एक्स्प्लोर

राहुल गांधींची जागा प्रियंका गांधी घेणार?

2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पराभवानंतर सावरण्याऐवजी काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस आणखी खालावत गेली. 2019 मध्येही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा पराभव स्वीकारावा लागला. या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान देशभरातील राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. काही राज्यांमध्ये तर असलेली सत्ताही गमवावी लागली. मनात नसतानाही शिवसेनेशी युती करून महाराष्ट्रात मिळवलेली सत्ताही शिवसेनेतच बंड झाल्याने काँग्रेसला गमवावी लागली. भाजपने 2024 त्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु केलीय. भाजपसोबत काही प्रादेशिक पक्षांनीही 2024 ची तयारी सुरु केलीय पण काँग्रेस मात्र अजूनही चाचपडतेय. याचं कारण म्हणजे काँग्रेसला अध्यक्ष नसणं.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे अध्यक्षपद सोपवण्याऐवजी सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांना अनेक वेळा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली पण त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. काँग्रेसचे अध्यक्षपद अन्य एखाद्या नेत्याकडे सोपवावे अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाला जी-23 म्हटले जाऊ लागले. या गटाची नाराजी अजूनही कायम असून आता तर काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेसपासून जवळ जवळ फारकत घेतलीय. त्यातच आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीआधी तरी आजारी असलेल्या सोनियांऐवजी काँग्रेसकडे पूर्ण वेळ अध्यक्ष असावा अशी मागणी काँग्रेस नेते करू लागलेत. आणि राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे असे सोनिया गांधींसह काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. पण राहुल गांधींनी याला अजूनही होकार दिलेला नाही.

राहुल गांधींनी जर अध्य़क्षपद स्वीकारण्यास नकार दिला तर काँग्रेस नेत्यांच्या मनात प्रियंका गांधी यांचे नाव आहे. प्रियंकांची जनतेच्या मनात असलेली इमेज 2024 मध्ये यश मिळवून देऊ शकते असा विश्वास काही नेत्यांना आहे. मात्र याच प्रियंकांवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी टाकली होती, त्यात त्या संपूर्णपणे अयशस्वी ठरल्या होत्या आणि उत्तर प्रदेशच्या इतिहासात काँग्रेसचं सगळ्यात मोठं पानीपत झालं. त्यामुळे 2024 मध्ये प्रियंकाची जादू मतदारांवर कितपत चालेल असा प्रश्नही काही काँग्रेस नेत्यांच्या मनात उद्भवत आहे. राहुल, प्रियंका नसेल तर काँग्रेस अध्यक्ष कोणाकडे सोपवले जाणार असा प्रश्न फक्त काँग्रेस नेत्यांच्या मनातच नाही तर देशातील प्रत्येक राजकीय पक्षालाही पडलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी प्रचंड सक्रिय झालेले आहेत. लोकसभा असो की रस्त्यावरची लढाई. राहुल गांधी आक्रमकपणे केंद्रातील मोदी सरकारवर विशेषतः नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करीत आहेत. कन्याकुमारी येथून 'भारत जोडी यात्रा'ही ते सुरू करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देश पिंजून काढण्याचा राहुल गांधी यांचा विचार आहे. मात्र असे असले तरी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास ते तयार नसल्याचे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते सांगतात.

प्रियंका गांधींची इमेज चांगली असली तरी उत्तर प्रदेशमध्ये झालेला काँग्रेसचा पराभव आणि देशाच्या अन्य राज्यांमध्ये प्रियंकाबाबत जास्त नसलेली उत्सुकता यामुळे प्रियंका काँग्रेसला कितपत यश मिळवून देऊ शकतील अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने उदयपूर येथे चिंतन शिबिर घेतले. त्याच शिबिरात ऑगस्टमध्ये काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरवले होते. त्यानुसार उद्यापासून म्हणजेच रविवार 21 ऑगस्टपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया 20 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज मागवले जाणार असून जास्त अर्ज आल्यास निवडणूक घेतली जाईल आणि निवडणुकीची तारीख काँग्रेस वर्किंग कमिटी निश्चित करेल.

गांधी घराण्यातील तिन्ही नेते म्हणजेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जर काँग्रेसचे अध्यक्ष होण्यास तयार नसतील, तर काँग्रेसमधीलच एखाद्या नेत्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवले जाईल असेही म्हटले जात आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मुकुल वासनिक, कुमारी शैलजा यांची नावे चर्चेत आहेत. मात्र त्या एका नावावर सगळ्यांचे एकमत होणे कठिणच आहे. जर राहुल आणि प्रियंका यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला तर सोनिया गांधी यांनाच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपद सांभाळण्याची विनंती केली जाईल असेही काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची ही निवडणूकच काँग्रसचे पुढील भविष्य ठरवणारी असेल यात शंका नाही.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Embed widget