एक्स्प्लोर

40. चालू वर्तमानकाळ : मनातल्या मनात मी

‘माणसं झोपेत चालतात, तसं झोपेत लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं,’ या मुद्द्यावर मी ‘ग्राफिटीवॉल’मध्ये 11 वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता. ही कल्पना आता सत्यात उतरणार असं दिसतंय.

‘माणसं झोपेत चालतात, तसं झोपेत लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं,’ या मुद्द्यावर मी ‘ग्राफिटीवॉल’मध्ये 11 वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता. ही कल्पना आता सत्यात उतरणार असं दिसतंय. नवनवं तंत्रज्ञान येत असतंच, त्यामुळे अनेक चांगले-वाईट बदल होत असतात; मात्र या दशकात नव्या तंत्रज्ञानाच्या येण्याचा आणि बदलांचा वेग प्रचंड आहे. गोष्टी इतक्या झटकन कालबाह्य होताहेत की, भांबावून जायला होतं. कालबाह्य होण्याहूनही एखादी ‘बाद’ होणं, हे अजून अवघड. काही किड्यांची, फुलांची आयुष्यं जशी काही तासांची असतात, तसं आता वस्तूंचं होऊ लागलं आहे. त्यामुळे नवनव्या गोष्टी सतत शिकत राहण्याचा ताण सर्व वयोगटांच्या माणसांच्या मनावर उमटू लागला आहे. माणसानं आयुष्यभर विद्यार्थी असावं, हे आता उपदेश म्हणून कुणी निराळं सांगण्याची गरजच राहिलेली नाहीये. शाईचं पेन, बॉलपेन वगैरे पेनांपासून ते थेट कॉम्प्युटरवर लिहिता येण्याचा प्रवास माझ्या पिढीने पाहिला. काही दिवसांपासून मी कॉम्प्युटरला लिहिण्याचा मजकूर ‘डिक्टेट’ करण्यास सुरुवात केली. हा एक मजेशीर अनुभव होता. मनात ज्या वेगाने विचार, कल्पना येतात त्या वेगाशी लिहिण्याचा वेग मेळ खात नाही, हा अनुभव अनेकदा घेतला होता. दिवसभरात जास्तीत जास्त किती तास बैठक मारून पेनाने लिहू शकू वा हातांनी टंकू शकू, याला प्रचंड मर्यादा तर होत्याच; खेरीज या बैठ्या कामांमुळे शारीरिक दुखणीही सुरू होतातच. लिहिण्याच्या वेगाहून मनातलं बोलण्याचा वेग कितीतरी जास्त आहे, हे मी कॉम्प्युटरला ‘डिक्टेट’ करू लागल्यानंतर ध्यानात आलं. अर्थात त्यासाठी जे काही लिहायचं आहे, ते आपल्या मनात अगदी स्पष्ट, स्वच्छ असलं पाहिजे हे बाकी खरं. मला अजून तरी ही अडचण कधी जाणवलेली नसल्याने प्रश्न उद्भवला नाही. दुसऱ्या एका तंत्राने जुने संदर्भ नव्याने टाईप करून घेत बसण्याचं आणि हाताने लिहिलेलं टाईप करण्याचं कामही कमी केलं. स्कॅन केलेला मजकूर युनिकोडमध्ये रुपांतरीत करून देणारं एक सॉफ्टवेअर हाती लागलं. या तंत्रज्ञानाचा आनंद घेत असतानाच अजून दोन बातम्या हाती आल्या. पहिली बातमी डॉ. दिना कटाबी या तरुणीने बिनतारी संदेशवहनात केलेल्या संशोधनाची आहे. “माणसाच्या अंगावर जाऊन आदळणाऱ्या रेडीओलहरी जेव्हा परत येतात, तेव्हा त्यांचं विश्लेषण करून त्या माणसाच्या भावावस्थेचा अंदाज घेता येऊ शकतो,” असा निष्कर्ष सांगणारा एक शोधनिबंध तिने लिहिला. त्यावर आधारित यंत्रही निर्माण केलं. भिंतीपलीकडे एखाद्या माणसाला थांबवून या यंत्राच्या मदतीने त्याच्या मनातल्या खळबळी टिपता येऊ लागल्या. या उपकरणावर ती अजून काम करते आहेच, त्यातून अधिक अद्भुत असं काही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. देहबोली ‘वाचून’ अंदाज बांधणारी माणसं असतातच, पण त्यांना शब्द न शब्द वाचता येत नाही अर्थात. आता कॉम्प्युटरच्या मदतीने मनातला एकेक शब्द टिपता येणारं तंत्रज्ञानदेखील येऊ घातलंय. दुसरी बातमी ही या ‘अल्टर इगो’ तंत्राची आहे आणि हे तंत्र विकसित करणाऱ्या गटाचं नेतृत्व अर्णव कपूर नावाचा भारतीय तरुण करत आहे, ही त्यातली आनंदात भर घालणारी गोष्ट. आता हे ‘अल्टर इगो’ प्रकरण काय आहे? तर कानामागे डकवून