Comet : 50 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच पृथ्वीच्या दिशेने येतोय धूमकेतू, फेब्रुवारीमध्ये दिसणार अद्भुत दृश्य
Comet : C/2022 E3 (ZTF) नावाचा धूमकेतू पुढील महिन्यात म्हणजे 1 किंवा 2 फेब्रुवारी 2023 मध्ये अवकाशात दिसणार आहे.
Comet : फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीला अंतराळात एक अद्भुत दृश्य पाहायला मिळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. हे अद्भुत दृश्य लोकांना प्रत्यक्षात पाहता येणार आहे. 50 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच पृथ्वीच्या दिशेने धूमकेतू येत आहे. हा धूमकेतू पृथ्वीजवळून जाणार आहे. वैज्ञानिकांमध्ये देखील याबाबत मोठी उत्सुकता आहे. हा धूमकेतू हजारो वर्षांतून एकदाच दिसतो. आता ही वेळ सुमारे 50 हजार वर्षांनंतर आली आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, या धूमकेतूचे नाव C/2022 E3 (ZTF) असे आहे. हा धूमकेतू पुढील महिन्यात म्हणजे 1 किंवा 2 फेब्रुवारी 2023 मध्ये अवकाशात दिसणार आहे. तुमच्या परिसरात आकाश निरभ्र असेल तर तुम्ही ते दृष्य दुर्बिणीशिवाय पाहू शकाल. हा धूमकेतू 1 किंवा 2 फेब्रुवारीला पृथ्वीपासून सुमारे 4.20 कोटी किलोमीटर अंतरावरून बाहेर येईल. पुढच्या वेळी तो परत कधी दिसेल? त्याबद्दल भाकीत करणे कठीण असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. आता हा धूमकेतून 50 हजार वर्षांनंतर दिसणार आहे. कॅलिफोर्नियाच्या झ्विकी ट्रान्झियंट फॅसिलिटीच्या शास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये हा धूमकेतू शोधला आणि तेव्हापासून ते त्याचा मागोवा घेत आहेत.
शास्त्रज्ञांच्या मते, 12 जानेवारी 2023 रोजी धूमकेतू C/2022 E3 (ZTF) सूर्यापासूनचे अंतर सुमारे 160 दशलक्ष किलोमीटर असेल, तर 1 किंवा 2 फेब्रुवारी 2023 रोजी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सुमारे 42 दशलक्ष किलोमीटर असेल. म्हणजेच यावेळी ता पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. सध्या हा धूमकेतू सूर्यमालेच्या आतील भागातून जात आहे. 12 जानेवारीला ते सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचेल. त्यानंतर 1 किंवा 2 फेब्रुवारीला ता पृथ्वीच्या सर्वात जवळून जाईल. या धूमकेतूपासून पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Chanakya Niti : यश मिळवण्यासाठी तुम्हाला 'या' कडू झाडाची दोन फळे चाखायला लागतील, चाणक्यनीती मध्ये काय म्हटलंय...
Chanakya Niti : जर कुटुंबप्रमुखाला असतील या 3 सवयी, तर कुटुंबाच्या सुखशांतीला कोणीही धक्का लावू शकत नाही.