एक्स्प्लोर

strawberry farming : तरुण शेतकऱ्यानं बीडमध्ये फुलवली स्ट्रॉबेरीची शेती, 12 गुंठ्यात दीड लाखांचे उत्पन्न

मराठवाड्यामध्ये आता स्ट्रॉबेरीची शेती करण्यात येत आहे. त्यातही अवर्षणग्रस्त भूभाग अशी ओळख असलेल्या बीडमध्ये स्ट्रॉबेरीची शेतीचा यशस्वी प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे.

strawberry farming : स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला लगेच महाबळेश्वर आठवतं. पण चक्क मराठवाड्यामध्ये आता स्ट्रॉबेरीची शेती करण्यात येत आहे. त्यातही अवर्षणग्रस्त भूभाग अशी ओळख असलेल्या बीडमध्ये स्ट्रॉबेरीची शेतीचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्याने केला आहे. सध्या जमिनीचे तापमान वाढू लागले आहे. अशा वातावरणात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन गेतले आहे. 

स्ट्रॉबेरीची यशस्वी शेतीची किमया ही परळी जवळच्या परचुंडीमधील एका तरुण शेतकऱ्याने करुन दाखवली आहे. सुगंध रुपनर असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.  सोयाबीन, कापसाची शेती करणारा हा शेतकरी आता मात्र स्ट्रॉबेरीची शेती करु लागला आहे. सुगंध रुपनर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड केली होती. स्ट्रॉबेरी हे थंड प्रदेशात येणारे पीक आपल्या शेतात येईल का? हा प्रश्‍न सुगंध रुपनवर यांना सतावत होता. यावर त्यांनी उत्तर शोधलं आणि स्वतःच्या शेतामध्ये बारा गुंठ्यात मल्चिंगवर स्ट्रॉबेरीची लागवड केली.

स्ट्रॉबेरीच्या फळाचं वजन वाढावं आणि जमिनीत ओलावा टिकून राहावा यासाठी मल्चिंग आणि ठिबकच्या दोन लाईन टाकण्यात आल्या आहेत. उन्हापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करण्यात आला आहे. या स्ट्रॉबेरीची लागवड 25 डिसेंबरला केली होती. त्यासाठी सहा हजार रोपं त्यांना लागली आहेत. रोपांसाठी 54 हजार रुपये तर ठिबक मल्चिंग आणि क्रॉप कव्हर यासाठी त्यांना एकूण 75 हजार रुपयांचा खर्च आला आहे. सध्या स्ट्रॉबेरीची विक्री परळी, अंबाजोगाई आणि बीड या ठिकाणी केली जात आहे. या स्ट्रॉबेरीला 250 रुपयांचा भाव मिळत आहे. चार महिन्याच्या या स्ट्रॉबेरीच्या पिकातून त्यांना दीड लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांची स्ट्रॉबेरीची शेती बघायला पंचक्रोशीतील अनेक लोक येत आहेत. आधी तर बीडमध्ये स्ट्रॉबेरी पिकते यावरच शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता, आता मात्र या स्ट्रॉबेरी शेतीची माहिती पंचक्रोशीत पोहोचली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागातून शेतकरी स्ट्रॉबेरी शेती बघायला येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget