एक्स्प्लोर

Chanakya Niti : चाणक्यंच्या ‘या’ 5 गोष्टी आचरणात आणा आणि कोणतंही ध्येय सहज साध्य करा!

Chanakya Niti : चाणक्य नीतिनुसार, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात कोणत्याही अडचणींशिवाय यश आणि ध्येय साध्य करायचे असेल, तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य लोकांना त्या गोष्टी सांगतात, ज्या जीवनासाठी खूप उपयुक्त आहेत. यामुळेच शेकडो वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्य नीतिची लोकप्रियता आणि महत्त्व जराही कमी झालेले नाही. आजही मोठ्या संख्येने लोक चाणक्य नीतिचा अभ्यास करतात आणि त्यात लिहिलेल्या गोष्टींचे आचरण करतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जो कोणी या 5 गोष्टींचे पालन करतो, त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

या नियमांचे, सवयींचे पालन करणारे लोक कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होतात. काय आहेत या चाणक्यंच्या ‘5’ अनमोल गोष्टी, जाणून घेऊया...

अपयशाला घाबरू नका : चाणक्य नीतिनुसार, एकदा तुम्ही कोणतेही काम सुरू केले की, तुम्हाला अपयशाची भीती वाटू नये. तसेच, या भीतीपोटी तुम्ही हातातले काम मध्येच सोडू नये. जे लोक नेहमी आपले काम प्रामाणिकपणे करतात त्यांचा नक्की विजय होतो.

संधीचा पुरेपूर फायदा घ्या : चाणक्यंच्या या शिकवणीनुसार, व्यक्तीने योग्य संधी आल्यावर आपली प्रतिभा दाखवायला चुकू नये. संधी आल्यावर जे आळस करतात, असे लोक पुढे डोक्याला हात लावून बसतात आणि आयुष्यभर पश्चाताप करतात. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि तिचा फायदा करून घेण्यासाठी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. जो व्यक्ती या गोष्टी ध्यानात ठेवतो, त्याला आयुष्यात अपयशाचे तोंड कधीच पाहावे लागत नाही.

नेहमी सत्य बोला : चाणक्य नीतिनुसार जे लोक खोटे बोलतात, त्यांनाच अपयश येते. कारण, खोटे बोलणे कोणालाही आवडत नाही. खोटे बोलून आपले काम करून घेणारा एक ना एक दिवस पकडला जातो. जेव्हा, लोकांना त्याचे सत्य कळते, तेव्हा त्याला मान झुकवावीच लागते. अशा लोकांचे भर समाजातही हसे होते.

प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका : चाणक्य नीतिनुसार, शिक्षकाकडून शिक्षण घेताना कधीही लाज वाटू नये. विद्यार्थ्याने शिक्षकाला प्रश्न करताना कधीही संकोच करू नये. जे विद्यार्थी शिक्षकांना मोकळेणाने प्रश्न विचारू शकत नाहीत, त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव कायम राहतो.

राग ही भावनाच सोडा : चाणक्य नीतिनुसार, माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा राग आहे. रागाने माणसाची चांगली विचारशक्ती नष्ट होते. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय नेहमीच चुकीचा असतो. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Chanakya Niti: मन:शांती आणि सकारात्मक ऊर्जेच्या शोधात आहात? मग, चाणक्य नीतितील ‘या’ गोष्टी नक्की करा!

Chanakya Niti : 'अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः’, चाणक्यंच्या या श्लोकात दडलेय यशाचे रहस्य!

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 July 2026: आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 5 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
5 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Budh Gochar 2026 : 7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget