China : चीनमध्ये घर घेण्यासाठी अनोखी ऑफर! पैशांऐवजी कंपनी घेतेय चक्क टरबूज आणि लसूण, नेमकी ऑफर काय?
China News : चीनमधील एक रिअल इस्टेट कंपनी ग्राहकांकडून पैशाच्या बदल्यात चक्क टरबूज आणि लसूण घेतेय. जाणून घ्या....
China News : चीनच्या बाजारपेठेत मोठी मंदी आहे. त्याचा परिणाम तेथील प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रावर होताना दिसत आहे. येथील रिअल इस्टेट व्यवसायावर मंदीचा भयंकर परिणाम झाला आहे. एकीकडे लोक मालमत्तेत गुंतवणूक करण्यास घाबरत आहेत. रिअल इस्टेट कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहेत. चीनमधील एक रिअल इस्टेट कंपनी ग्राहकांकडून पैशाच्या बदल्यात चक्क म्हणून टरबूज घेत आहे. चिनी शहरांमधील रिअल इस्टेट विकासकांनी अलीकडेच विविध प्रचार मोहिमा सुरू केल्या आहेत.
गहू आणि लसूणच्या स्वरूपात डाउन पेमेंट
चीनमधील एक रिअल इस्टेट कंपनी ग्राहकांकडून पेमेंट म्हणून टरबूज घेत आहे. घर खरेदीदारांना गहू आणि लसूणच्या स्वरूपात डाउन पेमेंट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकर्यांना घरखरेदीसाठी आकर्षित करण्यात येत आहे. जेणेकरून याचा लाभ मिळू शकेल
एक किलो टरबूजसाठी 20 युआन
ग्लोबल टाइम्समधील एका बातमीनुसार, एक किलो टरबूज 20 युआनच्या बरोबरीचे मानले गेले आहे. ज्यांच्या भारतीय रुपयानुसार, जर एक टरबूज 3 किलोचा असेल तर त्याची किंमत 700 रुपये असेल. कंपनीने आपल्या प्रचार मोहिमेत सांगितले की, नवीन घरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी टरबूज, लसूण आणि गहू डाऊन पेमेंट म्हणून वापरावे. जेणेकरून शेतकऱ्यांनाही लाभ मिळू शकेल.
5,000 किलो टरबूज देण्याची परवानगी
वृत्तसंस्थेनुसार, 8 जून ते 15 जुलै या कालावधीत सुरू होणाऱ्या प्रमोशनल इव्हेंटच्या पोस्टरमध्ये असे लिहिले आहे की, घर खरेदी करणाऱ्यांना जास्तीत जास्त 5,000 किलो टरबूज देण्याची परवानगी असेल. ज्याचे मूल्य 100,000 युआन आहे. प्रचाराचा उद्देश स्थानिक टरबूज शेतकऱ्यांना पाठिंबा देणे हा आहे. मात्र, मीडियाने चर्चेत आल्यानंतर कंपनीने ही प्रचार मोहीम बंद केली आहे.
कंपनीने प्रमोशन थांबवले
कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनानुसार, “आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रमोशनल पोस्टर्स काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. आता आम्हाला प्रमोशनसाठी इतर मोहिमा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. चीनमधील देशांतर्गत कर्ज देखील 10 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. चिनी बँकांच्या आकडेवारीनुसार, बँकांनी दिलेली 27% कर्ज स्थिर मालमत्तेशी संबंधित आहेत. चीनमधील रिअल इस्टेट व्यवसाय हा सर्वात मोठा नफा देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जात होता, परंतु आता परिस्थिती बदलली आहे.