एक्स्प्लोर

खान्देश खबरबात : गिरीश महाजनांचं मैत्रीपूर्ण 'सर्जिकल स्ट्राईक'

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंदूलाल पटेल यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रमुख विरोधकांच्या गोटात घुसून मैत्रीपूर्ण सर्जिकल स्ट्राईक घडवून आणले. अर्थात, चंदूलाल पटेल यांच्यासमोर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सुरेश चौधरी (कागदोपत्री अपक्ष), अमोल पाटील, खान्देश विकास आघाडीचे (खाविआ) कैलास सोनवणे, नितीन बरडे, मनसेचे ललित कोल्हे, भाजपातील नाराज आणि मावळते आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, श्रीकांत खटोड, अशोक कांडेलकर, काँग्रेसच्या लता छाजेड यांना मंत्री महाजन यांनी माघार घ्यायला लावली. शनिवारी अंतिम दिवशी निवडणूक रिंगणातून मातब्बर उमेदवार माघार घेत असताना निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र होते. मात्र, अखेरिस पटेल यांच्यासह 8 जण रिंगणात राहीले. आता पटेल यांच्यासह ॲड. विजय भास्कर पाटील, प्रशांत पाटील, नितिन सोनार, सुरेश देवरे, शाम भोसले, शेख जावेद, शेख आखलाक हे रिंगणात आहेतच. या निवडणुकीसाठी भाजपने मंत्री महाजन यांचा शब्द ऐकून पक्षासह सर्वसामान्य लोकांना नवखे व बिल्डर, प्रॉपर्टी लॉबीतील कोट्यधीश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पटेल यांच्या पारड्यात उमेदवारीसाठी मंत्री महाजन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री कामात आली आहे. मावळते आमदार डॉ. जगवानी हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक मानले जातात. खडसे यांनी मंत्रीपद त्यागल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपात गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीचा फटका डॉ. जगवानी यांना बसला. त्यांची उमेदवारी कापली गेली. त्यांच्यासाठी खडसेही प्रतिष्ठा पणाला लावू शकले नाहीत. डॉ. जगवानींची उमेदवारी वगळून पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे मंत्री महाजन यांचे पक्षांतर्गत वजन असल्याचे सिध्द झाले आहे. मंत्री महाजन यांनी नवख्या पटेल यांना रिंगणात उतरवल्यामुळे त्यांना विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. पटेल या लढाईसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. शिवाय, काही व्यवहारात मंत्री महाजन, पटेल व खटोड बंधू पार्टनर सुध्दा आहेत. मावळते आमदार डॉ. जगवानी हेही अशाच काही व्यवहारात खडसेंचे पार्टनर होते. हा योगायोग भाजप उमेदवारांबाबत लक्षवेधी आहे. एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. ती म्हणजे पटेल यांच्यासाठी जळगावातील बिल्डर व प्रॉपर्टी डिलर लॉबी कामाला लागली आहे. पटेल यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे देवकर, शिवसेनेचे मात्र एबी फॉर्मच्या घोळाने अपक्ष ठरलेले सुरेश चौधरी यांचे आव्हान होते. रिंगणात खाविआचे बरडे, मनसेचे कोल्हे हेही होते. पण ही मंडळी तडजोडवाली आणि मंत्री महाजन यांचा शब्द मानणारी होती. शिवसेनेचे जिल्ह्यातील सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे मंत्री महाजन यांच्याशी गुळपीठ आहे. भाजप अंतर्गत मंत्री महाजन व खडसे यांच्यात सुंदोपसुंदी आहे. गुलाबराव पाटील व खडसे यांच्यात उघडपणे व्यक्तीगत वैरभाव आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांचे उमेदवार पटेल यांच्यासाठी शिवसेनेचे चौधरी व अमोल पाटील यांची माघार सहजपणे झाली. उरला होता प्रश्न देवकर यांचा. मंत्री महाजन व पडद्यामागून मुख्यमंत्री यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक घडवून