Astro Tips : काळ्या मांजरीने रस्ता ओलांडताच आपण का थांबतो? जाणून घ्या रंजक कारण
Astro Tips : लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, काळ्या मांजरीने जर आपला मार्ग ओलांडला तर आपण ते अशुभ मानतो. तर, ही एक अंधश्रद्धा आहे की यामागे आणखी कोणतं कारण आहे ते जाणून घेऊयात.
Astro Tips : शास्त्रानुसार, ज्याप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात अनेक सांस्कृतिक आणि पारंपारिक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणेच प्रत्येकाची आपापली अशी श्रद्धा, परंपरा असते आणि लोकांचा त्यावर विश्वासही असतो. काही लोक याकडे अंधश्रद्धा म्हणून टाळतात. यातलाच एक प्रकार म्हणजे, काळ्या मांजरीने रस्ता ओलांडताच आपण एकतर थांबतो किंवा आपला मार्ग बदलतो.
लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, काळ्या मांजरीने जर आपला मार्ग ओलांडला तर आपण ते अशुभ मानतो. आणि आपला मार्ग आपण बदलतो. पण, यामागे खरंच कोणती श्रद्धा आहे की ही एक अंधश्रद्धा आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
त्यानुसार, भारतात काळ्या मांजरीने आपला रस्ता ओलांडल्यास आपण एकतर गाडी थांबवतो किंवा मागे घेतो. ही कथा इतकी जुनी आहे की ती आपण वर्षानुवर्ष फॉलो करत आलो आहोत. अनेकदा आपला देखील यावर विश्वास नसला तरी आपल्या ग्रूपमधील अशी एक ना एक व्यक्ती असते जिचा या सर्व परंपरेवर विश्वास असतो. पण, काळी मांजर रस्ता ओलांडताना आपल्याला का गाडी का थांबवण्याचा सल्ला दिला जातो लागते? यामागचं कारण नेमकं काय ते जाणून घेऊयात.
'हे' आहे यामागचं कारण
हिंदू धर्ममान्यतेनुसार, काळा रंग हा शनीचा रंग आहे आणि मांजरीला राहूचं वाहन मानलं जातं. यासाठीच जर काळी मांजर तुमच्या घराच्या समोर येत असेल तर यामुळे शनी आणि राहू दोघांच्या क्रोधाचा संकेत मानला जातो. यासाठीच, असं मानलं जातं की, मांजर दिसल्यानंतर काही वेळ एकाच ठिकाणी शांतपणे उभे राहिल्याने देवतांचा क्रोध शांत होतो असं म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Ganeshotsav 2024 : गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन 10 दिवसांनीच का करावं लागतं? पौराणिक कथेत दडलंय महत्त्वाचं रहस्य