(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajyog : तब्बल 500 वर्षानंतर बनतायत शश, मालव्य आणि भद्र राजयोग! दिवाळीपासून 3 राशींना सोन्याचे दिवस; नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ
September 2024 Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरमध्ये एकत्र 3 राजयोगांची निर्मिती होत आहे, ज्यामुळे काही राशींना सोन्याचे दिवस येतील.
September 2024 Triple Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह वेळोवेळी राशी बदलतात, तेव्हा अनेक वेळा शुभ राजयोग तयार होतात, ज्याचा परिणाम सर्व जगावर होतो. यातच आता सप्टेंबर महिन्यात 3 राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे काही राशींचं नशीब पालटू शकतं.
शनि स्वतःच्या कुंभ राशीत भ्रमण करताना शश राजयोग (Shash Rajyog) तयार करेल. ग्रहांचा राजकुमार बुध 23 सप्टेंबरला स्वतःच्या कन्या राशीत प्रवेश करून भद्रा राजयोग (Bhadra Rajyog) तयार करेल. याशिवाय संपत्तीचा दाता शुक्र देखील 18 सप्टेंबरला स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करत मालव्य राजयोग (Malavya Rajyog) निर्माण करेल.
हा एक विचित्र योग आहे, ज्यात 3 मोठे ग्रह आपापल्या राशीत फिरून एकाच वेळी 3 राजयोग तयार करतील. यामुळे दिवाळीपूर्वी काही राशींचं नशीब चमकू शकतं. तसेच, यावेळी तुम्हाला विशेष सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. या काळात नेमक्या कोणत्या राशींचं नशीब उजळणार? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn)
तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते, कारण शनि तुमच्या राशीतून धन गृहात प्रवेश करत आहे. दिवाळीच्या आसपास तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची अपार प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात नशीबही तुमच्या बाजूने असेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती अनुकूल ठरू शकते. या काळात तुमचं नशीब उजळू शकतं. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल, या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.
धनु रास (Sagittarius)
तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या धाडसात आणि शौर्यामध्ये वाढ झालेली दिसेल. नोकरी आणि व्यवसायातही चांगली प्रगती होऊ शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी होईल आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: