एक्स्प्लोर

Mango News : आफ्रिकेतल्या मलावीचा 'हापूस' आंबा APMC मध्ये दाखल, किलोला हजार ते दीड हजार रुपयांचा दर

आफ्रिकन देश मलावीमधून (Malawi) हापूस आंबा (Alphonso Mango) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावीच्या आंब्याला मोठी मागणी आहे.

Mango News : आंबे खवय्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आफ्रिकन देश मलावीमधून (Malawi) हापूस आंबा (Alphonso Mango) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) मलावी देशातून या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावीच्या आंब्याला मोठी मागणी आहे. गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. सध्या या आंब्याला किलोला हजार ते दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे.

तीन किलोच्या बॉक्सची किंमत तीन ते पाच हजार रुपये

मलावी देशातील हापूस आंब्याला भारतातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दरवर्षी हा आंबा देशाच्या बाजारपेठेत दाखल होतो. यावर्षी देखील मलावीमधून हापूस आंबा मुंबईच्या एपीएमसी बाजार समितीत दाखल झाला आहे.   महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. मागील पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. पंधरा वर्षांपूर्वी कोकणातील झाडांच्या काट्या आफ्रिकन देश मलावीमध्ये नेण्यात आल्या होत्या. जवळपास साडेचारशे एकरवर आंब्याची लागवड करण्यात आली. या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्यानं या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपयापर्यंत आहे. आज एकूण 800 बॉक्सची आवक एपीएमसी बाजारात झाली आहे.

देवगडचा हापूसही बाजारात दाखल

कोकणचा राजा अर्थात हापूस आंबा खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला (Navi Mumbai APMC) रवाना झाली आहे. देवगड हापूसच्या यावर्षीची पहिली पेटी पाठवण्याचा कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाला आहे. देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठवली आहे. "या आंब्यांना किती दर मिळेल यावर सर्व शेतकऱ्यांचं पुढील आर्थिक गणित अवलंबून आहे," अशी प्रतिक्रिया या आंबा बागायतदारांनी दिली

परतीच्या पावसाचा आंब्याला फटका

दरवर्षी वाशी एपीएमसीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याच्या आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. परतीच्या पावसामुळे झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळे आंब्याची पहिली पेटी जरी दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून अवधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Navi Mumbai News : वाशी मार्केटमध्ये देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल, दोन डझन आंब्यांना नऊ हजारांचा दर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Embed widget