(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : शनि कुंभ राशीतच राहणार; 2025 पर्यंत 'या' राशी असणार भाग्यवान, प्रगतीचे दरवाजे उघडणार
Shani Dev : शनि देव 2025 पर्यंत कुंभ राशीतच विराजमान राहणार आहेत. शनीची ही स्थिती काही राशींसाठी खूप लाभदायी ठरणार आहे.
Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता म्हणून ओळखलं जातं. सध्या शनिदेव (Shani Dev) कुंभ राशीत विराजमान आहेत, शनि या वर्षी कुंभ राशीतच राहणार आहे. नवीन वर्ष 2024 मध्ये शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार नाही. परंतु या वर्षी शनिदेव (Shani Dev) कुंभ राशीतच आपली हालचाल बदलत राहील.
शनिदेव 2025 पर्यंत कुंभ राशीत राहणार आहेत. कुंभ ही शनीची मूळ राशी मानली जाते. कुंभ राशीत शनि असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग देखील तयार झाला आहे. केंद्र त्रिकोण राजयोग व्यक्तीच्या यशाची दारं उघडतो आणि आयुष्यात आनंद, समृद्धी देखील वाढवतो. शनिमुळे बनलेल्या राजयोगांचा शुभ परिणाम काही राशींवर होणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे 2025 पर्यंत 3 राशी भाग्यवान ठरणार आहेत. या 3 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
तूळ रास (Libra)
कुंभ राशीत बसलेला शनि तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. शनिच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. तब्येतीत काही चढ-उतार होतील, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते, या काळात तुम्ही अभ्यासात प्रगती कराल. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील.
सिंह रास (Leo)
कुंभ राशीत शनि विराजमान असणं सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. लव्ह लाईफमध्ये काही चढ-उतार येतील, जे बोलून आणि चर्चा करुन सोडवता येतील. तुमची करिअर लाईफ चांगली असेल, नोकरीत तुमची प्रगती होईल. नवीन वर्षात तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
मेष रास (Aries)
कुंभ राशीत बसलेला शनि मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या नोकरीत तुम्हाला काही नवीन कामं मिळू शकतात, ती पूर्ण मेहनतीने करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयमाने प्रश्न सोडवा. तुमची वर्षानुवर्षे रखडलेली कामं पूर्ण होतील. तुम्हाला या काळात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : शनिदेव तुम्हाला कधी करेल लखपती? फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात