एक्स्प्लोर

Sugarcane News : आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून 'महा-ऊस नोंदणी' अॅपची निर्मिती

साखर आयुक्तालयानं एका अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता आपल्या उसाची नोंदणी करता येणार आहे.

Sugarcane News : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Sugarcane Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची कारखान्यांकडे नोंदणी करताना अडचणी येत होत्या. मात्र, आता अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयानं एका अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता आपल्या उसाची नोंदणी करता येणार आहे. 'महा-ऊस नोंदणी' (Maha-US Nondaniॲप असे या अॅपचे नाव आहे.  

सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अॅपचे उद्घाटन

सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 'महा-ऊस नोंदणी' अॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, संचालक अर्थ यशवंत गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. या ॲपमध्ये ऊस लागवडीची जिल्हा, तालुका, गाव तसेच गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊस क्षेत्राची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊस नोंदणीसाठी कळवायचे यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील. आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यामधील आपली ऊस नोंदणीची माहिती पाहता येईल. या ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील सहकारी आणि खासगी अशी एकूण 200 कारखान्यांकडे ऊस नोंदणीची माहिती पाठवू शकणार आहे.


Sugarcane News : आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून 'महा-ऊस नोंदणी' अॅपची निर्मिती

महा-ऊस नोंदणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता आपल्या मोबाईलवर आपल्या उसाची नोंदणी करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन उसाची नोंदणी करण शक्य नाही अशा शेतकऱ्यांना स्वत: च्या मोबाईलवरुन नोंदणी करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यात जाऊन ऊस क्षेत्राची नोंदणी केली आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती देकील या अॅपमध्ये दिसणार आहे.

मोबाईल अॅप वापरण्याबाबत सूचना

सर्वप्रथम गूगल प्लेस्ट अर मधून 'महा-ऊस नोंदणी' (Maha-US Nondani) हे अॅप डाउनलोड करुन घ्यावे. त्यानंतर QR Code आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करून Google Play Store वरती जाऊ शकता. त्यानंतर आपल्या ऊस  क्षेत्राची माहिती भरा. यामध्ये आपला मोबाईल नंबर, आधार नंबर, आपलं नाव भरावे. त्यानंतर ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा आहे, त्याचे नाव लिहावे. असे तीन कारखाने निवडावे. त्यानंतर आपल्याला धन्यवाद असा संदेश येईल. त्यानंतर आपण निवडलेले कारखाने आपल्याशी संपर्क साधतील. 

महत्त्वाच्या बातम्या:



महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget