एक्स्प्लोर

BLOG | कोरोना आणि मी

ऑफिसच्या गेटबाहेर पडल्यावर मीही तुमच्यातलीच एक असते, सामान्य‌ जीवन जगणारी. त्यामुळे मला जेव्हा कोरोना झाला तेव्हा तो मी आणि माझ्या आप्तस्वकियांसाठी धक्का होता, अवघड काळ होता. कोरोनाची हीच खासियत आहे की तो खूप बेसावधपणे तुम्हाला गाठतो, आता परिस्थिती अशी आहे की कोरोना कुणालाही कधीही होऊ शकतो. तसाच तो माझ्या परीने मी नीट खबरदारी घेऊनही मला झाला. वेळेत निदान झाल्यावर मी नीट औषधोपचार घेतले, सकारात्मक राहिले आणि लवकर बरी झाले.

माझे अनुभव शेअर करण्याआधी मी एक गोष्ट नक्की सांगेन की आपत्कालीन सेवा म्हणून काम करताना, कोरोनाच्या अगदी जवळच्या परिघात तुमचा वावर असतो तसा तो माझाही होता. कारण वर्क फ्रॉम होम असले तरी काही महत्वाच्या कार्यक्रमांसाठी ऑफिसला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येणं व्हायचं. प्रवास व्हायचा लोकांशी संपर्क यायचा. मी पूर्ण काळजी घेत होते. नो टच थिअरीपासून ते फिजिकल डिस्टन्सिंगपर्यंत...

पण कोरोनाची हीच खासियत आहे की तो खूप बेसावधपणे तुम्हाला गाठतो, आता परिस्थिती अशी आहे की कोरोना कुणालाही कधीही होऊ शकतो. तसाच तो माझ्या परीने मी नीट खबरदारी घेऊनही मला झाला. वेळेत निदान झाल्यावर मी नीट औषधोपचार घेतले, सकारात्मक राहिले आणि लवकर बरी झाले. पण हा काळ माझ्यासाठी सोप्पा नक्कीच नव्हता. अँकर म्हणून एक वलय आसपास नक्कीच असतं पण त्या वलयाबाहेरही माझं स्वतंत्र आयुष्यं आहे.

ऑफिसच्या गेटबाहेर पडल्यावर मीही तुमच्यातलीच एक असते, सामान्य‌ जीवन जगणारी. त्यामुळे मला जेव्हा कोरोना झाला तेव्हा तो मी आणि माझ्या आप्तस्वकियांसाठी धक्का होता, अवघड काळ होता. यासगळ्या दरम्यान ज्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला, आपुलकीने, मायेने चौकशी केली, मी लवकर बरी व्हावे यासाठी देवाला साकडं घातलं, मला पॉझिटिव्हिटी दिली, मला हरप्रकारे मदत ‌केली त्यांची मी शतशः ऋणी आहे. आपल्या सदिच्छा अशाच सोबत असू द्या.

जेव्हा मला कोरोना झाला...!!

27 मे सकाळी 7 वाजून 54 ‌मिनिटं, माझा फोन वाजला.. काळजात धस्स झालं कारण या फोनची वाट मी गेले दीड दिवस जीव एक करुन पाहत होते. हा फोन कॉलच मला सांगणार होता की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह.

पलीकडून बोलत होत्या संजावनी गावडे. मी एका रिंगमध्येच फोन उचलला, संजिवनी म्हणाल्या, "मॅडम, कोविड-19 डिटेक्टेड आहे रिपोर्टमध्ये!!"

एक दोन सेकंद हे बोलणं मेंदूपर्यंत पोहोचायला गेलं. मी ओके ठीक आहे! म्हणून फोन ठेवला. आधी मी शांत झाले आणि अजिबात घाबरुन न जाता परिस्थिती स्वीकारत लवकरात लवकर उपचार घ्यायचं ठरवलं..

