Horoscope Today 29 May 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 29 May 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 29 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचा ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या वादातून बाहेर पडू शकता.
व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, व्यावसायिकांसाठी आजचा काळ कठीण असेल. आज तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला एकटं वाटू शकतं, तुम्हाला एकटेपणा जाणवू नये म्हणून आज तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला काही गंभीर आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा पगारही वाढू शकेल. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी नियमांचं पालन करुन काम करावं, सर्व कायदे लक्षात घेऊन व्यवसाय वाढवावा.
विद्यार्थी (Student) - तरुणांना सोशल मीडियावर त्यांचे जुने मित्र भेटू शकतात, अचानक हे मित्र तुमच्या नजरेत आल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही त्यांच्याशी बोलाल.
आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला कानाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.
मिथुन (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस थोडी सावधगिरी बाळगण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जे लोक महत्त्वाचा डेटा हाताळतात त्यांना आज काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षितपणे ठेवावा लागेल. तुम्ही नोकरीत काही अडचणी आल्यास त्वरित वरिष्ठांशी बोला.
व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील. परंतु थोडे हात-पाय हलवले तर तुमचं काम पुन्हा सुरू होऊ शकतं,
विद्यार्थी (Student) - तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.
आरोग्य (Health) - आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही रात्री उशिरा जेऊ नये, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमची प्रगती होईल.
व्यापार (Business) - आज तुम्हाला व्यापाऱ्याशी संबंधित तोटा होऊ शकतो. अशा वेळी जास्त ताण न घेता कामाचाच एक भाग म्हणून सोडून द्या.
तरूण (Youth) - घराबाहेर पडताना घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्या. तुमची सगळी कामं पूर्ण होतील.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरी (Job) - तुम्हाला आज कदाचित प्रमोशनची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल.
व्यापार (Business) - आज व्यवसायात कोणताही मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. वरिष्ठांचा योग्य सल्ला घ्या.
तरूण (Youth) - आज तुमचं पूर्णपणे लक्ष समाजसेवा करण्यात असू शकतं. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल.
आरोग्य (Health) - तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. ऑफिसमधलं वातावरणही चांगलं राहील.
व्यापार (Business) - जर तुम्ही व्यवसायात काही नवे बदल आणू इच्छित असलात तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.
तरूण (Youth) - प्रेमसंबंधात तुमचं सगळं व्यवस्थित सुरु राहणार आहे. तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.
आरोग्य (Health) - दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा.
तूळ (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज ऑफिसमध्ये तुमचे तुमच्या बॉसशी अनावश्यक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. आज अजिबात वाद घालू नका.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, स्टेशनरीचा व्यवसाय केल्यास तुम्हाला आज चांगला नफा मिळू शकतो.
विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या वर्गमित्र किंवा दुसऱ्या मित्राबाबत काहीतरी ऐकले असेल, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावाला बळी पडू शकता. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा. कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा करू नका. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्यावर उपचार करा.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला डोकेदुखीमुळे खूप त्रास होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे काळजी वाटत असेल तर आधी पूर्ण विश्रांती घ्या आणि मगच कोणतंही काम करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. भूतकाळातील चुकांमधून तुम्ही शिकलं पाहिजे. त्याच त्याच चुका पुन्हा करू नका.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. आज तुमचे कामही तितक्याच सहजतेने होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून पैसे घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या घरात पैशाचा वाद होऊ शकतो.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.
धनु (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवून खूप आनंदी राहतील.
विद्यार्थी (Student) - तुम्ही आज सहलीला जाऊ शकतात, परंतु तुम्ही प्रवासादरम्यान थोडी काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला तुमच्या सामानाचे संरक्षण स्वतः करावं लागेल, अन्यथा तुमचं सामान चोरीला जाऊ शकतं.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये. तुमच्या पाय आणि कंबरेला सूज येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप काळजीत पडू शकता.
मकर (Capricorn Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर काम करण्यात पुढे असाल, तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला कामाच्या ठिकाणी वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी खूप मदत करू शकते.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना खूप हुशारीने काम करावं लागेल, जर तुम्ही आज नवीन करार करणार असाल तर कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते नीट वाचा.
विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते, त्यामुळे तुम्हालाही अडकल्यासारखं वाटू शकतं.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.
कुंभ (Aquarius Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला तुमचं ऑफिसचं काम घरी येऊनही करावं लागेल, याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, कारण संस्थेच्या प्रगतीसाठी तुम्हाला काही अतिरिक्त काम करावं लागेल, जर संस्थेची प्रगती झाली, तर तुमच्या सुद्धा पगारात वाढ होऊ शकते.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचे तर, जे व्यावसायिक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात आणि आपल्या भागीदारापासून दूर राहतात, त्यांनी भागीदाराशी संवाद कायम ठेवावा, तरच तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळू शकेल.
कौटुंबिक (Family) - आज तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वेळ घालवा.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, फूड पॉयझनिंगची समस्या तुम्हाला भेडसावू शकते, त्यामुळे तुम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरांकडे जा, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
मीन (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वतःवर विश्वास ठेवावा, तरच तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकाल, यातूनच अनेक मोठे परिणाम साध्य होतील.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, ग्रहांची स्थिती पाहता आज व्यावसायिकांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात, तुमचे प्रलंबित सौदेही आज फायनल होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही करिअरमध्ये प्रगती करू शकता.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्ही शुगर आणि हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, कमी किंवा जास्त साखरेमुळे तुमचे आरोग्य आणखी बिघडू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Rajyog : अवघ्या 5 दिवसांत मंगळ ग्रह बनवणार रुचक राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार, होणार अपार धनलाभ