Weekly Horoscope : तूळ ते मीन राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजर; हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 24 To 30 November 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नोव्हेंबरचा तिसरा आठवडा कसा असणार? व्यवसाय, करिअर, आरोग्य, लव्ह लाईफ कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 24 To 30 November 2025 : वैदिक शास्त्रानुसार, 24 To 30 नोव्हेंबर 2025..नोव्हेंबर महिन्याचा (November 2025) चौथा आणि शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात अनेक शुभ ग्रहांचा शुभ संयोग तयार होत आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. तसेच, मार्गशीर्ष महिना सुरु झाला असल्याने सणवाराच्या दृष्टीने देखील हा आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला या आठवड्यात शिकायला मिळतील. तसेच, छोट्या-छोट्या गोष्टींमधून तुम्हाला आनंद मिळेल. व्यवहाराच्या बाबतीत सामंजस्याने वागा. एखादी नवी डील तुमच्या हाती लागू शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला मनासारखा लाभ मिळाल्यामुळे तुम्ही फार खुश असाल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी सत्य वचनाचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला खऱ्याचीच साथ द्यावी लागेल. एखादी गोष्ट मनासारखी झाली नसल्यास तुम्हाला वाईट वाटू शकतं. तुमच्या आर्थिक स्थितीत हळुहळू सुधारणा झालेली दिसेल. तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास देखील करावा लागू शकतो. धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येईल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीचा नवीन आठवडा फारच ऊर्जावान असणार आहे. कारण या दरम्यान तुमच्या आयुष्यात किंवा आजूबाजूला अनेक घटना घडताना दिसतील. यातून तुम्हाला खूप काही शिकता येईल. नवीन व्यवसायाची सुरुवात देखील तुम्ही करु शकता. त्यासाठी तुम्हाला कुटुंबियांच्या सहकार्याने आर्थिक पाठबळ मिळेल. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला परत मिळतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा लाभदायी ठरणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढताना दिसेल. तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कामाच्या ठिकाणी देखील सकारात्मक वातावरणात तुम्ही काम कराल. तसेच, नवीन वस्तूंची देवाण-घेवाण तुम्ही करु शकता. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल. तसेच, नवीन गोष्टी शिकता येतील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात धमाकेदार असणार आहे. या आठड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. एखादी नवीन डील तुमच्या हाती लागू शकते. मात्र, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यवहाराच्या बाबतीत चोख राहा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमचे निर्णय घेणं फायद्याचं ठरेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा भावनात्मक असणार आहे. या आठवड्यात अनेक जुन्या गोष्टींना तुम्ही उजाळा द्याल. नात्यांची वेगळी बाजू तुम्हाला दिसेल. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. आठवड्याच्या शेवटी अनपेक्षित गोष्ट तुमच्याबरोबर घडताना दिसेल. यातून तुम्हाला आनंद किंवा त्रास होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















