Chanakya Niti : यश मिळवण्यासाठी तुम्हाला 'या' कडू झाडाची दोन फळे चाखायला लागतील, चाणक्यनीती मध्ये काय म्हटलंय...
Chanakya Niti : आनंदी जीवन, जीवनात यश मिळवणे आणि प्रतिकूल परिस्थितीत कसे वागावे या विषयावर चाणक्य नीतीमध्ये विचार मांडले आहेत. यावर चाणक्य यांचे काय मत आहे जाणून घ्या.
![Chanakya Niti : यश मिळवण्यासाठी तुम्हाला 'या' कडू झाडाची दोन फळे चाखायला लागतील, चाणक्यनीती मध्ये काय म्हटलंय... chanakya niti marathi news these 3 success mantra give profit in life chanakya Chanakya Niti : यश मिळवण्यासाठी तुम्हाला 'या' कडू झाडाची दोन फळे चाखायला लागतील, चाणक्यनीती मध्ये काय म्हटलंय...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/d84d7cbb2df8c5e8d3f172bfe3d429c81672899727590381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Acharya Chankaya) यांनी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या अनमोल विचारांचा ठेवा तयार केला आहे. ज्याचे नाव आहे चाणक्य नीतिशास्त्र (Chanakya Niti). हा आचार्य चाणक्याच्या अनुभवांचा संग्रह आहे, जो माणसाला प्रत्येक पावलावर मदत करतो. जे त्यांचे अनुकरण करतात, ते जीवनातील आव्हानांना चांगल्या मार्गाने तोंड देऊ शकतात. तसेच जीवनात न डगमगता यशाच्या मार्गावर चालतात. नवीन वर्ष 2023 सुरू झाले आहे. हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन यावे अशी लोकांची इच्छा असते. या वर्षात आनंदी जीवन, यश आणि प्रतिकूल परिस्थितीत कसे वागावे या विषयावर चाणक्य नीतीमध्ये विचार मांडले आहेत. यावर चाणक्य यांचे काय मत आहे जाणून घ्या. यावर चाणक्यांचे काय मत आहे? जाणून घेऊया.
संतती, पत्नी आणि समाधान
चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीची मुले त्यांचा आदर करतात, जी पत्नी पतीच्या आज्ञेनुसार वागते आणि जी व्यक्ती आपल्या कमाईवर समाधानी असते. अशा व्यक्तींसाठी हे जग स्वर्गासारखे आहे.
'या' कडू झाडाच्या दोन गोड फळे चाखा, चाणक्य म्हणतात...
चाणक्य सांगतात की, जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल, तर कडू वृक्षाची दोन गोड फळे नक्कीच चाखायला हवीत, तरच तुम्हाला योग्य मार्ग सापडेल आणि तुम्ही यश मिळवू शकाल. चाणक्याच्या मते, जग हे एक कडू वृक्ष आहे, ज्याची दोन गोड फळे मधुर वाणी आणि सज्जनांची संगत आहेत. तुमच्या वाणीमुळे तुमचे एखादे काम बिघडू शकते तसेच काम पूर्णही होऊ शकते, तर सज्जनांच्या सहवासाने तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारते. सज्जन माणूस तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही.
नशिबावर अवलंबून राहू नका
चाणक्य म्हणतात की, जो माणूस मेहनत करूनही आयुष्य आणि नशिबावर अवलंबून असतो. त्याला आयुष्यात तेवढेच मिळते. चाणक्य म्हणतात की तुमच्या नशिबावर विसंबून राहू नका, तर स्वतःच्या मेहनतीवर, कारण जे प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतात, जे लोक नशिबावर विसंबून राहत नाहीत, त्यांना यश नक्कीच मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)