एक्स्प्लोर

सिनेमा नावाचं हत्यार

अगोदरच आर्थिकदृष्ट्या विकल असणाऱ्या रशियन अर्थव्यवस्थेला वाढीव खर्चाच्या खोल खोल पाण्यात ओढून नेण्याची रिगन यांची योजना यशस्वी झाली आणि रशियन अर्थव्यवस्थेच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचा मान या अंगी नाट्य पुरेपूर मुरलेल्या या माजी हॉलीवूड नटाला मिळाला .पुढचा इतिहास सगळ्यांना माहीतच आहे . आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जगभरात आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर' चा पुरेपूर वापर केला आहे .

काही वर्षांपूर्वी 'द इंटरव्ह्यू' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. दोन अमेरिकन पत्रकार किम जॉन्ग या हुकुमशहाची मुलाखत घ्यायला उत्तर कोरीयात जातात आणि सीआयएच्या मदतीने किम जॉन्गचा काटा काढतात असं या सिनेमाचं कथानक होतं. चित्रपट विनोदी होता आणि यथातथाच होता. पण यात दाखवलेला किम जॉन्ग कसा होता? स्त्रीगुण अंगी असणारा, गोष्टी गोष्टीवर धाय मोकलुन रडणारा आणि बावळट असा. अमेरिकेचे शत्रु समजल्या जाणाऱ्या नेत्याचे हॉलीवूडच्या सिनेमात असे 'कॅरीकेचर' बनण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी पण 'हॉट शॉट' नावाच्या चित्रपटात सद्दाम हुसेनचे असेचं विनोदी चित्रण करण्यात आले होते. २०१२ साली प्रदर्शीत झालेल्या 'द डिक्टेटर' नावाच्या चित्रपटात अलादीन नावाचा हुकुमशहा जनरल गद्दाफीच अर्कचित्र होता . वर उल्लेखित सर्व चित्रपट हे विनोदी होते आणि वरवर पाहता ते निरुपद्रवी वाटु शकतात . पण खरेच तसे आहे का ? हॉलीवूडचे चित्रपट जगभरात कोट्यावधी प्रेक्षक पाहत असतात . त्यांच्या 'अचेतन ' जाणिवांवर याचा काहीच परिणाम होत नसेल का ? शीतयुद्ध जोमात असताना प्रदर्शित झालेल्या 'रॉकी ' चित्रपटात सिल्वेस्टर स्टॅलोन जेंव्हा रशियन भूमीवर जाऊन आपल्यापेक्षा आडदांड रशियन प्रतीस्पर्ध्याला धूळ चारतो तेंव्हा हॉलीवूड उर्वरित जगाला कोण जास्त श्रेष्ठ आहे याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असतं . अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात हॉलीवूडला एक अस्त्र म्हणून वापरलं . शस्त्रास्त्र आणि अण्वस्त्र याबाबतीत अमेरिकेच्या तडीस तोड असणारा रशिया याबाबतीत मात्र अमेरिकेसमोर खूपच तोकडा पडला . रशियाचा पाडाव होण्यात आणि बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत पडण्याच्या ऐतिहासिक घटनेत एका हॉलीवूड चित्रपटाचा छोटा वाटा आहे असे कुणी म्हंटले तर लोक त्याला वेड्यात काढतील . पण ही वस्तुस्थिती आहे . १९८३ साली तात्कालीन अमेरिकन अध्यक्ष रेनॉल्ड रिगन यांनी रशियन क्षेपणास्त्र प्रणालीला शह म्हणून 'स्टार वॉर्स ' या क्षेपणास्त्र प्रतिरोधक कार्यक्रमाची घोषणा केली . अमेरीकेला प्रतिशह देण्यासाठी रशियाला आपल्या संरक्षण खर्चात वाढ करणे भागच होते . लष्करीदृष्ट्या भक्कम पण आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर झालेल्या रशियाला हा बोजा परवडणार नव्हता . जेंव्हा १९८९ साली तात्कालीन 'सोवियेत युनियन ' कोसळले तेंव्हा त्यामागे अतिशय खंगलेली अर्थव्यवस्था हे एक महत्वाचे कारण होते . अर्थव्यवस्था कोसळण्याला हा वाढीव संरक्षण खर्च काही प्रमाणात कारणीभूत होता . वास्तविक पाहता रीगन यांचा 'स्टार वॉर्स' हा कार्यक्रम फक्त कविकल्पना होता. स्वतः एकेकाळी आघाडीचे हॉलीवूड नट असणाऱ्या रिगन यांना ही कल्पना 'स्टार वॉर्स ' आणि इतर काही हॉलीवूड चित्रपटांवरून सुचली होती असा दावा अनेक अमेरिकन तज्ञांनी केला आहे . अगोदरच आर्थिकदृष्ट्या विकल असणाऱ्या रशियन अर्थव्यवस्थेला वाढीव खर्चाच्या खोल खोल पाण्यात ओढून नेण्याची रिगन यांची योजना यशस्वी झाली आणि रशियन अर्थव्यवस्थेच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचा मान या अंगी नाट्य पुरेपूर मुरलेल्या या माजी हॉलीवूड नटाला मिळाला .पुढचा इतिहास सगळ्यांना माहीतच आहे . आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जगभरात आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर' चा पुरेपूर वापर केला आहे . 'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली . राजकारणातली उद्दिष्ट्ये कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकत न वापरता साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे 'सॉफ्ट पॉवर' . एखाद्या देशाची 'सॉफ्ट पॉवर' म्हणजे त्या देशाची सांस्कृतिक मुल्ये , त्या देशाची कला आणि संस्कृती , खाद्य संस्कृती आणि यासारखे अनेक घटक . आपल्या आजूबाजूच्या परिघाचे जाणीवपुर्वक निरीक्षण केले तरी अमेरिकेचा याबाबतीतला वरचष्मा सहज लक्षात येईल . केएफसी , कोकाकोला-पेप्सी , मॅकडोनाल्ड यांच्याबरोबरीनेच हॉलीवूड हा पण अनेक भारतीयांच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे . अनेक अमेरिकन सिरियल्सला भारतात प्रचंड लोकप्रियता लाभली आहे . त्यातूनच अमेरिकेची 'पृथ्वीवरचे नंदनवन ' अशी प्रतिमा बनली आहे . हॉलीवूडने कायमचं आपल्या चित्रपटातून आक्रमक उजव्या अमेरिकन राष्ट्रवादाचा प्रचार केला आहे . जगावर आलेले प्रत्येक संकट निवारण्याची जबाबदारी या जगाचा स्वघोषित नेता म्हणून आमचीच आहे अशी भूमिका अमेरिकन चित्रपट मांडत आलेले आहेत . 'इन्डीपिंडेंस डे ' सारख्या चित्रपटात अमेरिका कशी इतर देशांची तोंडदेखली मदत घेऊन अतिशय शक्तिशाली परग्रहवासियांचा पराभव करते हे दाखवण्यात आले होते . आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असणाऱ्या 'इस्लामिक' दहशतवाद्यांचा बीमोड धीरोदत्त अमेरिकन नायक एकटाकी कसा करतो हे अनेक चित्रपटातून पाहता येत . हॉलीवूड चित्रपट अमेरिकन सरकारचे परराष्ट्र धोरण कसे पुढे रेटतात याचा ज्याला अभ्यास करायचा आहे त्याने अमेरिकन चित्रपटातील खलनायकांचा अभ्यास करावा . ह्या खलनायकांच्या चरित्रनिर्मितीवर अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणाचा ठसा स्पष्ट उमटलेला दिसतो . ८० च्या दशकातला खलनायक हा क्रुर , आडदांड असा रशियन असायचा . शीतयुद्धकाळात रशियन लोकांची जी विशिष्ट नकारात्मक प्रतिमा अमेरिकन माध्यमांनी बनवली त्यातून रशिया अजूनपण पुरतेपणी सावरला नाही . १९९० सालानंतर अमेरिकन चित्रपटात खलनायक हा दाढीवाला आणि कट्टर इस्लामिक बनत गेला . ९/११ च्या अमेरिकन भूमीवर झालेल्या हल्ल्यानंतर तर जवळपास प्रत्येक चित्रपटातला खलनायक हा आशियाई मुस्लिम दाखवण्याची चढाओढ अमेरिकन निर्मात्यांमध्ये सुरु झाली . गेल्या काही वर्षात मात्र त्यांची जागा चीनी किंवा कोरियन खलनायक घेत आहेत . अमेरिकन संरक्षण विभाग 'पेंटागॉन' ची स्वतःच्या मालकीची चित्रपटनिर्मिती संस्था आहे यावरून काय अर्थ घ्यायचा तो समजावून घ्यावा . तर अशा या अमेरिकेला आणि हॉलीवूडला पहिल्यांदाच तडीस तोड उत्तर देणारा प्रतिस्पर्धी तयार होत आहे . तो प्रतिस्पर्धी म्हणजे चीन . चीनी खाद्यसंस्कृती अगोदरच जगभरात लोकप्रिय झाली आहे . आता चीनी चित्रपट पण अमेरिकन आणि युरोपियन मार्केटवर चढाई करण्यास सिद्ध झाले आहेत . सध्या चीनी चित्रपट अमेरिकेत भरपूर गल्ला गोळा करत आहेत . 