Chanakya Niti: ‘अशा’ लोकांशी मैत्री करताय? होऊ शकतं मोठं नुकसान! वाचा काय म्हणतात चाणक्य...
Chanakya Niti: चाणक्य नीतिनुसार प्रत्येक व्यक्तीने कुणासोबतही मैत्री करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
Chanakya Niti: चाणक्य नीतिनुसार प्रत्येक व्यक्तीने कुणासोबतही मैत्री करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. जे लोक या गोष्टींची काळजी घेत नाहीत, त्यांना आयुष्यात पुढे भयंकर त्रास सहन करावा लागतो. अशा लोकांचे खूप नुकसान देखील होते. आचार्य चाणक्यांनी मैत्रीबद्दल देखील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मैत्री करण्यापूर्वी जाणून घेऊया आचार्य चाणक्य काय सांगतात...
चाणक्य नीतिनुसार, खरा मित्र तोच असतो जो दुःख आणि संकटाच्या वेळी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा असतो. चाणक्य नीति सांगते की, वाईट काळातच खऱ्या मित्राची ओळख होते. जो तुम्हाला अतिशय वाईट काळातही खंबीर साथ देतो, तोच आपला खरा मित्र असतो.
‘अशा’ लोकांशी मैत्री करू नका!
चाणक्य नीति सांगते की, जे लोक केवळ आपल्या तोंडावर आपली स्तुती करतात, अशा लोकांशी कधीही मैत्री करू नये. असे लोक केवळ त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याशी मैत्री करतात. मात्र, खरा मित्र तोच असतो, जो आपली चूक सुधारतो आणि पुन्हा चूक न करण्याची प्रेरणा देतो. जे लोक केवळ पद आणि पैशाच्या लालसेने एखाद्याशी मैत्री करतात, ते मैत्रीचे नाते अधिक काळ टिकत नाहीत.
गुण पाहून करावी मैत्री!
चाणक्य नीति म्हणते की, चुकीचे मित्र आपला जीव धोक्यात घालू शकतात. मात्र, खरे मित्र आपल्या मित्रांना सर्वात मोठ्या संकटातूनही बाहेर काढतात. म्हणूनच एखाद्या व्यक्तीचे गुण पाहूनच मैत्री करावी. खरा मित्र तोच असतो, जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी मदत करतो आणि चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखतो.
मैत्रीत मर्यादा ओलांडू नका!
चाणक्य नीति सांगते की, प्रत्येक नात्याला मर्यादा असते, तशी मैत्रीलाही असते. मैत्रीची ही मर्यादा कधीही ओलांडू नये. जे लोक याची काळजी घेत नाहीत, त्यांचे नाते फार काळ टिकत नाही. म्हणून प्रत्येक नात्यात मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे.
हेही वाचा :