रिपोर्ट यायच्या आधीचे दीड-दोन दिवस माझ्या आयुष्यातले सर्वाधिक तणावाचे दिवस होते.‌ मी खरतंर वर्क फ्रॉम होम करत होते, बुलेटिनचा‌ सेटअप आमच्या सोसायटीच्या ऑफिसात लावला होता. पण माझा कट्टा किंवा आणखी एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी आठवड्यातून एकदा ऑफिसला जावं लागायचं. तसंच शुक्रवारी 22 मे रोजी मी ऑफिसला गेले होते. रात्री नऊच्या दरम्यान घरी आले. जरा कंटाळा आला होता पण बाकी तब्येत तशी ठीक होती.‌

शनिवारी 23 मे रोजी मला जरासा थकवा जाणवू लागला आणि जेवणाची इच्छा कमी झाली. तसा हा दिवस तुलनेने बरा गेला. पण रविवार 24 मे ला मी गळपटूनच गेले होते. ताप आल्यावर आपण जसे गलितगात्र होते तशी काहीशी फीलिंग होती. पाय वळत होते आणि जेवण तर जात नव्हतंच. तरी कोबीच्या चटपटीत वड्या केल्या, व्हेज बिर्याणी केली पण ताटात वाढलेलं पोटातच जाईना.

रविवारची सकाळ तशीच ढकलली, दुपारही रेटली पण संध्याकाळी लक्षात आलं की या अवस्थेत उद्या अँकरिग करणं काही शक्य होणार नाही तर डॉक्टरांकडून औषधं घेऊ. म्हणून संध्याकाळी आमचे फॅमिली डॉक्टर योगेश सरोदेंना फोन केला. त्यांना काय ‌होतंय ते सांगितलं. डॉक्टर औषधं सांगण्याच्या बेतात ‌होते, तितक्यात त्यांनी विचारले की तुला ताप आहे का? आणि गेल्या काही दिवसात कुठे बाहेर गेलेलीस‌ का? ताप तर मी मोजला नव्हता पण शुक्रवारी ऑफिसला गेल्याचं त्यांना सांगितलं.

त्यांनी ताबडतोप ताप मोजायला सांगितलं. थर्मामीटर लावलं तर 100 ताप होता. डॉक्टरांनी मला तातडीने टेस्टचा सल्ला दिला. ही टेस्टची वेळ कधी ना कधी आपल्यावर येणार हे माहित असूनही मी जरा चपापलेच. त्यांना परत विचारले की नक्की मी टेस्ट करायला हवी आहे का? पण डॉक्टर आपल्या मतावर ठाम होते. त्यांनी मला ताप उतरण्यासाठी गोळ्या आणि मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्या लिहून दिल्या. टेस्ट तर करच पण या गोळ्याही सुरु ठेव म्हणाले.

सोमवारी 25 तारखेला सकाळी ताप मोजला तर तो 99.9 होता म्हणजे काल रात्री तापाच्या गोळ्या खाऊन तसा फरक पडला नव्हताच. दिवस नेहमीप्रमाणे सुरु झाला. मी वर्क फ्रॉम होम असल्याने सकाळी अकराचं बुलेटिन केलं.‌ पण मनात टेस्टचा विचार घोळतच होता.‌ ‌हे बुलेटिन संपवून दुपारी तीनच्या दरम्यान मेट्रोपोलिस लॅबच्या कोविड कलेक्शन सेंटरमधून स्वॅब तपासणी झाली. नवरासोबत आलेला पण मी एकटीच जाऊन टेस्ट करते तू खालीच थांब असं‌ त्याला सांगितलं. एकटीनेच‌ आत प्रवेश केला.‌ वातावरण तसं गंभीरच होतं पण तिथला स्टाफ चांगलं सहकार्य करणारा होता.

कोरोनाच्या बातम्या देताना पीपीई कीट घातलेले आरोग्य सेवक मी फक्त दृश्यामध्येच पाहिले होते पण टेस्ट करताना समोरासमोरचा अनुभव घेतला. टेस्टचा हा अनुभव भीतीदायक नव्हता पण अस्वस्थ करणारा होता. आणि हीच अस्वस्थता रिपोर्ट येईपर्यंत होती.

टेस्ट करुन घरी आले आणि परत बुलेटिन सुरु ठेवली. टेस्ट करणं ते टेस्टचे रिपोर्ट येणं हा काळ सर्वात कठीण काळ असतो. एकीकडे काहीही होणार नाही म्हणत मनाला आश्वस्त करायचं तर दुसरीकडे काही झालं तर काय या चिंतेच्या हिंदोळ्यावर झुलायचं.

सोमवारचा 25 मेचा दिवस माझ्यासाठी खूप थकवणारा होता. एकतर माझा ताप कमी झाला नव्हता, थकवाही होता, टेस्टची चिंता, जेवणावरुन मन उडालेलं आणि या सगळ्यात‌ बुलेटिन्स चोखपणे पेलण्याची जबाबदारी.

त्यातच सोमवार दुपारी मी‌ टेस्टसाठी निघत असतानाच शुक्रवारी ऑफिसमध्ये संपर्कात आलेल्या माझ्या मैत्रिणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. आता नकळत का होईना माझं मन जरा घाबरु लागलं. संध्याकाळी माझ्या टीम मेंबर्सचे फोन आणि मेसेज सुरु झाले. कारण पॉझिटिव्ह आलेली माझी सहकारी त्यांच्याही संपर्कात होती. त्यामुळे तेही काहीसे पॅनिक झाले होते, घाबरले होते.

त्यांची मी सतत समजूत काढत होते, त्यांना शांत करत होते.‌ त्यांचं सगळं ऐकून घेत होते पण यावेळी त्यांना कुणालाच कल्पना नव्हती की माझी घालमेल कशी सुरु आहे. कारण मला तर लक्षणं दिसून मी टेस्ट केली होती. टीम लीडर असल्याने सगळ्यांचं बोलणं नीट ऐकून त्यांना शांत करणं, आश्वस्त करणं ही माझी जबाबदारी होती जी मी पेलली.

सोमवारचा 25 मेचा दिवस एकंदरीत तणावाचा आणि शारिरीक मानसिक थकवा आणणारा होता. कसातरी ढकलत तो सोमवार संपला एकदाचा.

मंगळवारची 26 तारीख उजाडली होती ती टेस्टच्या रिपोर्टची धाकधूक घेऊनच.‌ मंगळवारी सकाळी परत ताप मोजला तर 99.3 तशी अपेक्षित सुधारणा नव्हती पण जरा तरतरी वाटतं होती.‌

सकाळी अकराच्या बुलेटिनसाठी तयार झाले, बुलेटिन केलं.‌ दुपारी मी नीट जेवावं यासाठी सासूबाईंनी खूप आग्रह केला. बऱ्यापैकी‌ जेवण गेलं ऑर मी ढकललं. तुला काहीही होत नाही असा धीर घरचे सतत देत होते. संध्याकाळी उशिरा रिपोर्ट येण्याची शक्यता होती त्यामुळे मनाची घालमेल सुरुच होती.‌

या सगळ्या दरम्यान मी तसं रविवारपासूनच‌ स्वतःला घरातल्या इतरांपासून अलग केलं होतं. कारण उगाचच आपल्यापासून कोणताही धोका नको.

त्या दिवशी थकवा तसा कमी होता पण ताप 99च्या खाली उतरला नव्हता. पण आज ठरवलेलं की ताण घ्यायचा नाही. आज दिवसभरात ती बुलेटिन होती.‌ वर्क फ्रॉम होम असल्याने अगदी मेकअप आणि हेअरपासून ते कपड्यांना इस्त्री करणं आणि सगळ्या टेक्निकल गोष्टी सांभाळणं यासाठी 'वन वुमन आर्मी' म्हणूनच काम बघावं लागत होतं.

