Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर राहणार बाप्पाची कृपा, मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण
Panchang 29 May 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या 5 राशींवर आज बाप्पाची कृपा राहील, त्यांच्याकडे धनलाभाच्या संधी धावून येतील. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 29 May 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, बुधवार, 29 मे रोजी चंद्र कुंभ राशीत जाणार आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी रवियोग, ऐंद्र योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ मिळेल आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बळावर कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. श्रीगणेशाच्या कृपेने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली अपूर्ण कामं आज पूर्ण होतील आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांबाबत प्रेम आणि स्नेह वाढेल. आज नवविवाहितांच्या घरी विशेष पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. वैवाहिक जीवनात काही वाद सुरू असतील तर ते आज चर्चेतून सोडवले जातील.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीचे लोक आज मोठी उद्दिष्टं सहज साध्य करू शकतील आणि एखाद्या कायदेशीर प्रकरणात विजय मिळाल्यानंतर त्यांचं मन प्रसन्न राहील. आज तुमची सरकारी प्रलंबित कामं पूर्ण होतील आणि तुम्हाला सरकारी योजनांचा लाभही मिळेल. नोकरदार लोक आज कामाच्या ठिकाणी चांगलं काम करतील, ज्यामुळे त्यांचं कौतुक होईल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. धार्मिक कार्यातही तुमची आवड निर्माण होईल. कुटुंबाच्या गरजांवर पैसा खर्च कराल आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचं प्रकरण पुढे येऊ शकतं. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाल्यास, तुमच्या जोडीदारासोबत नातं घट्ट होईल आणि तुम्ही मिळून मुलांच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकता.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कन्या राशीचे लोक आज चांगले पैसे कमवू शकतील, ज्यामुळे त्यांना समाधान आणि आनंद मिळेल. आज तुम्ही नवीन मित्र बनवाल. नोकरदार लोकांना आज त्यांच्या क्षमतेनुसार काम मिळाल्याने आनंद होईल आणि त्यांच्या पद आणि प्रतिष्ठेत चांगली वाढ होईल. आज लोक तुमच्याकडे जास्त लक्ष देतील. तुमच्या मतांना आणि कल्पनांना सर्वत्र प्राधान्य दिलं जाईल. तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकेल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं तर, तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आज एक चांगली भेट आणू शकता, ज्यामुळे दोघांमधील नातं अधिक दृढ होईल.
मकर रास (Capricorn)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल, आज तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मेहनतीचं चांगलं फळ मिळेल आणि मानसिक शांतीही मिळेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी मोठं यश मिळाल्याने करियर मजबूत होईल. या राशीचे लोक ज्यांना नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांना आज व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची आणि त्यातून नफा कमावण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची व्यवसायाची विश्वासार्हता देखील वाढेल. आज तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यास तयार असाल. प्रेम जीवनात असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत रोमँटिक डिनरवर जाऊ शकता.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने कोणताही निर्णय घेऊन लोकांना आश्चर्यचकित करू शकता. लव्ह लाईफमधील सर्व प्रकारच्या समस्या आज दूर होतील आणि तुम्ही एकमेकांची काळजी घेताना दिसाल. तुम्ही काही नवीन कामासाठी प्रयत्न करत असाल तर आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. याशिवाय, तुम्ही व्यवसायात चांगली डील फायनल करून मोठा नफा देखील मिळवू शकता. जर तुमच्या कौटुंबिक जीवनात एखाद्या विषयावर बराच काळ तणाव सुरू असेल तर तुम्हाला यातून आराम मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















