(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Watermelon Farming : रब्बी हंगामात करा कलिंगडाची लागवड, मिळवा लाखोंचा नफा; वाचा काय आहेत फायदे?
महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड (Watermelon Farming) केली आहे. या कलिंगडाच्या लागवडीतूनही शेतकरी चांगल्या प्रकारचा नफा मिळवू शकतात.
Watermelon Farming : सध्या देशात रब्बी हंगाम (Rabi Season) सुरू आहे. शेतकरी (Farmers) शेतात पिकांची पेरणी करण्यात व्यस्त आहेत. तर काही ठिकाणी पेरणी झाली आहे. या हंगामात महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड (Watermelon Farming) केली आहे. या कलिंगडाच्या लागवडीतूनही शेतकरी चांगल्या प्रकारचा नफा मिळवू शकतात. गेल्या काही वर्षापासून कलिंगडाची शेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे. या पिकावर जास्त प्रमाणात किंडींचा प्रादुर्भावही होताना दिसत नाही.
मर्यादीत क्षेत्रात कलिंगडाची लागवड करुन मिळवा लाखोंचा नफा
रब्बी हंगामातील पिकांना कधी कधी बदलत्या हवामानाचा तसेच अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतो. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान होतं. अशा स्थितीत शेतकरी हंगामी पिकांच्या उत्पादनातूनही लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतात. यातीलच एक पीक म्हणजे कलिंगड आहे. अत्यंत मर्यादित क्षेत्रात हंगामानुसार कलिंगड पिकाची लागवड करुन त्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
महाराष्ट्रात 660 हेक्टर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड
महाराष्ट्रात 660 हेक्टर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कलिंगडाची मर्यादीत क्षेत्रावरच लागवड करण्यात आली आहे. मर्यादित क्षेत्र असले तरी यातून शेतकरी चांगला नफा मिळवत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. कलिंगड लागवडीतून शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. या पिकाला बाजारात चांगला भाव मिळत आहे.
कलिंगड आरोग्याच्या दृष्टीनं पोषक घटक
कलिंगडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भरपूर पाणी असते. याशिवाय चुना, फॉस्फरस तसेच अ, ब, क यासारखी जीवनसत्त्वे असतात. ही जीवनसत्तवे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहेत. त्यामुळं बाजार कलिंगड पिकाला मोठी मागणी असते.
कधी कराल कलिंगडाची लागवड ?
कलिंगड लागवडीचा हंगाम हा डिसेंबर महिन्यात सुरू होतो. मार्च महिन्यात कलिंगड पिकाची काढणी केली जाते. तर काही भागात फेब्रुवारीच्या मध्यात कलिंगड पिकाची लागवड केली जाते, तर डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये लागवड केली जाते. दुसरीकडे, कलिंगडच्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, कलिंगड पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. कलिंगड पिकाला 24°C ते 27°C दरम्यानचे तापमान गरजेचे आहे. उगवण क्षमतेसाठी 22 ते 25 अंश सेल्सिअसचे तापमान गरजेचे असते.
रोग आणि किडीपासून करा पिकाचं संरक्षण करा
प्रत्येक पिकाप्रमाणे कलिंगड पिकाचेही रोग आणि कीटकांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. कलिंगडावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव साधारणपणे पानांपासून सुरू होतो. नंतर ही बुरशी पानाच्या खालच्या बाजूला वाढते. यानंतर ते पानांच्या पृष्ठभागावर पोहोचते. या स्थितीत पाने पांढरी दिसू लागतात. जेव्हा रोग वाढतो तेव्हा पाने पिवळी पडतात आणि पडतात. औषध फवारणी करून कलिंगडाचे किडीपासून संरक्षण करावे.
महत्त्वाच्या बातम्या: