एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav : गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य

Bhaskar Jadhav : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर भास्कर जाधव यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. 

मुंबई : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकल्या आहेत. सेनेच्या आमदारांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत भास्कर जाधव यांची विधानसभेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली. तर, सुनील प्रभू पुन्हा एकदा पक्षाचे प्रतोद बनले आहेत. तर, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.   

भास्कर जाधव काय म्हणाले?  

राज्यात पहिल्यांदाच एवढा मोठा संख्येने सत्ताधारी झाले आहेत.विरोधी पक्ष संख्येने छोटा झाला आहे तरी पण हा विरोधी पक्ष  सत्ताधाऱ्यांना पुरून उरेल, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. पक्षानं गटनेतेपदी नियुक्ती केली यासंदर्भात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की गटनेता म्हणून माझी नियुक्ती केली असून मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे. 

भास्कर जाधव पुढं म्हणाले की, खर तर माझं म्हणणं होतं की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करावं पण उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला आणि त्यामुळे मी गटनेता म्हणून यापुढे शिवसेनेचे काम करेल, सर्व प्रश्न मांडेल. 

 सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावं, असं मत जाधव यांनी मांडलं. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारचा विचार करून विरोधी पक्षनेते पदासाठी विचार व्हायला हवा, असं  भास्कर जाधव म्हणाले. मात्र,हा सगळा निर्णय सरकार स्थापन झाल्यानंतर  होईल. मंत्रिमंडळ स्थापन होईल शपथविधी होईल. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. विधानसभा अध्यक्षांना आम्ही विरोधी पक्ष नेता महाविकास आघाडीचा एकत्रित मिळून  व्हावा यासाठी विनंती करू, असंही भास्कर जाधव म्हणाले. 

महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्ष नेता आमचा  म्हणजे शिवसेनेचा होईल. त्यात जर मला ही जबाबदारी दिली तर मला नक्कीच विरोधी पक्ष नेता  व्हायला आवडेल, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं. 

भास्कर जाधव यांनी मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं यासंदर्भात देखील माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांशी संवाद साधताना ते फडण"वीस" असले तरी आपण २० आहोत आपण पुरून उरु असं म्हटल्याचं देखील भास्कर जाधव म्हणाले. 

इतर बातम्या :

आमदार होताच दिलीप वळसे पाटील घेणार शरद पवारांची भेट, मोठं कारण समोर

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Embed widget