एक्स्प्लोर

Shani Dev : मारुतीरायाची पूजा करणाऱ्यांना शनि का त्रास देत नाही? जाणून घ्या खरं कारण

Shani Dev : धार्मिक मान्यतेनुसार भगवान हनुमानजींची पूजा करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. यामागचं कारण नेमकं काय आहे? पौराणिक कथा जाणून घ्या

Shani Dev : हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेच्या पूजेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे शनिवार आणि मंगळवारचा दिवस हा मारुतीरायाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो, म्हणजेच हा दिवस हनुमानजींच्या (Hanuman) उपासनेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहे.

मारुतीसोबत शनिदेवाची पूजा करणं शुभ

धार्मिक मान्यतेनुसार, शनिवारी आणि मंगळवारी तुम्ही मारुतीरायासोबत शनिदेवाचीही पूजा करू शकता. मारुतीची, म्हणजेच हनुमानाची पूजा करणार्‍या भक्तांवर शनिदेवाची (Shani Dev) कृपा सदैव राहते, असं म्हणतात.

मारुतीरायाच्या पूजेने शनिदेव का प्रसन्न होतात?

हनुमान आणि शनिदेवाचा काय संबंध आहे? हनुमानजींच्या पूजेने शनिदेव का प्रसन्न होतात? हा प्रश्न नेहमीच अनेकांच्या मनात येतो. याच्याशी संबंधित एक पौराणिक कथा आहे, ज्यामध्ये त्याचं कारण सांगितलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

नेमकं कारण काय?

हनुमानजी आणि शनिदेव यांची पौराणिक कथा ही त्रेतायुगातील रामायण काळातील आहे. जेव्हा रावणाने देवी सीतेचं अपहरण करून तिला लंकेत नेलं, तेव्हा रामाच्या आज्ञेवरून हनुमानजी देवी सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले. हनुमानजी जेव्हा लंकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की, रावणाने शनिदेवाला आधीच कैद करून ठेवलं होतं. त्यावेळी हनुमानजी देवी सीतेला सोबत घेऊन जाऊ शकले नाही. कारण देवी सीता म्हणाली की, जेव्हा भगवान श्रीराम तिला न्यायला येतील तेव्हाच ती त्यांच्यासोबत जाईल. त्यावेळी हनुमानजींनी शनिदेवाची मदत करून त्यांना रावणाच्या तुरुंगातून बाहेर काढलं. जेव्हा हनुमानजींनी शनिदेवाची मदत केली, तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी हनुमानजींना त्या बदल्यात काही वरदान मागायला सांगितले.

हनुमानाची पूजा करणाऱ्यावर नसते शनीची वक्रदृष्टी

शनिदेवाने हनुमानजींना वरदान मागण्यास सांगितलं तेव्हा हनुमानजी म्हणाले - जो भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो, त्याला तू कधीही शिक्षा करणार नाहीस. त्यांच्या वचनानुसार शनिदेवाने हनुमानजींना होकार दिला. यानंतर शनिदेवाच्या पूजेसोबतच शनिवारी हनुमानजींची पूजा होऊ लागली.

शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर...

त्यामुळे जर तुम्हालाही शनिदेवाची कृपा मिळवायची असेल, तसेच शनीच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करू शकता. यासोबतच या दोन्ही शनिदेवाशी संबंधित उपायही करू शकता. याने तुम्हाला शनिदेव आणि हनुमानजी या दोघांचाही आशीर्वाद मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Jupiter Transit : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू बृहस्पतीचा वृषभ राशीत प्रवेश; 'या' 3 राशींना येणार 'अच्छे दिन', धन-संपत्तीत होणार वाढ

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 July 2026: आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs 3 July 2026 : 3 जुलैचा दिवस नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
3 जुलैचा दिवस नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
Ravi Pradosh Vrat 2026 : जुलै महिन्यात पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शिव पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी
जुलै महिन्यात पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शिव पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget