Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Success story: केवळ नववी पर्यंतचं शिक्षण असल्यानं प्रचंड आव्हानं झेलाव्या लागलेल्या कृष्णदेव रोकडेंनी परिश्रमातून आपला व्यवसाय मोठा केला आहे.

Success story:महाराष्ट्रात आता छोट्या उद्योजकांची कमी नाही. नोकरी, लग्नाच्या प्रतिक्षेत हातावर हात ठेवून बसल्याचं चित्र असताना सोलापूरच्या नववी पर्यंत शिक्षण झालेल्या कृष्णदेव रोकडे यांनी स्वीटकॉर्नच्या व्यवसायातून लाखोंची कमाई केली आहे. केवळ 500 रुपयात उद्योग थाटत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर या शेतकऱ्यानं स्वीटकॉर्न विकायला सुरुवात केली.आता या तरुणाची वार्षिक उलाढाल 13 लाखांवर पोहोचली आहे. सोलापूरच्या तु्ंगट गावातल्या या तरुणानं केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलं. एवढ्या शिक्षणावर नोकरी मिळणं अशक्य असल्याचं लक्षात येताच खचून न जाता त्याने 2012 मध्ये स्वीटकॉर्नचा व्यवसाय सुरु केला.
व्यवसाय करताना मार्केटिंग, गुंतवणूक, भांडवल असं कुठलंही ज्ञान नसताना सुरुवातीला रस्त्यावर हातगाड्या लावत स्वत:चं नाश्ता सेंटर सुरु करत हा उद्योजक मजलदरमजल करत आता 13 लाख रुपयांची कमाई करतोय.'माय नेशन' ने दिलेल्या माहितीनुसार,हातगाडी ते नाश्ता सेंटर आणि आता स्वत:चं भोजनालय उघडत या तरुणानं त्याचं बिझनेस मॉडेल सुधारलं. आता त्याचं स्वीटकॉर्न शॅाप सोलापूर आणि आसपासच्या भागातलं एक प्रसिद्ध नाव बनलं आहे.
शिक्षण कमी, व्यवसायानं दिली स्थिरता
केवळ नववी पर्यंतचं शिक्षण असल्यानं प्रचंड आव्हानं झेलाव्या लागलेल्या कृष्णदेव रोकडेंनी परिश्रमातून आपला व्यवसाय मोठा केला आहे. सुरुवातीला 500 रुपयांपासून सुरुवातीच्या भांडवल उभा करत स्वीटकॉर्नचा व्यवसाय सुरु केल्यानं रोकडेंना आर्थिक स्थिरता दिली.
किती कमवतो या उद्योजक?
40,000 ते 45,000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या व्यवसायाचा विस्तार तीन भोजनालयांमध्ये झाला आहे. औपचारिक शिक्षण नसलं तरी व्यवसाय थाटत या तरुणानं वर्षाकाठी लाखोंची कमाई करत तरुण आणि स्वत:चा व्यवसाय उघडू पाहणाऱ्या तरुणांसाठी आदर्श निर्माण केलाय. नोकऱ्यांवर अवलंबून न रहाता स्वावलंबी होण्यासाठी तरुणांनी लहान सुरुवात करत हळूहळू आपल्या व्यवसायाला आकार देणं महत्वाचं असल्याचं हा उद्योजक सांगतो. छोट्या व्यवसायांना कमी न लेखता आत्मविश्वास आणि ग्राहकांच्या गरजा समजून सुरु केलेल्या व्यवसायात यश मिळत असल्याचंही या उद्योजक सांगतो.
छत्रपती संभाजीनगरमध्ये केशराचा प्रयोग
थंड प्रदेशात फुलणार केशराच फुल आता छत्रपती संभाजीनगरच्या रखरखीत मातीत पिकू लागलाय. छत्रपती संभाजीनगरच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांना ही किमया करून दाखवली आहे. राहत्या घरी नऊ बाय बाराच्या खोलीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यानं लाखोंचा उत्पादन घेतलंय. लक्ष्मीकांत अपसिंगेकर यांची ही यशोगाथा (Agriculture Success Story) अनेक प्रगत शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ठरते आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

