(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hindu Rituals : ...म्हणून विवाहित स्त्रिया कपाळावर टिकली किंवा कुंकू लावतात! जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
Hindu Rituals : टिकली किंवा कुंकूचा संबंध केवळ सौंदर्याशीच नाही तर हिंदू धर्मात तिला विशेष महत्त्व आहे. यासोबतच अनेक वैज्ञानिक कारणे आणि आरोग्याशी संबंधित फायदाही आहे.
Hindu Rituals : हिंदू (Hindu Religion) धर्माशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत, त्यापैकी एक म्हणजे विवाहित महिलांचा (Women) सोळा श्रृंगार. शास्त्रामध्ये विवाहित स्त्रियांचे सोळा श्रृंगार सांगण्यात आले आहेत, ज्यांचे धार्मिक महत्त्व आहे. यासोबतच त्याचे वैज्ञानिक महत्वही जोडलेले आहेत. सहसा विवाहित स्त्रिया त्यांच्या श्रृंगारमध्ये लाल कुंकू, बांगड्या, टिकली, मंगळसूत्र, पैंजण आणि जोडवी यांचा समावेश करतात. श्रृंगाराशी संबंधित या गोष्टी महिलांसाठी खास आहेत आणि त्यांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
भारतीय हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग
टिकली किंवा कुंकू हे सोळा श्रृंगारापैकी एक आहे. तो भारतीय हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आज जरी स्टाईल स्टेटमेंट, सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या लावल्या जात असल्या तरी त्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. तुम्हाला माहीत आहे का? कपाळावर टिकली लावण्यामागे केवळ हिंदू धर्मच नव्हे तर वैज्ञानिक तथ्येही जोडली गेली आहेत.
कपाळीवर कुंकू किंवा टिकलीचे धार्मिक महत्त्व
टिकलीला बिंदिया, कुंकू, अशा अनेक नावांनी ओळखले जाते. हिंदू धर्मात विवाहित स्त्रिया रंगीबेरंगी टिकल्या लावतात. तर लाल रंगाची टिकली देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रातही लाल रंग हा मंगळाचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे लाल टिकली लावणाऱ्या विवाहित महिलांच्या आयुष्यात आनंद असतो. पण काळ्या रंगाची बिंदी विवाहित महिलांसाठी अशुभ मानली जाते. महिला दोन्ही भुवयांच्या मध्यभागी टिकली लावतात. हे शरीराचे सहावे चक्र आहे, ज्याला आज्ञा चक्र, कपाळ चक्र किंवा तिसरा डोळा म्हणतात. या सर्व चक्रांचे वर्णन वेदांमध्येही आढळते. टिकली लावल्याने आंतरिक ज्ञान वाढवणाऱ्या शक्ती विकसित होतात, असे मानले जाते.
टिकली लावण्याचे फायदे आणि वैज्ञानिक महत्व
- विज्ञानाच्या दृष्टीकोनातून, कपाळाच्या मध्यभागी पाइनल ग्रंथी असते. टिकली लावताना दाब आल्याने ही ग्रंथी वेगाने काम करते. यामुळे मन शांत होते आणि कामात एकाग्रता वाढते. यासोबतच राग आणि तणावही कमी होतो.
- कपाळावर टिकली लावण्यासाठी एक विशिष्ट बिंदू आहे. एक्यूप्रेशरच्या तत्त्वांनुसार हा पॉइंट डोकेदुखीपासून आराम देतो. येथे टिकली लावल्याने नसा आणि रक्तवाहिन्यांचे अभिसरण होते. असे सांगितले जाते
-शिरोधरा पद्धतीनुसार कपाळाच्या या बिंदूवर दाब दिल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते. असे सांगितले जाते.
-ज्या ठिकाणी टिकली लावली जाते, त्या ठिकाणाहून कानाशी संबंधित मज्जातंतूही जाते, ज्याच्या दाबामुळे ऐकण्याची क्षमता वाढत असल्याचं सांगण्यात येते
-टिकली लावल्याने सायनससारख्या समस्यांवरही फायदा होतो. कारण या बिंदूचा नाकाच्या मार्गाशी थेट संबंध आहे. टिकली लावताना दाब आल्यास म्यूकस बाहेर पडणे सोपे होत असल्याचं सांगण्यात येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
Hindu Marriage Rituals : लग्नाआधी वधू-वरांना हळद का लावली जाते, जाणून घ्या धार्मिक कारणे