Mars Transit 2024 : फेब्रुवारीत मेषसह 'या' 2 राशींना मिळणार लाभच लाभ; जेव्हा मंगळ बदलणार आपली चाल
Mars Transit 2024 : सध्या मंगळ हा धनु राशीत विराजमान आहे. लवकरच मंगळ आपली चाल बदलणार आहे, ज्यामुळे काही राशींवर याचा सकारात्मक परिणाम होईल.
Mangal Gochar : फेब्रुवारी महिन्यात ग्रहांचा सेनापती मंगळ आपली चाल बदलणार आहेत. सध्या मंगळ धनु राशीत स्थित आहे. इतर ग्रहांप्रमाणे मंगळाच्या चालीचा देखील सर्व राशींवर परिणाम होतो. मंगळ 5 फेब्रुवारी रोजी, म्हणजेच सोमवारी रात्री 09:56 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. धनु राशीतून मकर राशीतील मंगळाचं मार्गक्रमण काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
शनीप्रमाणे मंगळाचं (Mars) राशी परिवर्तन देखील मानवी जीवनावर सखोल परिणाम करणारं ठरतं. मंगळाचं मकर राशीतील मार्गक्रमण 3 राशींसाठी शुभ ठरेल. मंगळाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना जबरदस्त फायदा होईल? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांना मकर राशीतील मंगळ प्रवेशाचा फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांना जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमच्या नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुमचा सन्मानही वाढेल. या काळात तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल. तुम्हाला कुटुंबाकडून सर्व प्रकारचं सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. नोकरीमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. या राशीच्या लोकांना नवीन नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल, तुम्ही व्यवसायात काही नवीन योजना आखाल.
धनु रास (Saggitarius)
मंगळाचं राशी परिवर्तन धनु राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. या काळात तुमच्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुम्हाला कामानिमित्त परदेशातही जावं लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते. तुमचे कौटुंबिक जीवन खूप चांगले असेल. उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. पैसे जमा करण्यात, पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्ही सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. तुमचं कामावर लक्ष राहील. तुम्हाला खूप प्रोडक्टिव्ह वाटेल, या काळात तुमचा आत्मविश्वास वाटेल. तुम्हाला धार्मिक गोष्टींमध्ये रस राहील. फेब्रुवारी महिन्यात तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचं काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन ठेवा. ऑफिसमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : शनि कुंभ राशीतच राहणार; 2025 पर्यंत 'या' राशी असणार भाग्यवान, प्रगतीचे दरवाजे उघडणार