BLOG | कोरोना आणि मी

बुलेटिन करताना एकाग्रता महत्त्वाची. बातम्या वाचताना मनात इतर विचार आले की गोंधळ उडतो. घरातून काम करत असल्याने समोर टेलिप्रॉम्पटर नाही, दोन फुटांवर असलेल्या दोन हॅलोजन लाईटमुळे होणारा भयंकर उकाडा, ऑफिसमधून येणाऱ्या सूचना कानात प्राण एकवटून ऐकायच्या आणि नेहमीच्या उत्साहात, स्टाईमध्ये, मनातली कोरोनाच्या रिपोर्टची अस्वस्थता, खळबळ प्रेक्षकांना समजू न देता बुलेटिन करणं हे या दरम्यान माझ्यासाठी सर्वात कठीण काम होतं.‌ पण मी माझी जबाबदारी याकाळातही चोख पार पाडली याचं समाधान कायम राहिल.‌

कसाबसा 26 मेचा दिवस‌ संपला. नकळत मी सतत जीमेल चेक करत होते, फोनच्या रिंगकडे‌ सतत लक्ष होतं. रात्री झोपले पण उद्याचा दिवस‌ कसा असणार? याचा विचार मनात घेऊनच.

27 तारखेला सकाळीच फोनवरुन रिपोर्ट समजला आणि मग मी घरच्यांना कल्पना दिली की माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यांनाही कळेना की इतकी काळजी घेऊनही मला संसर्ग कसा झाला.‌ पण त्याचा विचार करण्याची ही वेळ नव्हती. सासूबाई खूप हळव्या झाल्या. पण बाकीचे सर्व आणि माझे आई बाबा एकदम धीराने पाठीमागे उभे राहिले.

ऑफिसला कळवलं आणि चर्चेअंती असं ठरलं की मी डोंबिवलीच्या कोविड स्पेशल असलेल्या आर आर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होणं योग्य ठरेल.‌ आता घराबाहेर जायची तयारी करायला हवी होती. कारण मला थोडा ताप होता आणि माझं घर जरी प्रशस्त असलं माझी वेगळी बेडरुम आणि बाथरुम असलं तरी घरी सासूसासरे होते. त्यांच्या चिंतेपोटी आणि सुरक्षेसाठी आणि लवकरात लवकर योग्य उपचारांसाठी मी बाहेरच क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय‌ घेतला.

कपडे आणि काही गरजेचं सामान घेऊन निघाले आणि 15 मिनिटांतच हॉस्पिटलला पोहोचले. या हॉस्पिटल बाहेरुन मी अनेकदा गेले होते पण आपणच कधीतरी इथे अॅडमिट होऊ असा विचारही डोक्यात आला नव्हता. नवरा हॉस्पिटलपर्यंत आला होता. पेशंट वगळता कुणालाही हॉस्पिटलच्या आता प्रवेश दिला जात नाही. मी बावरल्यासारखी झाले. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची माझी पहिलीच वेळ.

सगळा स्टाफ पीपीई कीटमध्ये, वातावरणात तणावपूर्ण शांतता, स्टाफचे फक्त डोळेच दिसत होते. मी पेशंट आहे समजल्यावर पुढच्या प्रक्रिया सुरु झाल्या. दहा मिनिटांनी मला माझ्या रुममध्ये नेलं गेलं. नवऱ्याला बाय म्हणताना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. पण बहुदा त्याला याची जाणीव असल्याने त्याने झटपट निरोप घेतला आणि मीही मन घट्ट करत परत मागे वळून पाहिलं नाही.

इथून पुढे माझी आणि कोरोना हॉस्पिटलची खरी ओळख व्हायला सुरुवात झाली. तळमजल्यावर जनरल वॉर्ड होता, अगदीच क्लिअर दिसत नव्हतं पण प्रत्येकजण आपापल्या बिछान्यावर आराम करत होता, कोण मोबाईल पाहत होता, कुणी जेवत होतं तर कुणी असंच खिडकीबाहेर पाहत‌ होता. माझ्यासोबत असलेल्या दोघा व्यक्तींनी अगदी काळजीपूर्व मला पहिल्या मजल्यावर नेलं. इथली कॉरिडोअर संपल्यानंतर येणारी सर्वात शेवटची खोली माझी वाट पाहत होती. मी खोलीत गेल्यावर मला बसायला खुर्ची दिली आणि माझ्या बेडवर स्वच्छ चादर अंथरुन एक उशीही ठेवली गेली. बाकीच्या गोष्टी सॅनिटाईज करुन मला जेवायचं आहे का? असं विचारुन ते दोघे बाहेर गेले.

