एक्स्प्लोर

BLOG : जिंकलो..पण घामटा निघाला

आधी चार बाद 45 आणि नंतर सात बाद 74..स्कोरबोर्डची ही स्थिती पाहिल्यावर एखाद्या अननुभवी संघाची नौका अशी हेलकावे खाताना वाटते. पण, मीरपूरच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या नावासमोर हे आकडे लागले होते, तेव्हा धडधड वाढली होती. पण, अश्विन-श्रेयस अय्यर जोडीने  आरोग्य सुधारलं आणि आयसीयूतून आपण बाहेर आलो. नुसते बाहेर नाही आलो, तर बरे होऊन आनंदाने घरी परतलो. तो विजयाचा गुच्छ घेऊनच.

मीरपूरच्या पिचवर पहिल्या डावात तजिरुलच्या आणि दुसऱ्या डावात मेहदी हसनच्या फिरकीसमोर आपण कोसळलो. बरं कोसळणारे तरी कोण होते, तर राहुल, कोहली आणि पुजारा. 45 कसोटी, 104 कसोटी आणि 98 कसोटी खेळणारे हे बुरुज जमीनदोस्त झाले. तेही 40 कसोटी सामने खेळणारा तैजुल इस्लाम आणि 37 कसोटी खेळणाऱ्या मेहदी हसनसमोर.

फिरकीला खेळपट्टी पोषक असली तरीही फिरकीच्याच मातीत जन्म झालेल्या आपल्या दिग्गजांनी इथे ढेपाळावं, याची जास्त खंत वाटली. पहिल्या डावात चार बाद 94 वरुन पंत आणि अय्यरने आपल्याला सावरलं, नाहीतर परिस्थिती बिकट होती. चौथ्या डावात अशा खेळपटट्ट्यांवर फलंदाजी करणं, हे आव्हानात्मक असलं तरीही आपण चार बाद 45, सात बाद 74असं घसरणं हे आपल्या लौकिकाला साजेसं नाही.

क्रिकइन्फोच्या मुलाखतीत माजी कसोटीपटू वसिम जाफरने आपल्या दुसऱ्या डावातील अप्रोचवर बोट ठेवलं. तो म्हणाला, 145 चं टार्गेट गाठताना आपण बचावात्मक पवित्रा घेतला होता. राहुल, गिलसारखे फलंदाज आघाडीला असताना हे योग्य नव्हे. पॉझिटिव्ह अप्रोच किती महत्त्वाचा असतो, हे आपण याआधी पाहिलंय. बांगलादेशविरुद्ध जर आपण असा दबाव घेऊन खेळणार असू तर फेब्रुवारीत आपली गाठ ऑस्ट्रेलियन टीमशी पडणार आहे. आपण त्यांच्याच अंगणात त्यांचा वृक्ष कसोटी मालिकेत दोनदा उपटून आलोय. त्यामुळे ते चवताळलेले असणार यात शंका नाही. म्हणून आपण सकारात्मक किंबहुना आक्रमक दृष्टिकोन घेऊन खेळणं हीच काळाची गरज आहे.

इथे अश्विन आणि श्रेयस अय्यरची पाठ मात्र थोपटायला हवी. सात बाद 74 वरुन त्यांनी सामना फिरवला. अश्विनने ऑस्ट्रेलियात हनुमा विहारीसोबत केलेला पराक्रम आपण साऱ्यांनीच पाहिलाय. तिथे ऑसी तोफांचे व्रण अंगावर घेत त्याने गड राखला होता. इथे अश्विन पॉझिटिव्ह खेळला. त्याने 62 चेंडूंमध्ये 42 धावा या 67.74 च्या स्ट्राईक रेटने त्याने केल्या. चार चौकार, एक षटकारही ठोकला. अश्विनच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये 13 अर्धशतकं आणि 5 शतकं आहेत. ही कामगिरी त्याला फलंदाजाच्या व्याख्येत परिपूर्णपणे बसवते. त्याच्याकडून अशाच सातत्याची अपेक्षा आपण यापुढेही करु शकतो. पण, आघाडीच्या फळीकडून अशाच सातत्याने कोलमडण्याची अपेक्षा नको ठेवायला. कारण, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाचा पेपर आपल्याला सोडवायचाय. ऑसी मंडळी खिंडीत गाठलं की, चिरडून टाकतात. ती पुन्हा तुम्हाला बचावाचा दोर टाकायला देत नाहीत. त्यामुळे आघाडीच्या फळीने अधिक जबाबदारीने आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

 अक्षर पटेलचंही इकडे कौतुक होणं गरजेचं आहे. चौथ्या डावात चौथ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर त्याने 88 मिनिटे खेळपट्टीवर तग धरला. इतकंच नव्हे तर रथीमहारथी धारातीर्थी पडत असताना त्याने 69 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. स्ट्राईक रेट जरी 50 च्या आसपास असला तरी तेव्हा तो नकारात्मक खेळला नाही. त्याने धावफलक हलता ठेवला. गेल्या काही वर्षामधला ट्रेंड पाहिला तर बहुतांशवेळा आपल्याला मधल्या फळीने किंवा लोअर मिडल ऑर्डरने पराभवाच्या खाईतून वाचवलंय. पंत, वॉशिंग्टन सुंदर, हनुमा विहारी, अश्विन आणि कंपनीमुळे आपली मधल्या फळीची ताकद वाढली असली तरीही आघाडीच्या ताकदीचं दर्शन अधूनमधून घडत असल्याने त्यांच्यावर जरा अतिच अवलंबून राहावं लागतंय. 

अलिकडच्या काळातील इंग्लंडचा अप्रोच पाहा. आपल्याविरुद्ध टी-ट्वेन्टी वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये म्हणजे नॉकआऊट मॅचमध्ये 168 च्या आव्हानात्मक लक्ष्याचा त्यांनी पालापाचोळा केला. तो याच सकारात्मक आणि आक्रमक खेळाने. अगदी स्टीव्ह वॉची टीम जेव्हा 2001 च्या मोसमात सलग 16 कसोटी जिंकली होती, तेव्हाही त्यांचा ‘अटॅक इज अ बेस्ट वे ऑफ डिफेन्स’चाच नारा असायचा. आपल्याकडे उत्तम दर्जाचे आणि आक्रमक बाणा असलेले खेळाडू असून आपण काही वेळा अकारण बचावात्मक पवित्रा घेतो. ते टाळलं तर भारताचा विजयरथ रोखणं सोपं असणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिका विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन करतानाच याही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, सावध राहायला हवं आणि आक्रमकही. त्यांच्याच भूमीवरील दोन मालिकेतल्या पराभवाने जखमी ऑसी फेब्रुवारीत चाल करुन येतायत. त्यांच्या खेळाची चाल बिघडवण्यासाठी त्यांच्यावरच प्रतिहल्ल्याची चाल खेळायलाच हवी.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget