(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : तुमच्या कपाटात 'या' गोष्टी असतील तर आजच काढा, आर्थिक समस्या वाढेल, वास्तुशास्त्रात म्हटंलय...
Vastu Tips : वास्तुशास्त्रात कपाट आणि लॉकर्सचे काही नियम दिलेले आहेत. कारण कपाटात चुकीच्या गोष्टी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनहानी होते.
Vastu Tips : लोक पैसे, महत्त्वाची कागदपत्रे आणि दागिने इत्यादी लॉकर किंवा कपाटात ठेवतात. पण यासोबतच काही लोक इतर गोष्टीही कपाटात ठेवतात, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचे नकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर होते आणि आर्थिक समस्येला आमंत्रण मिळते. त्यामुळे वास्तुशास्त्रात अशा 4 गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या कधीही कपाटात ठेवू नयेत. तुमच्या कपाटात किंवा लॉकरमध्ये यापैकी कोणतीही वस्तू असल्यास ती ताबडतोब काढून टाका. कारण या गोष्टी तुमची तिजोरीही रिकामी करू शकतात. या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार कपाट आणि लॉकर्सचे काही नियम
वास्तुशास्त्रात कपाट आणि लॉकर्सचे काही नियम दिलेले आहेत. कारण कपाटात चुकीच्या गोष्टी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनहानी होते. त्यामुळे आजच त्यांना कपाटातून काढून टाका.
परफ्यूम
परफ्यूम कपाटात ठेवू नये. बरेच लोक असे करत असले तरी वास्तुनुसार हे अत्यंत चुकीचे मानले जाते. सुवासिक अत्तर कपाटात ठेवल्याने वास्तुदोष होतात, त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
आरसा
काही लोक त्यांच्या कपाटात आरसे लावतात. पण हे करू नये. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या आर्थिक स्थितीसाठी शुभ मानले जात नाही. त्यामुळे कपाटांमध्ये आरसे लावणे टाळावे.
फाटलेले कागद
फाटलेले किंवा टाकाऊ कागद कपाटात ठेवू नयेत. हे पैसे संबंधित समस्या वाढवण्याचे काम करतात आणि त्याच वेळी नकारात्मक ऊर्जा देखील वेगाने वाढते.
काळे कापड
बरेच लोक कपड्यात किंवा बंडलमध्ये पैसे गुंडाळून ठेवतात. पण लक्षात ठेवा की ज्या वस्तूमध्ये पैसे ठेवले आहेत त्या वस्तूचा रंग काळा नसावा. काळ्या कपड्यात पैसे गुंडाळून ठेवल्याने आर्थिक नुकसानही लवकर होते.
वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण बनतात
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. आम्ही तुम्हाला असे काही वास्तू दोष सांगणार आहोत जेणेकरुन तुम्ही ते तपासून दूर करू शकता
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Vastu Shashtra : 'असे' वास्तू दोष घरातील आर्थिक संकटाचे कारण असू शकतात, तुमच्या घरात तर नाही ना? जाणून घ्या