'कुंग फु पांडा ' सारखा अमेरिकन निर्मिती असणारा पण चीनी जीवनशैलीभोवती फिरणारा चित्रपट अमेरिकेत उत्पन्नाचे उच्चांक तोडतो हे प्रतिमात्मक आहे .जॅकी चेन, दिग्दर्शक आंग ली यासारखे बरेच चीनी वंशाचे दिग्गज अमेरिकेत चीनी संस्कृतीचा प्रसार करण्यात महत्वाचा वाटा उचलत आहेत . ऑस्कर्स पुरस्कारांमध्ये पण चीनी चित्रपट आपली उपस्थिती दाखवून देत आहेत . २००८ च्या भव्यदिव्य ऑलिम्पिकपासून चीनने आपल्या 'सॉफ्ट पॉवर' च्या आक्रमक प्रचाराची मुहूर्तमेढ रोवली . तर 'सॉफ्ट पॉवर'च्या आक्रमक युद्धाची युद्धभूमी तयार झाली आहे . ही लढाई जो जिंकेल त्याचे जगावर वर्चस्व राहील हे निश्चित . अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अतिशय मर्यादा असणारा चीन भारतासारख्या लोकशाही देशाच्या याबाबतीत अनेक योजने पुढे आहे ही बाब वेदनादायक आहे . चित्रपट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर 'प्रपोगंडा' चे साधन होऊ शकते यावर आपल्या राज्यकर्त्यांनी आणि देशातल्या इतर लोकशाही संस्थांनी कधी विचारच केला नाही ही बाब खेदजनक आहे . काहीही विशेष प्रयत्न न करता अनेक आशियाई आणि मध्यपूर्वेच्या देशात भारतीय चित्रपट लोकप्रिय आहेत . अनेक देशात भारतीय चित्रपट हीच आपली ओळख आणि 'सांस्कृतिक राजदूत' आहेत . भारत -चीन संबंध , भारत पाकिस्तान संबंध आणि एकूणच भारत देशाची प्रतिमा यात सिनेमाने मोठी भूमिका बजावली आहे . पण तो एका स्वतंत्र आणि मोठ्या लेखाचा विषय आहे . आपल्याकडे 'प्रपोगंडा' म्हणजे काही तरी वाईट गोष्ट अशी प्रतिमा जनमानसात विनाकारण आहे . यापुर्वीपण 'भांडवलशाही 'म्हणजे अतिशय वाईट गोष्ट असा एक देश म्हणून आपला समज होता . 'प्रपोगंडा' म्हणजे आंतरराष्ट्रीय संबधात उद्दिष्ट साध्य करून घेण्याचे एक साधन आहे . हे पहिले अमेरिकेने आणि आता चीनने सिद्ध केले आहे . आपले याविषयीचे पूर्वग्रह बाजूला सारून आपण त्यासाठी एक देश म्हणून कधी वाटचाल सुरु करणार हा लाखमोलाचा प्रश्न आहे . संबंधित ब्लॉग :

नव्वदच्या दशकातल्या चित्रपट संगीताला कमी का लेखलं जातं?

बॉलिवूडमधल्या पहिल्या हिट अँड रनची गोष्ट

'हम आपके है कौन' आणि आपली बदललेली लग्न

सोशल मीडिया, सिनेमा आणि आपण  चित्रपटांवरच्या बहिष्कारामागचं अ(न)र्थशास्त्र  जोडी नंबर वन कायद्यापेक्षा सत्याशी इमान असणारा ब्योमकेश बक्षी  जसपाल भट्टी-सामान्य माणसाचा कलाकार मित्र  अल्ताफ राजा आणि त्याचा निमशहरी सोशल रिलिव्हन्स राम लक्ष्मण-दुर्लक्षित मराठी सांगीतिक कर्तृत्व सौंदर्यवती  : सोनाली बेंद्रे ब्लॉग : ‘घायल’ आणि ‘घातक’ : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक ब्लॉग : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट सिनेमा ‘बघण्याच्या’ प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू  जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या  एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी! ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ? जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान  अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट  श्रीदेवी नावाचं फेनॉमेन  कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget