एक्स्प्लोर

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनचा धोका वाढला, संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित  

Lumpy Skin Disease : राज्यात लम्पी स्कीनचा धोका वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्या नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

Lumpy Skin Disease : राज्यात लम्पी स्कीनचा धोका वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्या नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.  जनावरांमधील लम्पी स्कीन रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे  नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. 

शासनाने आठ सप्टेंबरला याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. लम्पी स्कीनचा  प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यामध्ये आठ सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील 29 बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे. गुरे व म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. त्यामुळे लम्पी स्कीन हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. 

राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना सूचना दिलेली आहे. लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित केल्याने, लम्पी स्कीनवर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करता येणार आहे. 

गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई अधिसूचनेनुसार मनाई करण्यात आली आहे. 

गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जनावरांच्या जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधीत झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करता येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. पशुपालकांनी अधिसूचनेचे पालन करावे व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : PA आणि OSD संदर्भात 125 नावं आली, 109 नावं क्लिअर केल, फडणवीसांचं वक्तव्यJayant Patil And Chandrashekhar Bawankule Meet:जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट, भेटीत नेमकं काय ठरलं?Supriya Sule On Dhananjay Deshmukhअन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुळेंचा धनंजय देशमुखांना फोनDr Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट नेमका काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
Maharashtra Goverment:  महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा, भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी लागली?
महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा, भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी लागली?
Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
धनंजय मुंडे सलग तिसऱ्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर; पण 564 कोटींसाठी ट्विट, मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
धनंजय मुंडे सलग तिसऱ्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर; पण 564 कोटींसाठी ट्विट, मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
Embed widget