Astrology : आज शिव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींवर असणार भगवान शंकराची कृपा, आलेलं विघ्न टळेल
Astrology Panchang Yog 19 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या 5 शुभ राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 19 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 19 एप्रिल म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस शनीदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी मीन राशीत शुक्र, बुध, राहुसह मिळून चतुर्ग्रही योग (Yog) जुळून आला आहे. चंद्र ग्रह चतुर्थ भाव स्थितीत आहे. आज चंद्राने धनु राशीत प्रवेश करुन मंगळ आणि गुरु ग्रहाबरोबर षडाष्टक योग जुळवून आणला आहे. त्याचबरोबर आजचा दिवस शनिवार असल्या कारणाने आजच्या दिवशी ज्या शुभ राशी असतील त्यांच्यावर शनीदेवाचा आणि भगवान शंकराची कृपा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या 5 शुभ राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. आज कोणतंही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. तसेच, सरकारी कार्याची संबंधित कामे शक्यतो करु नका. विकेंड असल्या कारणाने तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर फिरायला जाण्याचा छान प्लॅनही करु शकता. मात्र, वाहन चालवताना थोडी काळजी घ्या.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टर काम करण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्याची ही चांगली सुवर्णसंधी आहे. वेळीच या संधीचा लाभ घ्या.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एक चांगली शुभवार्ता ऐकायला मिळेल. आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांबरोबर तुमचा चांगला ताळमेळ जमेल. अडचणीच्या काळात ते तुम्हाला मदत करतील. आज दिवसभरात तोंडात साखर ठेवल्याप्रमाणे सगळ्यांशी गोड वागा. मात्र, कोणत्याच गोष्टीचा दिखावा करु नका.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. आज तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या बिझनेसमधून तुम्हाला चांगला नफा मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. आज गोरगरिबांची मदत करा. तुम्हाला चांगलं पुण्य फळ मिळेल. मित्रांचा चांगला सहवास तुम्हाला लाभेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. लवकरच तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल, तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मार्गातील सर्व अडथळे हळुहळू दूर होतील. आज कोणतंही काम तुमच्या मनासारखं न झाल्यास निराश होऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















