Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात जूनमध्ये अपेक्षित पाऊस नाहीच, विदर्भात कमी पावसाची नोंद; शेतीला मोठा फटका
Maharashtra Monsoon : जून महिन्यात एकूण सरासरीच्या 50 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात तर हा आकडा यापेक्षाही कमी आहे.
Monsoon Update : राज्यात बहुतांश (Maharashtra Rain Update) ठिकाणी जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मागील आठवड्यापासून पावसाचं आगमन झालं आहे. मात्र जून महिन्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होतं, तेवढा पाऊस अजून पडलेला नाही.
जून महिन्यात एकूण सरासरीच्या 50 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात तर हा आकडा यापेक्षाही कमी आहे. कारण राज्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाला आहे. राज्याच्या परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यात पावसानं जूनची सरासरी ओलांडली आहे. या तिन जिल्ह्यात मिळून सरासरी 32 टक्के अधिक पाऊस पडला आहे.
संपूर्ण देशाचा विचार केला तर आतापर्यंत जूनच्या सरासरीच्या 10 टक्के कमी पाऊस झालेला आहे. विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सरासरीच्या अंदाजित 50 टक्के पाऊस झाले आहे. विदर्भात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्याने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे.
शेतकऱ्यांसाठी चिंतेचं वातावरण
मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसामध्ये सातत्य नाही. त्यामुळे पेरणीसाठी अपेक्षित पाऊसच झालेला नाही. खरीप हंगामाचा महत्त्वाचा असताना पावसाच्या या लहरीपणामुळे पेरणी करावी की नाही या संभ्रमात राज्यातील शेतकरी आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी शेती ओसाड पडल्या आहेत. तर धरणांमधील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर पोहचल्याने पिण्याच्या पाण्याचीही गंभीर टंचाई निर्माण झाली होती. अशातच महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडणार असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते.
हिंगोली जिल्ह्यात फक्त तीन टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण