Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचे उपवास करणारे सर्व हिंदू खातात पाकिस्तानचे मीठ, नेमका प्रकार काय?
Chaitra Navratri 2024 : उपवासाला कोणते मीठ खावे? या विषयी अनेकांचा गोंधळ उडतो. आज आम्ही तुम्हाला उपवासाला नेमकं कोणते मीठ आणि का वापरायचे या विषयी सांगणार आहे.
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2024) 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये दररोज भक्त दुर्गामातेच्या नऊ अवतारांची पूजा करतात. काही भाविक या काळात नऊ दिवस उपवास करतात. उपवास केल्याने केवळ भक्त आणि परमेश्वरातील अंतर कमी होते, एवढेच नव्हे तर शरीर आणि मन शुद्धीसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर मानले जाते. महाराष्ट्रात अनेकांचा सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनीवार या दिवशी उपवास असतो.याशिवाय चतुर्थी, एकादशी, प्रदोष हे मासिक उपवास तर असतात. उपवासाला कोणते पदार्था खावेत कोणते खाऊ नयेत याविषयी बऱ्याच जणांना माहिती असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का उपवासाला कोणते मीठ खावे? (Which Salt Use For Fasting?) या विषयी अनेकांचा गोंधळ उडतो. आज आम्ही तुम्हाला उपवासाला नेमकं कोणते मीठ आणि का वापरायचे या विषयी सांगणार आहे.
मीठ हा आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अन्नपदार्थ चविष्ठ होण्यासठी यासाठी मीठाचा वापर केल जातो. मीठाचे सध्या अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मात्र उपवासाला साधे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामागे नेमके काय कारण हे अगोदर जाणून घेऊया. आपण आपल्या रोजच्या जेवणात समुद्री मीठाचा वापर करतो पण जास्त प्रमाणात हे मीठ वापररल्यास हे मीठ शरीराला हानीकारक ठरते. समुद्री मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून बनवले जाते. ते मीठ सेवनासाठी योग्य होण्यासाठी त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रियामुळे या मीठातील कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मीठाचे प्रमाण घटते. यामुळे समुद्री मीठाबरोबर इतर मीठाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील एक मीठ म्हणजे सैंधव मीठ...
कुठुन येते सैंधव मीठ?
सैंधव मीठ हा खडे मीठाचा प्रकार आहे. या मीठाला हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी नमक या नावाने ओळखले जाते. सैंधव मीठ हे दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार श्वेत म्हणजे पांढरे मीठ आणि दुसरा प्रकार हा गुलाबी मीठ.. या दोन्ही मीठाचा वापर आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील सैंधव मीठाचा वापर केला जातो. हे मीठ पाकिस्तानच्या पंजाब भागाती खेडवा या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या खाणीत मिळते. नैसर्गिकरीत्या मिळणारे मीठ हे अतिशय शुद्ध मानले जाते. कारण यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळेच याचा वापर उपवासादरम्यान करण्यात आलेल्या फरळामध्ये केला जातो.
उपवासात सैंधव मीठ का गरजेचे?
सैंधव मीठ हे सामान्य मीठाप्रमाणे असते. सोडियम, पोटॅशियम, लोह यासारखी खनिजे देखील असतात. त्यामुळेच सैंधव मीठ आरोग्यासाठी चांगले असते. मात्र यामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असते . सैंधव मीठ हे नैसर्गिकरीत्या मिळवले जाते. त्यामुळे ते शुद्ध असते. उपवासादरम्यान अनेक पोषक तत्त्वांची गरज शरीराला असते त्यामुळे उपवासाला सैंधव मीठ खाल्ले जाते. नवरात्रीमध्ये सैंधव मीठाचा जास्त वापर होतो. कारण नवरात्रीत मोजका आहार घेतला जातो.
हे ही वाचा :
Bangles: राशीनुसार 'या' रंगाच्या काचेच्या बांगड्या हातात घाला; पतीचे नशीब चमकेल, भरभराट होईल