळी संसर्गाचा फैलाव होऊन नवीन रुग्णाचे निदान, तेही बरे होणाऱ्या रुग्णापेक्षा जास्त होणे ही चिंताजनक बाब आहे, हे आपण येथे ध्यानात घेतले पाहिजे. राज्याचा आरोग्य विभाग दररोज मेडिकल बुलेटिन जारी करत असतो , त्यानुसार शुक्रवारी जी आकडेवारी जाहीर केली होती त्याप्रमाणे 1935 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे आणि 3827 नवीन रुग्णांचं निदान झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून नवीन रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. तसेच 142 रुग्णाचा मृत्यू झाला आहे असेही या बुलेटिन मध्ये सांगण्यात आले आहे, दिवसागणिक या आजाराने होणाऱ्या मृत्यूची संख्याही बऱ्यापैकी आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50.49% एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 4.74% आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा कालावधी 26 दिवसांवर गेला आहे.
यावर राज्याचे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे सांगतात की, "साथीच्या आजारात प्रत्येक आजाराचं एक गतीशास्त्र असतं. तसेच आपण या आजारात आर नॉट नंबर (बेसिक रिप्रॉडक्शन नंबर) म्हणजे प्रसारांक, म्हणजे कोरोनाबाधित रुग्णापासून किती लोकांना हा आजार होऊ शकतो हा आकडा बघत असतो. या आजारात कोरोनाबाधित 1 ते 4 रुग्णांना प्रसार करतो हे गेल्या काही महिन्याच्या शास्त्रीय आधारावरून लक्षात आले आहे. जगभरात हा आजार येऊन सहा महिने झाले आहे. गोवर आजारात प्रसारांक आकडा 11-12 असा होता, म्हणजे तो कोरोनापेक्षा कैक पटीने अधिक होता. कोरोनाबाधितांचा हा आकडा कमी करण्यासाठी आपण मागील काळात लॉकडाऊनसारखे पर्याय अवलंबले होते आणि त्यामुळे चांगल्या प्रमाणात हा वाढता आकडा नियंत्रित ठेवण्यात यश मिळविले होते. त्याशिवाय आपल्याला ह्या आजाराच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी काही सुरक्षिततेचे नियम आखून दिले आहेत ते पाळणे गरजेचे आहे"
ते पुढे असेही म्हणाले की, " यापूर्वी स्वाईन फ्लू सारखे साथीचे आजार येऊन गेलेत, ते विशिष्ट काळा पुरते राहिले होते. आता हे आजार जातात लक्षातही येत नाही, तुरळक संख्येने हे रुग्ण दिसत राहतात. त्याप्रमाणे कोरोनाचं राहील एक विशिष्ट कालावधीपर्यंत हा आजार राहील आणि नंतर त्यांचे स्वरूप नगण्य होईल. परंतु, सध्या हा आजार आहे तोपर्यंत आपल्याला दक्ष राहून काम करावेच लागेल."
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सध्याच्या घडीला रुग्ण म्हणून असणाऱ्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे. देशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या १ लाख ६८ हजार २६९ रुग्ण आहेत आणि २ लाख १३ हजार ८३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मोठ्या संख्यने रुग्ण घरी गेले आहे ही गोष्ट चांगली आहे. याचा अर्थ आपल्या डॉक्टरांचे रुग्णावरील उपचार योग्य पद्धतीने सुरु आहे रुग्ण औषधांना प्रतिसाद देत आहेत. मात्र यामुळे या आजराचा संसर्ग कमी झाला असा होत नाही. दररोज नवीन होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण ज्यावेळी कमी व्हायला लागेल त्यावेळी खऱ्या अर्थाने हा आजाराला आपण पायबंद घालण्यास सुरुवात झाली असं म्हणता येईल.
मुंबई येथील केईएम रुग्णालयाचे, माजी अधिष्ठाता, डॉ अविनाश सुपे, सांगतात की, "या आजाराचं वर्तन कसे असेल अजून तरी सांगणे कठीण आहे. मात्र ज्या ठिकाणी 10 हजार लोकांमागे 35 रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी कठोर होऊन उपाययोजना आणि नियमांचे पालन केले पाहिजे. ज्या ठिकाणी हे प्रमाण 10 हजारामागे 5-10 रुग्ण असे आहेत. त्या ठिकाणी थोडीशी मोकळीक देऊन नियम पाळून व्यवहार सुरु करण्यास हरकत नाही. मात्र यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. नागरिकांना अजून काही दिवस तरी व्यस्थित नियम पाळलेच पाहिजे त्याला दुसरा पर्याय नाही. आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून योग्य तो सवांद साधला पाहिजे. काही लक्षणं दिसल्यास घेतले पाहिजे. सामाजिक विलगीकरणाचे नियम जे आखून दिले आहे त्याचा आदर करून अंमलबजावणी केली गेलीच पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आता सध्या बाजारात काही प्रभावी औषध येत आहे त्याचा होईल."
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आयसीएमआर ) गेल्या महिन्यात देशातील 83 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 1.13 एवढे आढळून आले आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेत आढळून आला आहे.
शासनाने, रुग्ण लवकर बरे व्हावेत याकरिता विविध उपाय योजना आखल्या आहे. त्याप्रमाणे आता, अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी ‘टेलीआयसीयू’ सुविधेचा वापर केला आहे. मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या 7 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करणार आहे. राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे 75 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. 10 ते 15 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र सुमारे तीन टक्के रुग्ण जे गंभीर आहे त्यांना अतिदक्षता विभागात उपचार आवश्यक आहेत. अशा रुग्णांवर उपचार करताना आयसीयुमधील जे विशेषज्ञ आहेत त्यांची संख्या वाढविली जात आहे. मात्र मेडीस्केप या डॉक्टरांच्या फाऊंडेशनमार्फत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘टेली आयसीयू’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनने दिला आहे. सध्या सात जिल्ह्यांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर उपलब्ध केली जाणार असून तिची यशस्विता पाहून राज्यातील अन्य जिल्ह्यातही सुरू केली जाणार आहे.
हा जर प्रादुर्भाव रोखायचा असेल तर नागरिकांनीही आरोग्य विभागाने आणि प्रशासनाने जे सुरक्षिततेच्या दृष्टीने जे नियम आखून दिले आहेत, त्यांचे पालन केले पाहिजे. सामाजिक अंतराचे पालन करणे, घरबहारे पडताना तोंडावर मास्क लावणे, हाथ धुण्यासाठी साबणाचा किंवा सॅनिटायझरचा वापर करणे, यास आपल्या दिनचर्येचा भाग बनवून घेतले पाहिजे. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे आपण लवकरच कोरोनावर अंकुश मिळविण्यात यशस्वी होऊ शकतो.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement