एक्स्प्लोर

उजनीतून सोडलेलं पाणी कर्नाटकने अडवलं, सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित, शेकडो हेक्टर शेती धोक्यात

उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने आडवल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्याने शेतकरी आक्रमक झालेत.

Solapur : कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळं महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने आडवल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्याने शेतकरी आक्रमक झालेत. कर्नाटक सरकारने भीमा नदीवर उमराणी गावाजवळ नव्याने उभारलेल्या बंधाऱ्यामुळं महाराष्ट्रातील 9 गावांना फटका बसला आहे. उमराणी गावाजवळ 1 टीएमसी पाणी अडवल्याने दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती धोक्यात आली आहे.  

विषय अधिवेशनात मांडून शेतकऱ्यांना पाणी मिळवून द्यावे 

आमच्या लोकप्रतिनिधीना आमची विनंती आहे की हा विषय अधिवेशनात मांडून शेतकऱ्यांना पाणी मिळवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही करत आहेत त्यामुळे आपल्या सरकारने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सोलापुरातील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याचा पाणीपुरवठा बंद

उजनी धरणातून भीमा नदीत चार हजार 400 क्युसेक पाणी सोडले. मात्र, कर्नाटकने त्यांच्या उमराणी बंधाऱ्यात हे पाणी अडवले आहे. त्यामुळे खालील गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. याबाबत प्रशासनाने सरकारकडे बोट दाखवल्याच्या लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सहा फेब्रुवारी रोजी उजनीतून भीमा नदीत चार हजार 400 क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र, कर्नाटकने त्यांच्या उमराणी बंधाऱ्यात पाणी अडवले आहे. त्यामुळे हे पाणी खाली पोचू शकले नाही. परिणामी खालील लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर, चिंचपूर येथील पिके धोक्यात आली आहेत. भीमा नदी कोरडी पडल्याने शेतीचा पाणीपुरवठा थांबला आहे. तर मंद्रूपसह या गावांतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद पडला आहे. याबाबत मंद्रूपसह परिसरातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनालाही निवेदन दिले आहे. परंतु अद्याप उमराणी बंधाऱ्यातून पाणी खाली न सोडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, कर्नाटकने उजनी धरणाचे पाणी अडवल्याने सोलापुरचे लोकप्रतिनिधी देखील आक्रमक झाले आहेत. पाणी अडवल्याने प्रशासनाने उजनीतून पाणी सोडणे थांबवले आहे. त्यामुळे सादेपूरखालील गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. खाली पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shinde Samiti: शिंदे समितीचा धडाका; राज्यात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या, 'इतक्या' मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती समोर
शिंदे समितीचा धडाका; राज्यात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या, 'इतक्या' मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती समोर
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
SSC HSC Exam Copy: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी, 22 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी, 22 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
Embed widget