नाशिकमध्ये फळांच्या प्रदर्शनाचे आयोजन, कोण ठरणार मिलांज महाराजा पुरस्काराचा मानकरी?
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत इथं फळां-फुलांचा महोत्सव आयोजित केला आहे. 23 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान 10 फळ-पिकांचे हे मोठे प्रदर्शन आहे.
नाशिक : जागतिक बाजारपेठेत फळांना मागणी येऊ लागली आहे. फळ मात्र अधिकाअधिक देखणे व आकर्षक हवे, यासाठी पीक कितीही ग्रॅण्ड असले तरी "ब्रॅण्ड" म्हणून लोकप्रिय व्हायला हवे. त्यासाठी संपूर्ण गुणवत्ता हाच एक केवळ निकष असतो, म्हणूनच निसर्गाशी दोन हात करून उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे ब्रॅण्डींग करण्यासाठी "पूर्वा परिवारा" तर्फे मिलांज फळां-फुलांचा महोत्सव आयोजित केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत इथं हा महोत्सव आयोजीत केला आहे.
23 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान 10 फळ-पिकांचे मोठे प्रदर्शन
23 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान "बसवंत गार्डन", मुखेड रोड, पिंपळगांव बसवंत येथे द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई, स्ट्रॉबेरी, पेरू, मोसंबी, टरबूज, खरबूज व चिकू अशा 10 फळ-पिकांचे मोठे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध जातिंचे 800 हून अधिक फळांचे नमुणे आकर्षकरित्या मांडले गेले असून जवळपास 56 पुरस्कार देण्यात येणार आहेत. मिलांज महाराजा पुरस्कार 5000/- प्रथम -3001, द्वितीय 2001/- तृतीय 1001/- व प्रोत्साहनपर प्रत्येकी 1001/- चे पाच पुरस्कार यात समाविष्ठ आहेत. सदर विजेत्यांना 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. "बसवंत गार्डन" मध्ये पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांप्रमाणेच निर्यातदारांनाही याचा फायदा होणार
शेतकऱ्यांनी फळांचे नमुने देतांना सोबत त्यांचे नाव, पत्ता, फोन नंबर, फळांची जात व क्षेत्र यांचा उल्लेख केलेला असल्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच निर्यातदारांनाही याचा फायदा होतो, कारण त्यांना अशा शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधता येतो. प्रदर्शनातील उत्कृष्ट नमुने पाहून सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकप्रकारचे प्रोत्साहन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होऊन ते इर्षेने कामाला लागतात आणि त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रीय कृषी उत्पादन वाढीवर होत असतो. या प्रदर्शनाचा सर्वांनीच लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
























