(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षानंतर सूर्याचा मित्र राशीत प्रवेश; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य लवकरच वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे 3 राशींचे अच्छे दिन सुरू होऊ शकतात. या राशींना या काळात अफाट धन-संपत्ती लाभेल.
Sun Transit 2024 In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य देवाला ग्रहांचा राजा मानलं जातं. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्यदेवाच्या हालचालीत बदल होतो, तेव्हा त्याचा विशेष परिणाम सर्व राशींवर होतो, जगावर होतो. त्यातच आता नोव्हेंबरमध्ये सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे, यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं, त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
सूर्यदेवाचे भ्रमण तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. सूर्य तुमच्या राशीतून पाचव्या भावात प्रवेश करणार आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, या काळात तुम्हाला व्यवसायात नवीन डील मिळू शकतात, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. नोकरदार लोकांचीही प्रगती होईल. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण शुभ सिद्ध होऊ शकतं, कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून धन आणि वाणी घरात होणार आहे, त्यामुळे या काळात तुमच्या मनात नवीन विचार येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, तुमच्या बोलण्यावर लोक प्रभावित होतील. यावेळी गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला दुप्पट नफा मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर व्यावसायिकांना कर्जाचे पैसे परत मिळू शकतात. यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल, तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचा राशी बदल शुभ ठरू शकतो, कारण सूर्य देव तुमच्या राशीतून कर्म गृहात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती पाहायला मिळेल. तसेच, बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच, नोकरदार लोकांच्या पगारात वाढ झाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यावेळी, तुमच्या वडिलांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसेच तुमच्या नियोजित योजना पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Vastu Tips : जुन्या कपड्यांनी लादी पुसणं पडेल महागात; गरिबी येईल चालून, शास्त्र सांगते...