एक्स्प्लोर

बर्थडे स्पेशल : भारतीय क्रिकेटचा बिग ‘व्ही’

खऱ्या अर्थाने जेव्हा कोहलीच्या रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर झालं, तेव्हा सचिनची बॅट निवृत्तीच्या सावलीत विसावली होती.

६० कसोटी सामन्यांत ४६५८ रन्स ४९.५५ च्या सरासरीने १७ शतकं, त्यात कर्णधार या नात्याने २९ सामन्यांमध्ये २५६० रन्स ५९.५३ च्या सरासरीने १० शतकं २०२ वनडेत ९०३० रन्स, ५५.७४ ची सरासरी ३२ शतकं, कर्णधार या नात्याने ४३ वनडेत २३१० रन्स ७४.५१ ची सरासरी ज्यात १० शतकं बर्थ डे बॉय कोहलीचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. किंबहुना मोठेपण हा इकडे छोटा शब्द वाटतोय, त्याला त्याच्या करिअरच्या या टप्प्यावर महानच म्हणावं लागेल किंवा मॉडर्न भाषेत इम्पॅक्ट प्लेअरही म्हणता येईल. म्हणजे तीन वेगवेगळ्या एरामधले महान किंवा आयकॉनिक प्लेअर्स जर आपण पाहिले तर ७० च्या दशकात ग्रेट सुनील गावसकर, ८० च्या दशकाच्या अखेरीस किंवा नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला सचिन तेंडुलकर आणि २०००-२०१० च्या १० वर्षांमध्ये उगम झालेला विराट कोहली. तिघांचीही बॅटिंगची शैली भिन्न, काळ भिन्न, त्यांनी फेस केलेले गोलंदाजही तुलनेने वेगळे, म्हणजे सचिन-कोहली ३-४ वर्ष एकत्र खेळलेही. पण, खऱ्या अर्थाने जेव्हा कोहलीच्या रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर झालं, तेव्हा सचिनची बॅट निवृत्तीच्या सावलीत विसावली होती. म्हणजेच गेल्या ५ वर्षात कोहलीने बजावलेली कामगिरी विस्मयचकित करणारी आहे. विशेषत: धोनीकडून त्याने संघाची कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यावर त्याचा परफॉर्मन्स आणखी बहरलाय. अर्थात यातल्या बहुतेक मालिका या घरच्या मैदानावर होत्या, तरीही त्यातलं कोहलीचं आणि टीमचं सामना जिंकण्याचं सातत्य पाहता हा परफॉर्मन्स खरंच टॉप आहे. त्याच्या बॅटिंगमधली सहजता, त्याचं गियर शिफ्ट करणं, त्याची कसोटी,वनडे, टी-ट्वेन्टी, आयपीएल अशा विविध फॉरमॅट्समधली अॅडप्टेबलिटी कमाल आहे. म्हणजे एका आयपीएल मोसमात त्याने चक्क चार शतकं ठोकलीत. यावरुन त्याच्या बॅटला आलेला धावांचा महापूर लक्षात येतो. एका जमान्यात सचिन पीचवर असला की, तो आऊट होऊ नये म्हणून मनात धाकधूक असतानाच एक ठाम विश्वासही असायचा की, तो भारताची नैया पार करेल. विराटच्या बाबतीतही हाच विश्वास वाटतो. किंबहुना काही वेळा तर त्याच्या बॅटिंगचा इझ इतका अफलातून असतो की, हा पॅव्हेलियनमध्येच सेट होऊन आलाय का असा प्रश्न पडावा. टेनिस स्टार रॉजर फेडररच्या प्राईम फॉर्ममध्ये तो इतकाच सहज खेळायचा की वाटायचं, हा घरी सांगून आला असेल जरा आलोच हा एक चॅम्पियनशीप जिंकून. तितक्याच सहजतेने मास्टर ब्लास्टर सचिन खेळायचा आणि आता तितक्याच सहजतेने विराटही खेळतोय. विराटबद्दल आणखी एक कौतुकाची बाब म्हणजे सध्याच्या काळात वाढलेली सामन्यांची संख्या. त्यात आयपीएलच्या भेळ मॅचेसचा रतीब. टी-ट्वेन्टीचा झालेला उदय. तरीही विराटने टिकवलेला तोंडात बोट घालायला लावणारा फिटनेस, त्याच वेळी भन्नाट फॉर्मही. एकही मालिका विराटने दुखापतीमुळे मिस केल्याचं आठवत नाही (कुणाचीही दृष्ट नको लागू दे रे बाबा). बर्थडे स्पेशल : भारतीय क्रिकेटचा बिग ‘व्ही’ गावसकरांच्या कसोटीमधील १० हजार रन्सनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचं पान लिहिलं. सचिनच्या १०० शतकांनी आणखी एक तुरा शिरपेचात खोवला. त्याच मांदियाळीतला कोहली आता विक्रमांचे नवे मनोरे रचतोय. आज तो २९ वर्षांचा झालाय, जेव्हा त्याच्या नावावर वनडेतली ३२ आणि कसोटीतली १७ शतकं आहेत, म्हणजे एकूण शतकं ४९. वनडेतला ९ हजारचा टप्पा सर्वात जलद पार करणारा तो पहिला खेळाडू आता ठरलाय. या लिस्टमध्ये एबी डिविलियर्स, सचिन आणि गांगुलीसारखे दादा बॅट्समन आहेत, या नावांवरुन कोहलीचा क्लास आणि कन्सिस्टन्सी लक्षात येते. याच गतीने तो जर धावा करत राहिला किंवा शतकांचा पाऊस पाडत राहिला तर १०० शतकांची क्रिकेटमधली