(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Holi 2024: धुळवडीवर चंद्रग्रहणाचे सावट! यंदा ग्रहणात लहान मुलांनी रंग खेळावा का? ज्योतिषाचार्य अनीष व्यास सांगतात...
Holi 2024: यंदा धुलीवंदनावर चंद्रग्रहणाचे सावट आहे. अनेकांच्या मनात असंख्य प्रश्न आहे. परंतु ज्योतिषाचार्य डॉ. अनीष व्यास यांनी या विषयी सविस्तर माहिती दिली आहे.
Holi 2024: चंद्रग्रहण ही जरी खगोलीय घटना असली तरी पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहण आणि चंद्रग्रहण (Eclipse) या घटनांना फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला 25 मार्च 2024 रोजी या नव्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. एक , दोन नव्हे तर 100 वर्षानंतर धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण आहे. यंदा धुलीवंदनावर चंद्रग्रहणाचे सावट आहे. अनेकांच्या मनात असंख्य प्रश्न आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण असले तरी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काही कारण नाही. चंद्रग्रहण हे सामान्य चंद्रग्रहण नसून ते उपछाया चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणर नाही त्यामुळे वेदाचे पालन करण्यची गरज नाही, पण तरीसुद्ध काही गोष्टीं पालन करणे आवश्यक आहे. चला तर मगजाणून घेऊ कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत? आणि कोणच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
100 वर्षानंतर धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण, लहान मुलांनी रंग खेळावा का?
यंदा धुलीवंदनच्या दिवशी चंद्र ग्रहणाचा योग बनत आहे. तब्बल 100 वर्षानंतर हा योग येत असल्याने यंदाची होळी आणि ग्रहण खास आहे. पंचगानुसार 25 मार्च रोजी चंद्रग्रहण 4 तास 36 मिनिटे असणार आहे. चंद्र ग्रहण सकाळी 10 वाजून 24 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 1 मिनिटापर्यंत असणार आहे. धुलीवंदनाच्या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे सण कसा साजरा करावा यासाठी लोक चिंतेत असताना लहान मुलांना मात्र रंग कसे खेळणार असा प्रश्न भेडसावत आहे. मात्र लहानांनी आणि मोठ्यांनी कोणीही काळजी करण्याची गरज नाही. कारण या ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होणार नाही.
ग्रहणात काय दान करावे?
भारतात ग्रहण दिसणार नसल्याने देवाची पुजा करता येणार आहे. फक्त ज्यांच्या राशीमध्ये राहु - केतू आहेत त्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. तर गर्भवती महिलांनी देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्योतिषाचार्यांच्या मते, ग्रहणाच्या समाप्तीनंतर काळे तीळ, काळे वस्त्र, उडीद, पीठ, तांदूळ, साखर आणि पांढरे वस्त्र दान करावे.
होलिका दहनाचा शुभ मुहुर्त
महाराष्ट्रात नाही तर पूर्व भारतात भद्राला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तिथे भद्रकाळात होलिका दहन केलं जातं नाही. यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे का? हिंदू पंचागानुसार यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे. हिंदू धर्मानुसार आणि पौराणिकेत उल्लेखानुसार भद्रा काळात होळी पेटविणे हे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की, यमराज हा भद्राचा स्वामी आहे. त्यामुळे भद्रा काळात कुठलही शुभ कार्य करायला नको, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. होलीका दहनाचा शुभ मुहुर्त 24 मार्चला भद्रा काळ संपल्यानंतर रात्री 11 वाजून 13 मिनिटे ते मध्यरात्री 12 वाजून 33 मिनिटापर्यंत असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :