एक्स्प्लोर

फेब्रुवारी सुरु झाला पण थंडी काय संपेना, कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका

Baramati : संक्रात संपल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागते. पण फेब्रुवारी महिना सुरु झाला तरी अद्यापही थंडी कायम आहे.

Pune Baramati Latest News Update : संक्रात संपल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागते. पण फेब्रुवारी महिना सुरु झाला तरी अद्यापही थंडी कायम आहे. याचा शेतीवर मोठा परिणाम होत असल्याचं समोर आलंय.  फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा संपला तरी अद्याप थंडी कायम असल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. थंडी अद्याप सुरु असल्यामुळे कलिगंडाला अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय. बारामतीमधील एका शेतकऱ्यानं एबीपी माझाशी बोलताना व्यथा मांडली आहे. 

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या बाबूर्डी येथील महेश ढोपरे या शेतकऱ्याने कलिंगडाची लागवड केली, उत्पन्न देखील जोरदार आणलं पण थंडीनं घात केला. थंडी कायम असल्यामुळे दर कोसळले आहेत. उत्तर भारतातील थंडीने कलिंगडाला दर नसल्याचे महेश ढापरे सांगतात. 

बारामती तालुक्यातील बाबूर्डी गावातील महेश ढापरे शेतकरी. बाबुर्डी हे गाव  दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जाते. परंतु याच गावातील शेतकऱ्यांने 55 गुंठ्यांत मेलडी जातीचे कलिंगड लावलं आहे. सध्या कलिंगडाची तोडणी सुरू आहे. पण त्याच्या कलिंगडाला दर नाहीये. बाजारात कलिंगडाचे उत्पादन जास्त आणि मागणी कमी असल्याने तसेच थंडीचा फटका बसल्याने. कांद्याची लागवडीचे क्षेत्र कमी झालं आणि कलिंगडाचे क्षेत्र वाढल्याने कलिगडाचे मार्केट कमी असल्याचं तज्ञ सांगतात.

दरवर्षी या काळात कलिंगडाचा दर हा 27 रुपये प्रतिकिलो होता. परंतु या वर्षी उत्तर भारतात थंडी असल्याने हा दर 6 ते 8 रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी 5 ते 6 लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते तिथे मात्र 3 लखाच्या उत्पन्नावर समाधान मानावा लागणार आहे. एकरी 7 हजार रोपे तर सव्वा एकरात 9 हजार रोपे लावली आहेत. आतापर्यंत 14 टन हार्वेस्टिंग झालं आहे. अजून 14 ते 16 टन उत्पन्न मिळेल अशी आशा महेश यांना आहे. बागेला एकूण खर्च 90 हजार झाला आहे. 

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा महेश यांनी उत्पादन चांगले घेतले. खर्चही रेटून केला, परंतु मार्केटने मात्र घात केला. उत्पादन जास्त मिळाले याचे समाधान त्यांच्याकडे आहे. परंतु दर न मिळाल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. थंडीमुळे शेतकऱ्यांना असाही फटका बसत असल्याचं दिसत आहेत. 

आणखी वाचा :

Kolhapur Crime : पोहता येत नसतानाही जीव धोक्यात घालून लेकीला वाचवलं, मात्र वडिलांचा बुडून मृत्यू; गावातील यात्रेपूर्वीच दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Naxal Encounter : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Government Scheme special report : मतांच्या  पिकासाठी सरकारकडून  योजनांची पेरणीAjit Pawar Special Report  : रा. स्व. संघाच्या 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीकाEknath Shinde : रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात पैसे जमा होणार, 'लाडक्या बहिणीला' सरकारकडून ओवाळणीZero Hour : नवनव्या योजनांचा महायुतीला  विधानसभेत फायदा होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Naxal Encounter : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
''एकाच घरात 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 1 आमदार?''; त्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, हशा पिकला
''एकाच घरात 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 1 आमदार?''; त्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, हशा पिकला
Kolhapur News : तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक, सकल हिंदू समाजाचा इशारा; एमआयएमच्या मोर्चाला विरोध
तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक, सकल हिंदू समाजाचा इशारा; एमआयएमच्या मोर्चाला विरोध
मुंबईतील रिलस्टार अन्वीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू; रायगडमधील पिकनिक जीवावर बेतली
मुंबईतील रिलस्टार अन्वीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू; रायगडमधील पिकनिक जीवावर बेतली
Video: लाडक्या बहि‍णींना पहिला हफ्ता कधी अन् किती?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली फायनल तारीख
Video: लाडक्या बहि‍णींना पहिला हफ्ता कधी अन् किती?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली फायनल तारीख
Embed widget