बुर्ज खलिफा गाठणं त्याला फार कठीण असणार नाही. कोहलीचं मोठेपण मला आणखी एका गोष्टीत वाटतं ते म्हणजे आज जेव्हा मीडिया अटेन्शन इतक्या प्रमाणात वाढलंय, त्या वेळी जितका उदो उदो तुम्ही जिंकल्यावर केला जातो, तितकीच विखारी टीकाही तुमच्या पराभवांच्या वेळी तुमच्या नशिबी येते. त्यात सोशल मीडियावरचं ट्रोलिंग तर काही वेळा इतकं जहरी ठरू शकतं की, ज्यामुळे टीकेचे हे बाण झेलताना खेळाडूंच्या मनावर खोलवर जखम होऊ शकते, जी भरायला बराच अवधी गेला तर त्याचं करिअर पणाला लागू शकतं. त्या काळात कोहलीने हा सोशल मीडियाही खूप स्मार्टली हँडल केलाय, असं आपण म्हणू शकतो. विशेषत: क्रिकेट हा खेळ नसून नसानसात भिनलेला ज्वर असलेल्या आपल्या भारतात हे खेळाडू जितके आपले वाटतात, तितकेच पराभवाच्या क्षणी किंवा निराशाजनक कामगिरीच्या वेळी ते पराकोटीच्या टीकेचे धनी होतात, अर्थात हळूहळू ही परिस्थिती बदलत असली तरीही अजूनही आपण क्रिकेट हृदयाने बघतो, डोळ्याने नाही. त्यामुळे या काळात त्याही अर्थाने खेळाडूच्या मानसिक कणखरतेचा कस लागतो. व्हीडिओ अँनॅलिसिस टेक्निक किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फलंदाजाचे दोष शोधून काढत त्याला वर्क आऊट करणं हे आता आणखी सखोलपणे करता येतं, तिथेही कोहली मोठा प्लेअर म्हणून एस्टॅबलिश झालाय. या मीडिया अटेंशनच्या काळात विराट मैदानाबाहेरचं व्यक्तिगत आयुष्यही अगदी बिनधास्त (बेफिकीर नाही हे महत्त्वाचं) जगतोय. म्हणजे अगदी थेट सांगायचं तर अनुष्कासोबतचं नातं जाहीररित्या दाखवण्यात त्याने कुठेही भिडस्तपणा दाखवलेला नाही, त्याच वेळी याचा आपल्या परफॉर्मन्सवर अजिबात परिणाम होऊ दिलेला नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. एका क्रिकेटरला मिळणारं प्रेम, स्टारडम, पराकोटीची टीका हे सारं सचिनने अनुभवलं, मिळवलं, टिकवलं आणि अतिशय संयतपणे पचवलंदेखील. कोहली हा मॉडर्न जनरेशनचा क्रिकेटर आहे, म्हणजे गेल किंवा अन्य खेळाडूंसोबत नृत्यात थिरकणारा, त्याच वेळी एखाद्या जाहिरातीत अनुष्कासोबत स्क्रीन शेअर करतानाही अभिनयात भाव खाऊन जाणारा तरीही मैदानावर सरस परफॉर्मन्स देणारा. यावरुन त्याची शारीरिक तसंच मानसिक तयारी किती पक्की आहे, हे दिसून येतं. आपण भारतीय क्रिकेटरसिक एका अर्थी खूप भाग्यवान आहोत की गावसकरांच्या कारकिर्दीच्या अस्ताला आपल्याला द ग्रेट सचिन तेंडुलकर गवसला आणि तेजाने तळपला त्याच वेळी सचिनच्या कारकिर्दीच्या संध्याकाळी विराटचा उदय झाला. तोच विराटही त्याच तेजाने उजळून निघालाय. किंबहुना सूर्य जसा माध्यान्हीला सर्वात जास्त तळपतो, त्याच वेळी कोहली करिअरच्या मध्यावर म्हणजे त्याचा फिटनेस आणि सातत्य पाहता तो आणखी किमान १० वर्ष तरी खेळेल असं गृहीत धरलं तर त्याच्या करिअरचा हा परफेक्ट मधला टप्पा आहे. म्हणजेच आणखी किमान १० वर्ष त्याच्या बॅटचे आसूड जगभरातल्या गोलंदाजांवर पडत राहणार. जागते रहो बॉलर्स. अर्थात असं असलं तरीही मंजिल बहोत दूर है...विशेषत: कॅप्टनच्या भूमिकेतून परदेशातील सामन्यांमधील कामगिरी उंचावणं फार आवश्यक आहे. खास करुन ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लड या तीन देशात त्याचा आणि टीमचा तिन्ही फॉरमॅटमधला एकत्रित मोठा परफॉर्मन्स म्हणजे अगदी स्पेसिफिक सांगायचं तर मॅच किंवा सीरीज विनिंग. हे कॉम्बिनेशन जुळून आलं तर कोहली ग्रेट प्लेअरसोबत ग्रेट कॅप्टनदेखील होऊ शकेल. बॉलिवूडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्ष अधिराज्य केलं, अगदी केबीसीच्या माध्यमातून छोटा पडदाही खिशात घातला. त्याच प्रमाणे क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा कोहली हा बिग व्ही झालाय, असं मला वाटतं. त्याला जागतिक क्रिकेटचा बिग व्ही होण्यासाठी पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCyber Police Nagpur : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजरMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Embed widget