Sugarcane News : जळगाव जिल्ह्यात उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, ऊस उत्पादक शेतकरी संकटात
सध्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील ऊस (Sugarcane) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

Sugarcane News : सध्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील ऊस (Sugarcane) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेषतः चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होत असते. यंदाही मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, या उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला आहे.
केळीप्रमाणं ऊस पिकाला विमा कवच द्यावं
दरम्यान, पांढऱ्या माशीचा उसावर प्रादुर्भाव झाल्यानं जवपास पाच ते दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचं पीक धोक्यात आलं आहे. त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. एवढ्या मोठया प्रमाणात उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाने तातडीनं काही उपाय योजना कराव्यात, अशी अपेक्षा आता शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय ऊस पिकाला सुद्धा केळीप्रमाणं विमा कवच द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विमा कवच नसल्यानं उसाचे शंभर टक्के नुकसान होण्याचा धोका असल्यानं शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडून शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकणार असल्यानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून आता व्यक्त केली जात आहे. विमा कवच नसल्यानं उसाचे शंभर टक्के नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडून शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळं याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून आता केली जात आहे.
अतिवृष्टीनं आधीच नुकसान, त्यात आता पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळं शेती पिकांचे नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया गेली आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला शेतीचा उत्पादन खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे, खते, बी बियाणांच्या किंमती वाढल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशातच नैसर्गिक संकटाचा सामाना देखील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशातच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
sugarcane season : ऊस गाळप हंगामाची सांगता, महाराष्ट्रात विक्रमी गाळप, ब्राझीलला मागं टाकत भारत अव्वल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