आणले. Khandesh-Khabarbat-512x395 राजकीय पक्ष कशा प्रकारे तडजोड घडवून आणतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे विधान परिषदेची जळगावची जागा भाजपची आहे हे लक्षात घेवून देवकर यांच्या माघारीचा आदेश बारामतीतून आला. जळगावातून देवकर बाजूला होत असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले व विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्यासाठी भाजपने मदत करायचे आश्वासन दिले आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेससह स्वपक्षातील बंडखोरानेही आव्हान दिले आहे. पुण्यात भोसलेंच्या विजयाचा मार्ग भाजपच्या अंतर्गत मदतीतून सुकर होईल. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपापसात हे सर्जिकल स्ट्राईक केले आहे. पुण्यात काय होईल सांगता येत नाही. पण जळगावात चंदूलाल पटेल यांचा विजय निश्चित झाला असून मंत्री महाजन यांनी आता पटेल हे सर्वपक्षिय उमेदवार असल्याचा दावा केला आहे. जळगावची खाविआ आणि जिल्ह्यातील इतर पालिकांमध्ये सुरेश जैन यांना मानणारे नगरसेवक पटेल यांना मतदान करतील. मंत्री महाजन आणि जैनांचे गूळपीठ आहेच. मान्यवर व मातब्बर उमेदवारांच्या माघारीने या निवडणुकीतील मतदारांचे भाव घसरले आहेत. यापूर्वी दोन वर्षांसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. जगवानी यांचीही बिनविरोध निवड झाली होती. तेव्हाही मंत्री महाजन यांच्या शिष्टाईनंतर कैलास सोनवणेंनी माघार घेतली होती. पटेल यांच्यासाठी मंत्री महाजन यांचा शब्द पाळून डॉ. जगवानी यांनी माघार घेतली. आता मतदानाच्या निमित्त मत खरेदीचा घोडेबाजार रंगण्याची शक्यता नाही. नगरसेवकपदावरुन पायउतार होताना कमाईची संधी हुकल्याने नगरसेवकांमध्ये मातम सारखे वातावरण आहे. विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघात 548 मतदार आहेत. सध्या सर्वच नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे मावळत्या पालिकेतील नगरसेवकांचे बलाबल कागदावरच आहे. यात सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे 139, भाजपचे 103, शिवसेनेचे 64 आणि 57 खाविआचे नगरसेवक आहेत. या शिवाय इतर ठिकाणी आघाड्यांचे नगरसेवक आहेत. कागदोपत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड होते. मात्र मंत्री महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, खाविआ यांच्या गोटात घुसून सर्जिकल स्ट्राईक घडवून आणले. अर्थात, देवकर यांनी नाराजीनेच माघार घेतली आहे. सर्व प्रकारच्या मनी, मसल व मासची ताकद लावली असती तर देवकरांसाठी अपेक्षित निकाल साध्य झाला असता. आता चंदूलाल पटेल यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. मात्र, अपक्ष असलेले व जळगाव जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे बंधू ॲड. विजय पाटील प्रचारात रंगत आणू शकतात. मराठा क्रांती मोर्चाने जळगाव जिल्ह्यात एकीचे वातावरण निर्माण केले आहे. याचा पडद्यामागून नीट लाभ घेतला तर मराठा समाजाचे किमान 150 नगरसेवक आहेत. ॲड. पाटील यांना मंत्री महाजन व मंत्री पाटील विरोधकांची छुपी मदत होवू शकते. बाकी इतरांचे पटेल यांच्यासाठी आव्हान नाही. विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही मंत्री महाजन यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर मात करीत खाविआ, शिवसेना, काँग्रेसमध्येही आपले मैत्रिपूर्व कनेक्शन असल्याचे सिध्द केले आहे. मंत्री महाजन यांनी हेच संबंध जिल्हा विकासासाठी वापरावेत अशी जनतेची अपेक्षा आहे.

खान्देश खबरबातमधील याआधीचे ब्लॉग :

खान्देश खबरबात : 'उमवि'त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget