Chanakya Niti : 'हे' 7 प्राणी गाढ झोपेत असतील तर चुकूनही उठवू नका; अन्यथा जीवावर बेतू शकतं, चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : चाणक्यांनी काही प्राण्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना झोपेतून जागे केल्यास आपल्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य आपल्या तीव्र बुद्धिमानी, अर्थशास्त्रीय आणि कुशल राजनितीच्या बाबतीत जाणतात. चाणक्य निती (Chanakya Niti) आणि त्या माध्यमातून देण्यात आलेला संदेश आजही समाजातील प्रत्येक गोष्टीवर लागू होतात. चाणक्यांनी आपल्या नितीमध्ये प्राण्यांचा देखील उल्लेख केला आहे. या ठिकाणी आपण अशाच काही प्राण्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना झोपेतून जागे केल्यास आपल्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. यामध्ये कोणकोणत्या प्राणी-पक्ष्यांचा समावेश करण्यात आला आहे ते जाणून घेऊयात.
अहिं नृपं च शार्दूलं किटिं च बालकं तथा ।
परश्वानं च मुर्खं च सप्त सुप्तान् बोधयेत् ।।
आचार्य चाणक्य आपल्या नितीमत्तेत म्हणतात की, साप, वाघ, चित्ता, राजा, दुसऱ्यांचा कुत्रा आणि मूर्ख माणूस या 7 प्राण्यांना कधीच झोपेतून जागं करु नये. अन्यथा यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
- चाणक्यांच्या म्हणण्यांनुसार, जर तुमचं फार महत्त्वाचं काम नसेल तर कधीही झोपलेल्या राजाला उठवण्याची चूक करु नका. यामुळे राजा क्रोधित होऊन तुम्हाला शिक्षा देऊ शकतो.
- त्याचप्रमाणे झोपलेल्या वाघाला देखील उठवू नका. जर वाघ जागा झाला तर तो सरळ तुमच्यावर हल्ला करु शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घ्या.
- साप जरी गाढ झोपेत असला तरी त्याला उठवू नये. किंवा सापाला त्रास देऊ नये. जर साप जागा झाला तर तो तुम्हाला दंश दिल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे तुमच्यावर हे संकट ओढावून घेऊ नका.
- जर एखादं लहान मूल झोपलं असेल तर त्यालाही उठवू नका. कारण एकदा जर बाळाची झोप उडाली तर बाळ किरकिर करु लागेल. विनाकारण रडू लागेल. यामुळे तुम्हाला त्यांना सांभाळणं कठीण होईल.
- एखाद्या श्वानाला देखील झोपेतून उठवू नका. जर तुम्ही त्याला जाग करण्याचा प्रयत्न केलात तर तो तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :