Vastu Shashtra : 'असे' वास्तू दोष घरातील आर्थिक संकटाचे कारण असू शकतात, तुमच्या घरात तर नाही ना? जाणून घ्या
Vastu Shastra for Home : जाणून घ्या अशी कारणे, ज्यामुळे घरामध्ये वास्तु दोष निर्माण होतात, जेणेकरुन तुम्ही देखील ते वेळीच दूर करू शकाल.
![Vastu Shashtra : 'असे' वास्तू दोष घरातील आर्थिक संकटाचे कारण असू शकतात, तुमच्या घरात तर नाही ना? जाणून घ्या Vastu Shastra for Home vastu dosh in home will bring poverty Vastu Shashtra : 'असे' वास्तू दोष घरातील आर्थिक संकटाचे कारण असू शकतात, तुमच्या घरात तर नाही ना? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/26/1d3634753c5a36f40ac0fd52b7feb21c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Shashtra : तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुमची इच्छा असूनही पैसा वाचवता येणार नाही. घरात आशीर्वाद राहणार नाहीत आणि तुमच्या कुटुंबात सुख-शांती राहणार नाही. जाणून घ्या अशी कारणे, ज्यांमुळे घरामध्ये वास्तु दोष निर्माण होतात, जेणेकरुन तुम्ही देखील ते वेळीच दूर करू शकाल.
वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण बनतात
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. आम्ही तुम्हाला असे काही वास्तू दोष सांगणार आहोत जेणेकरुन तुम्ही ते तपासून दूर करू शकता.
बेड समोर आरसा
बेडरूममध्ये पलंगाच्या समोर आरसा ठेवणे अत्यंत चुकीचे मानले जाते. हे वास्तुदोषाचे प्रमुख कारण आहे. तुमच्या घरातही असेच असेल तर आता बदला. अशा घरांमध्ये पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे होतात आणि सुख-शांतीचा अभाव असतो. चुकूनही बेडसमोर आरसा लावू नका. जर ते काढणे शक्य नसेल तर ते झाकून ठेवा.
स्वयंपाकघरात एकाच दिशेला गॅस स्टोव्ह आणि पाण्याचा स्रोत
तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात गॅसचा स्टोव्ह आणि पाण्याचा स्रोत एकाच दिशेला असेल तर तोही एक प्रमुख वास्तुदोष आहे. लगेच दुरुस्त करा. स्वयंपाकघरात गॅसची शेगडी दक्षिण दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. या दिशेने ठेवल्याने परस्पर संबंध चांगले राहतात आणि पैशाची कमतरता भासत नाही.
तुटलेले दरवाजे आणि खिडक्या
जर तुमच्या घरातील खिडक्या आणि दरवाजे तुटलेले असतील किंवा त्यांचा आवाज येत असेल तर हा वास्तुदोष मानला जातो. लगेच दुरुस्त करा. खिडक्या आणि दारांमधून येणारा कोणताही आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे त्यांच्या बिजागरांना वेळोवेळी तेल घालत राहा, जेणेकरून आवाज होणार नाही.
घराच्या मध्यभागी जड वस्तू
जर तुमच्या घराच्या मध्यभागी जड वस्तू ठेवली असेल तर ती लगेच काढून टाका. असे झाल्यावर कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती कर्जाच्या ओझ्याने दबलेला राहतो आणि त्याला कधीही आराम मिळत नाही. घराच्या मध्यभागी चुकूनही जड वस्तू ठेवू नका. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही बाधित होतो.
मुख्य दरवाजासमोर अडथळा
घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मुख्य दरवाजासमोर कोणतेही मोठे झाड, मोठा खांब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा याची नोंद घ्यावी. यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तुमच्या घरातून निघून जाते. अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवादरम्यान 'या' शुभ गोष्टी घरी आणा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)