एक्स्प्लोर

फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद'

पिरंगुटसारख्या आता पुण्याचं उपनगरच झालेल्या, गजबजलेल्या औद्योगिक भागात असलेल्या 'श्रीपाद'ची ख्याती आता फक्त पुण्यातच नाही तर अनिवासी भारतीयांमुळे परदेशातही पसरलीय.

पुण्यातून जाताना पिरंगुटचा छोटेखानी घाट उतरून किंचितस पुढे असलेल्या लवळे फाट्यावर असलेल्या श्रीपादमधे जाणं म्हणजे माझ्यासाठी घरच्या किचन मध्ये जाऊन खादाडी करण्यासारखं असतं. गंमत म्हणजे ही भावना माझ्यासारखीच अनेक खवैय्यांची असते. पुण्यातून घोटवडे फाट्याला एखाद्या कंपनीत, लवासा सिटीला किंवा ताम्हीणी घाटातून कोकणात उतरायचं असुदे, नाहीतर सायकल, मोटरबाईकवर ताम्हीणी घाटात राईडला जायचं असुदे. सगळ्याच पदार्थांचा सातत्याने टिकवलेला दर्जा, उत्तम सर्व्हिसमुळे जातायेता श्रीपादमध्ये थांबून खाण्याची संधी माहीतगार लोक सहसा सोडत नाहीत. ह्याबाबतीत मी त्यांची तुलना पूर्वीच्या पळस्पे फाटा किंवा एक्स्प्रेस वे वरच्या दत्तशी करेन. फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद श्रीपाद सुरु झाल्यापासून म्हणजे साधारण २००१ पासून मी वरच्यावर जातोय. त्यावेळी फारतर वीसेक माणसांचीच बसायची सोय, चारी बाजूनी हिरवी शेडनेट लावलेलं छोटेखानी कॅंटीन आता शेसव्वाशे माणसांच प्रशस्त हॉटेल झालंय. पण लांबून बघताना विटकरी रंगावर वारली पेंटिंग केलेला बाहेरील डेकॉर मनातून, "खेड्यामधले घर कौलारू" ची आठवण करुन देतो. फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद पिरंगुटमध्ये चांगली मिसळ, भजी, वडापाव आणि घरगुती जेवणाची सोय करून देणारं श्रीपाद, कै. दिलीप पाटील ह्यांनी सुरु केलं. त्यांच्या पत्नी माधवी पाटील ह्यांनी आजूबाजूच्या इंडस्ट्रियल इस्टेट मधे जेवणाचे डबे देऊन त्यांना बरोबरीने साथ दिली.मी स्वतः त्याचा एक साक्षीदार आहे. कै. दिलीप पाटील ह्यांच्यानंतर गेल्या ८ वर्षांपासून त्यांचा मुलगा ओजसच्या देखरेखीखाली श्रीपाद मोठं होत गेलं.जागेबरोबरच हॉटेलचा मेन्यूही वाढत गेला.नेहमीच्या पदार्थांबरोबरच तिथे दिवसभर थालीपीठ लोणी,पंजाबी भाज्या,वीकेंडला स्पेशल मुगभजीही ‘सर्व्ह’ व्हायला लागली. फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद सकाळी ८ पासून पोहे,उपमा,मिसळ,भजी बनवून श्रीपादच्या किचनची सुरुवात होते.विशेषतः शनिवार-रविवारी सकाळी लवकर कोकणात जाणाऱ्या गाड्यांना किंवा आसपास इव्हेंट्स करता जाणाऱ्या गृप्सना, 'प्रिऑर्डरवर पॅक नाश्ता' देणं,हे इथलं एक मुख्य काम  असतं. मिसळ तर सतत भरलीच जात असते आणि दुपारी  आसपासच्या भागात असणाऱ्या कंपनीज मधे येणाऱ्या लोकांची जेवणाच्या थाळीसाठी,पंजाबी डिशकरता गर्दी होते.संध्याकाळपर्यंत वडापाव बरोबर सँडवीचेस ज्यूस,शेक,कोल्ड कॉफीही (मस्त आहे ) सुरु असतेच.कोणत्याही हॉटेलमधे येवढा भरगच्च मेन्यू ठेवणं आणि तो दिवसभर हसतमुखाने सर्व्ह करत रहाणं कितपत अवघड आहे,ह्याची कल्पना कोणत्याही हॉटेलवाल्यांना चटकन येईल. फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद श्रीपादमधे खाण्यासाठी माझा चॉइस मटकी,वाटाण्याच्या उसळीबरोबर उकडलेला बटाटा घातलेल्या रस्स्याची मिसळ.त्यावर नेहमीच्या शेव फरसाण बरोबर हॉटेलात सहसा न दिसणारा स्पेशल मका चिवडा असतो.त्याची किंचीतशी गोडी मिसळीच्या तिखटाची चव थोडी ‘न्युट्रल’ करते.त्यामुळे दिसायला ही मिसळ, लालभडक दिसली तरी सर्वसामान्य जनतेला खाता येईल इतपत माफक तिखट बनून जाते.मी मालकाला लग्गा लाऊन मिसळीबरोबर ‘वैच’ तिखट रस्सा मागवतो, हात पुसण्यापुरताच एखादा पाव घेतो. फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद उन्हाळ्यात मिसळीबरोबर नारळाच्या सोलकढीचा ग्लास आणि त्याच्या जोडीला कांदाभजी.भजीचा तुकडा मीठ लावलेल्या तळलेल्या तिखट मिरचीबरोबर खाताना मिसळीची लज्जत अजून वाढत जाते.श्रीपादमधे कुरकुरीत तळलेल्या भजीवर थोडी बारीक शेव भुरभुरून मिळते,हे ‘कॉम्बो’ही झकास आहे. पावसाळ्याच्या दिवसात मिसळ झाल्यावर ओजस आणि त्याची पत्नी साईलीबरोबर गरमागरम कॉफीचे घोट घेत गप्पा मारत वेळ फार चटकन निघून जातो. फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद पिरंगुटसारख्या आता पुण्याचं उपनगरच झालेल्या, गजबजलेल्या औद्योगिक भागात असलेल्या 'श्रीपाद'ची ख्याती आता फक्त पुण्यातच नाही तर अनिवासी भारतीयांमुळे परदेशातही पसरलीय. आसपासच्या कंपनीत कामानिमित्त येणारे, कोकणात ट्रिपला जाणारे-येणारे,सायकलिंग,मोटरबाईक राईड्स करणारे तर इथे आवर्जून थांबतातच. मधे एकदा श्रीपादमधे बसलो असताना,जवळच्याच PVPCOA च्या हॉस्टेलच्या इथे नेहमी येणाऱ्या काही विद्यार्थ्याचा ग्रुप भेटला.त्यांच्या ऑर्डरची रेंज तर थाळी,मिसळ पासून,वडापाव,चीज थालीपीठ,चीज सँडवीच विथ कोल्ड कॉफीपर्यंत होती.“इथे रोज जेवलं तरी कधी पोटाचा त्रास होत नाही”त्यांची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी बोलकी होती.एक व्हेज फॅमेली हॉटेल,हॉस्टेलच्या ‘पोरांना’ घरच्यासारख वाटणं ही मला श्रीपादच्या घवघवीत यशाची ही सगळ्यात मोठी पावती वाटते.तशीही घरच्या जेवणाची किंमत बाहेर राहणाऱ्यांना (किंवा बाहेर राहिल्यावर) जास्त समजते. फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद निघताना श्रीपाद मधल्या जाहिरातीच्या बोर्डवरच्या ओळींवर लक्ष जातं."श्रीपाद आता एक हॉटेल राहिलेलं नाही, तर एक मोट्ठं कुटुंब झालय". इथे नेहमी येणाऱ्या लोकांबरोबर कधी बोललं तर त्या जाहिरातीतल्या ओळी नाही, तर आपलंच मनोगत वाटतं. अंबर कर्वे यांचे याआधीचे ब्लॉग वाचण्यासाठी क्लिक करा
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
Embed widget