BLOG | कोरोना आणि मी

आता खोलीत मी एकटीच होते. खोलीत नजर मारली तर खोली मोठी होती. एक बेड, बाजूला टेबल, एक खुर्ची, दोन सीलिंग फॅन, एक स्टॅण्डी फॅन, टॉयलेट बाथरुम आणि एसी. बेडवर शांत बसले. माझ्या प्रचंड दगदगीच्या आणि धावपळीच्या आयुष्याला करकचून ब्रेक लागला होता. पुढचे किमान आठ-दहा दिवस मी याच खोलीत असणार होते. अखंड बडबड करणारी मी आता या खोलीत शांतपणे बसून होते.

घरच्यांनी फोनवरुन विचारपूस केली. मी जेवण घेतलं. मी उत्तम असल्याची खात्री घरच्यांना पटवून दिली आणि मग जरा झोपायचा प्रयत्न करु लागले. ऑफिसमध्ये तोवर मी पॉझिटिव्ह असल्याचं समजले होतं आणि मग पुढच्या दोन ते तीन दिवसांसाठी नेव्हर एण्डिंग फोन कॉल सुरु झाले.‌

प्रत्येकजण काळजी आणि आपुलकीपोटी फोन करत होता, विचारपूस करत होता. पण सगळ्यांना तेच तेच परत सांगणं जरा अवघड होतं. कदाचित इतक्या वर्षांची अँकरिंगची सवय असल्याने आणि मूळ स्वभावाला इलाज नसल्याने मी अगदी निगुतीने सगळ्यांना सगळं सांगत होते. हे फोन पुराण अडीच दिवस सुरुच होतं.‌ पण शनिवारपासून मी कटाक्षाने वेळा ठरवल्या की फोनवर कधी आणि किती बोलायचं. शक्यतो मेसेजवर रिप्लाय द्यायला सुरुवात केली. कारण कोरोनाच्या काळात आराम करणं महत्त्वाचं होतं.

पहिल्या दिवशी एक फोन ठेवला की दुसरा आणि दुसरा ठेवला की तिसरा अशी अवस्था होती. यासगळ्या दरम्यान हॉस्पिटलचा स्टाफ येत होता, भेटत होता, औषधं सुरु झाली होती.‌

हायड्रोक्सीक्लोरिक्वीन आणि अझिथ्रोमायसिन या दोन गोळ्यांचं कॉम्बिनिशन मला दिली जातं होतं. माझी ब्लड टेस्ट झाली, एक्स-रे काढला गेला. ऑक्सिजन लेव्हल आणि बीपी मोजलं गेलं आणि हे होत असताना इथला स्टाफ मला सतत धीर देत होता. काय हवं नको विचारत होता. पहिल्या दिवशी ब्लड टेस्टसाठी टोचलेली सुई पहिली आणि शेवटची. तुमच्यात लक्षणं नसतील किंवा कमी असतील, तुम्ही हायरिस्क पेशंट नसाल तर फक्त गोळ्या आणि योग्य आहार, पुरेशी झोप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह विचारांनी तुम्ही बरे होता.‌

बुधवारी जवळपास दुपारी बाराच्या दरम्यान मी अॅडमिट झाले होते. फोनवर बोलताना रात्र उजाडली. रात्रीचं जेवण झालं, औषधं झाली, फोनवर बराच वेळ टाईमपास केला पण झोप काही येईना. शेवटी पहाटे कधीतरी डोळा लागला. आणि मी शांत झोपी गेले.

कोरोनासोबतचा पहिला दिवस संमिश्र अनुभवांचा, भीतीही दाखवणारा आणि दिलासाही देणारा होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी माणसं आणि माझं काम यांच्यापासून काही दिवस मला दूर ठेवणाऱ्या दिवसांची सुरुवात या दिवसापासून झाली.

क्रमशः तर असा होता कोरोनासोबतचा माझा पहिला दिवस. नंतरच्या दिवसात काय झालं हे सांगेन पुढच्या‌ लेखात.

#Corona काय सांगतेय ज्ञानदा? कसं हरवलं कोरोनाला! Dnyanada Chavan Kadam | ABP Majha
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget