Astrology : आज लक्ष्मी नारायण योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशी ठरतील भाग्यशाली, अचानक होणार धनलाभ
Astrology Panchang Yog 23 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 23 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 एप्रिल म्हणजेच बुधवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश करुन शुक्र ग्रहाबरोबर युती केली आहे. यामुळे लक्ष्मी नारायणाचा शुभ योग (Yog) निर्माण झाला आहे. तसेच, चंद्राने संक्रमण करुन कुंभ राशीत असल्यामुळे गजकेसरीसह सुनफा योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. तसेच, आजच्या शुभ राशींवर गणेशाची कृपा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ कोणकोणत्या राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. आज देवी लक्ष्मीसह गणरायाची कृपा या राशीच्या लोकांवर असणार आहे. त्यामुळे तुमच्या कामकाजात चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, तुमच्या मार्गातील अडचणी दूर होतील. मन शांत राहील. तसेच, मित्रांचा चांगला सहवास तुम्हाला लाभेल. तुमच्या धनसंपत्तीत वाढ झालेली दिसेल. प्रवासाचे शुभ योग लवकरच जुळून येणार आहेत.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमच्यावर गणरायाची कृपा असणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तुमच्या कामात चांगलं यश तुम्हाला मिळेल. तसेच, इतरांचा तुमच्यावर चांगला विश्वास असेल. तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. मात्र, संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुमच्या कलात्मक क्षमतेला चांगला वाव मिळेल.तुमच्यातील नवीन गुण बाहेर येतील. तसेच, समाजात तुमचं कौतुक केलं जाईल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. जर तुम्ही बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रवास सावधानतेने करणं गरजेचं आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. तसेच, आर्थिक स्थिती लवकरच चांगली राहील. जोडीदाराचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. तसेच, नवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सक्षम असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















