(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Turmeric : हिंगोलीच्या वसमत बाजार समितीत हळदीला विक्रमी दर, प्रतिक्विंटलला 20 हजारांचा दर मिळाल्यानं बळीराजा आनंदी
Hingoli : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Vasmat Bazar Samiti) हळदीला 20 हजार रुपये प्रति क्विंटल इतका सर्वोच्च भाव मिळाला आहे.
Hingoli Agriculture News : हळदीचे भाव (Turmeric Price) दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Vasmat Bazar Samiti) हळदीला 20 हजार रुपये प्रति क्विंटल इतका सर्वोच्च भाव मिळाला आहे. त्यामुळं हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वी कुरुंदा बाजारपेठेमध्ये हळदीला 19 हजार रुपयांचा दर मिळाला होता. त्यानंतर आता वसमतच्या बाजारपेठेत हळदीला 20 हजार रुपये प्रति क्विंटल हा सर्वोच्च दर मिळाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील रेऊलगाव येथील शेतकरी प्रकाश फेगडे यांनी 29 कट्टे हळद विक्रीसाठी आणली होती. त्यांच्या हळदीला 20 हाजर रुपये प्रतिक्विंटलचा सर्वोच्च भाव मिळाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. पण काही भागात हवामानातील बदलाचा मोठा फटका हळदीच्या पिकाला बसतो. तर कधी दरात चढ उतार झाल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसत असतो. यावेळी मात्रस हळदीच्या दरात चांगली वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
सांगलीनंतर सर्वात जास्त हळदीची विक्री हिंगोली जिल्ह्यात
राज्यात सांगलीनंतर (Sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये (Sant Namdev Market Yard) होत असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोलीच्या (Hingoli) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचं चित्र दिसत आहे. हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे. येथील मार्केटमध्ये हळदीला दर देखील चांगला मिळतो. मागील काही दिवसापासून येथील मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. येथील मार्केट यार्डात लिलाव पध्दतीने हळदीची विक्री केली जाते. त्यामुळे हळद उत्पादक येथे हळद विक्रीसाठी आणतात. हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशात हळद काढणी झाली आहे. सध्या देशातील हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढू लागली आहे. इतर जिल्ह्यात सुद्धा हळदीला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला हळदीला सर्वसाधारण भाव मिळत होता. परंतू, आता मात्र चांगला भाव मिळत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Turmeric : हिंगोलीत हळदीला तब्बल 19 हजार रुपयांचा दर, मागील 14 वर्षातील सर्वोच्च दर