ओठांपर्यंत येणारं एक उपकरण कॉम्प्युटरला जोडलेलं असतं, ते आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचं. मनात आपण जे काही स्वत:शी ‘बोलतो’ ते सगळे शब्द हे उपकरण टिपतं. हे घडतं कसं? तर आपण मनातल्या मनात जरी बोलत असलो तरी त्या बोलण्याने काही सूक्ष्म शारीरिक हालचाली होतच असतात. जबडा व बाकी चेहरा यांच्यामध्ये मज्जासंस्था व स्नायूंशी संबंधित विविध ‘न्यूरोमस्क्युलर संदेश’ या हालचाली निर्माण करतात. डोळ्यांना न दिसणारे, स्पर्शांना न जाणवणारे, किंबहुना व्यक्तीला स्वत:लाही न कळणारे असे हे सूक्ष्म संदेश ‘अल्टर इगो’मधले इलेक्ट्रोड्स टिपतात आणि कॉम्प्युटरमध्ये जमा करतात. त्या संदेशांचे अर्थ लावून नेमके शब्द लिहून काढण्याचं पुढचं काम कॉम्प्युटर करतो. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणांची निर्मिती करण्याच्या विविध प्रयत्नांमधला हा एक प्रयत्न होता आणि तो अनेक प्रयोगांनंतर यशस्वी ठरला हे विशेष. लेखकांना मनातलं वेगाने लिहून काढता येणं हा फायदा अर्थातच गमतीचा आहे आणि मर्यादित तर आहेच आहे. लेखक नसलेल्या लाखो लोकांना त्याचा काय उपयोग होईल हे अधिक महत्त्वाचं. आपल्या मनातलं सगळं असं टिपून काढलं तर वेगाने येऊन जाणाऱ्या अनेक भावना, ज्या आपल्यालाही स्पष्ट उलगडलेल्या नसतात, त्याही स्पष्ट होत जातील. ‘मला असं वाटत नव्हतं’ किंवा ‘मला वेगळंच काही म्हणायचं होतं’ अशी स्पष्टीकरणं आपण अनेकदा स्वत:लाही देत असतो आणि स्वत:शीही खोटं वागण्याचा फिजूल प्रयत्न करत असतो, तो यामुळे व्यर्थ ठरेल. ‘अल्टर इगो’ हा मनाचा आरसा असल्याने आपल्या भावनांची तीव्रता आणि आपल्या विचारांमधले गोंधळ / स्पष्टता / विरोधाभास वगैरे स्पष्ट होत जातील. त्यातून आपलं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे, हे ओळखण्यास मदत होईल आणि त्यानुसार स्वत:तील कौशल्यं वाढवता येतील व दोष दूर करता येतील. कोणत्याही तंत्रज्ञानाचे फायदे असतात, तसे तोटेही असतातच. या फायद्यातोट्याचे असे शेकडो कल्पनाविलास करता येतील. या बदलाला लोक कसं स्वीकारतील, कसं सामोरं जातील, हे काळच ठरवेल. मला धास्ती वाटतेय ती त्यापुढच्या टप्प्याची. आज साधं टाईप करताना एक अक्षर टंकताच शब्दांचे पर्याय समोर येतात; एका इमेलला उत्तर द्यायचं म्हटलं की कॉम्प्युटर ते मेल आधीच वाचून उत्तरांचे पर्याय भराभर सुचवतं; तसं मनात एक शब्द उमटताच तुमचे पुढचे विचार वा पुढच्या कल्पना काय असतील हेही कॉम्प्युटर ठरवू लागला, तर किती घोळ होतील?

संबंधित ब्लॉग :

चालू वर्तमानकाळ (39) : लेदर करन्सीच्या पायघड्या

चालू वर्तमानकाळ : 38. आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा...

चालू वर्तमानकाळ : 37. वंचितांच्या यशाची शिखरं चालू वर्तमानकाळ : 36. अजून कशा- कशासाठी कोर्टात जायचं? चालू वर्तमानकाळ 35. त्या पळाल्या कशासाठी? चालू वर्तमानकाळ 34. बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे   चालू वर्तमानकाळ : 33. अभ्यासकाचे जाणे! चालू वर्तमानकाळ : 32 आमचा काय संबंध! चालू वर्तमानकाळ : (31) आमचा काय संबंध! चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!    चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे  चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा? चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो…  चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही… चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’   चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget