Jupiter Transit : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश; 'या' 3 राशींना येणार 'अच्छे दिन', धन-संपत्तीत होणार वाढ
Jupiter Transit In Taurus : गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे 2024 या वर्षात अनेकांचं नशीब उजळणार आहे. विशेषत: 3 राशींना गुरुच्या या मार्गक्रमणाचा फायदा होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
![Jupiter Transit : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश; 'या' 3 राशींना येणार 'अच्छे दिन', धन-संपत्तीत होणार वाढ guru gochar 2024 jupiter transit in taurus after 12 years these zodiac signs will get huge benefit and increase in wealth Jupiter Transit : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश; 'या' 3 राशींना येणार 'अच्छे दिन', धन-संपत्तीत होणार वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/11/2299b275b887bc3bcad508861c54c0801712819396501499_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jupiter Transit 2024 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी गुरू (Jupiter) हा एक अतिशय खास ग्रह मानला जातो. गुरूचं संक्रमण हे सर्वात मोठ्या ज्योतिषीय घटनांपैकी एक आहे आणि धार्मिकदृष्ट्या याला विशेष महत्त्व आहे. गुरुच्या राशी परिवर्तनाचा अनेक राशींवर परिणाम होतो. गुरु ग्रह एका राशीत सुमारे 13 महिने राहतो. गुरुला एकाच राशीत परत येण्यासाठी सुमारे 12 वर्षांचा काळ लागतो.
सध्या गुरू मेष राशीत स्थित आहे. गुरू 1 मे रोजी दुपारी 2:29 वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीत गुरुने प्रवेश केल्यास काही राशीच्या लोकांना याचा फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांना या काळात काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गुरुने वृषभ राशीत प्रवेश केल्यावर नेमकं कोणत्या राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळेल? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
गुरु मेष राशीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल, याचा मेष राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल. मेष राशीच्या लोकांचं नशिबाचं दार उघडेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जास्त चिंता करावी लागणार नाही. नोकरीत तुम्हाला अफाट यशासोबत बढतीही मिळू शकते. गुरु मेष राशीच्या दुसऱ्या घरात गेल्याने तुम्हाला खूप आर्थिक फायदा होईल. यासोबतच तुम्ही या काळात पैशांची चांगली बचत कराल. विवाह योग असलेल्या व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कर्जातून तुमची सुटका होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. कुटुंबात चाललेले वाद समाप्त होतील.
वृषभ रास (Taurus)
या राशीच्या चढत्या घरात गुरुचं भ्रमण होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रत्येक कामात यश मिळू शकतं. या काळात प्रवासाचीही शक्यता आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. घरात एखादं धार्मिक कार्य घडेल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. या काळात तुम्ही चांगले पैसे कमवाल. गुरुच्या संक्रमणाचा लव्ह लाईफवर चांगला परिणाम होईल. हे वर्ष प्रेमविवाहाचं वर्ष म्हणून ओळखलं जात आहे. तुम्हाला या वर्षी वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. नशिबाने साथ दिल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
कर्क रास (Cancer)
या राशीच्या अकराव्या घरात गुरु ग्रह प्रवेश करणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुचं हे संक्रमण खूप महत्वाचं ठरेल. कर्क राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जीवनातील प्रत्येक अडथळे संपतील. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यवसायाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. देवगुरूच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदा होईल. यातून तुम्हाला काही मोठी डील किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामामुळे तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करू शकता. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, यात नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)